महत्वाच्या बातम्या
-
ते जॅकेट कायमचं उतरलं की हा ‘Lockdown Look’ आहे? - फडणवीसांची खिल्ली
मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
माध्यमांची मुस्कटदाबी, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती; भाजपचा आरोप
राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असं निवेदन भाजप नेत्यांनी राज्यपालांना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलिसांनी घरी थांबावे, आयुक्तांचे आदेश
कोरोना माहामारीवर मात करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन असताना पोलीस खातं मात्र दिवस-रात्र काम करत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस कर्मचा-यांना घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरंतर आतापर्यंत ३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय मुंबई पोलिसांकडून घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांसाठी राखीव नाही; पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांमध्ये सरकार विरोधात खदखद...सविस्तर रिपोर्ट
कालच कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली. तत्पूर्वी जे घडलं त्याबद्दल धक्कादायक माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी अनास्था! मृत्यू पूर्वी त्या पोलिसाला ४-५ सरकारी रूग्णालयात फिरवण्यात आलं
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी सोनावणे यांचं निधन
कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीपुढे भाजपनीती फिकी? उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेवरील मार्ग मोकळा होणार?
राज्यावर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. या संकटाशी तोंड देताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री जाईल की राहील अशी राजकीय चर्चा रंगली आहे. राज्यपालांनी जर याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाहीतर महाविकास आघाडी सरकार नवीन पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना विरोधी लढ्यात अजून एका पोलिसाचं बलिदान
राज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिस दलातील ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू
देशातील सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अद्यापही यश मिळालेलं नाही. राज्यात गेल्या गेल्या २४ तासात १८ मृत्यूंची नोंद झाली असून ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६८१७ झाली आहे. तर मृतांची संख्या ३०० च्या पुढे गेली असून ३०१ झाली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती सूचना होती, या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही - अमेय खोपकर
राज ठाकरेंनी जी सूचना केली ती ताकाला जाऊन भांडे न लपवता केली आहे. सरकारी तिजोरीत खडखडाट असताना आता नैतिकतेच्या मायाजालात न अडकता वैधानिक मार्गाने काही उपाय अवलंबण्याची आवश्यकता आहे. त्यात तळी उचलून धरण्याचा प्रश्न कुठे येतो? आणि केवळ दारूच नव्हे, तर उपाहारगृहे आणि अन्य व्यवहारदेखील सुरू करण्याचीही सूचना केली, हे या रडत राऊतांच्या रिकाम्या डोक्यात शिरलेले दिसत नाही. त्यामुळेच मनसेच्या विधायक सूचनेची खिल्ली उडवण्याचा विचार आला असावा असंही अमेय खोपकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
वाईनशॉप खुले करण्यामागे नक्की महसुलाचाच विचार? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाचा
टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउननंतर परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मुंबई पुण्यातून गाड्या सोडा - अजित पवार
येत्या ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वे सुरू झाल्यावर राज्यातील विविध भागात थांबलेले परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडून गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने या मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यातून विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका! मे महिन्यात मुंबईत कोरोनाचे काही लाख रुग्ण वाढणार हे वृत्त खोटं - बीएमसी
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ९० हजारहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून मृतांच्या दरातही घट झाली आहे. सध्याची परिस्थिती ही आशादायी असून राज्य सरकार कोरोना विषाणूच्या संकटातून सावरण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे म्हणाले की, राज्यात एकूण ३८ लॅब उपलब्ध असून प्रत्येक दिवसाला ७ हजारहून अधिक चाचण्या घेणे शक्य होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावणाऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण; रिपोर्ट पॉझिटिव्ह
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या मंत्र्याने सोमवारीच मंत्रालयामध्ये एका बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. या मंत्र्याची तब्येत मंगळवारी काहीशी बिघडली होती. यामुळे त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या मंत्र्याने सोमवारी मंत्रालयात बैठकीला हजेरी लावल्याने त्यांना भेटलेल्या अधिकारी, कार्यकर्त्यांनाही क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाधवान बंधूंना सीबीआयच्या ताब्यात देणार - गृहमंत्र्यांची माहिती
“वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ आज दुपारी दोन वाजता संपत आहे. त्यामुळे आपल्या पोलीस खात्यातर्फे सक्तवसुली संचलनालय (ईडी) आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवलं आहे. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी तसं केल्यास तो निर्णय अनैतिक आणि घटनाबाह्य ठरेल: घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट
राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल नियुक्त जागेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव सुचविल्यानंतरही ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती न करण्यात आल्याने संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर काल टीका केली होती. ‘राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, असं सांगतानाच का कळत नाही, पण मला रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालाची आठवण येते, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राजधानी मुंबईत मासेमारी, कॉल सेंटर आणि विवाह समारंभांना सशर्त परवानगी
कोरोना बाधितांचा आकडा राज्यात कमी होत असल्यामुळं समाधान व्यक्त होत असतानाच काल अचानक रुग्णांच्या संख्येत उच्चांकी वाढ झाली. रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळं प्रशासनाची चिंता काही प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी आजपासून राज्याच्या काही भागांत निवडक उद्योगधंदे सुरू होत आहेत. अर्थात, लॉकडाऊनचे नियम पाळून हे अर्थचक्र सुरू होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
३२८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ वर
मागील दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जरा कुठे उसंत मिळेल असे वाटत असतानाच शनिवारी मुंबईत या व्हायरसने पुन्हा उसळी घेतली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत शनिवारी कोरोनाचे आणखी १८४ रुग्ण आढळून आले. मुंबईत एकाच दिवसात इतके रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या ३७०० विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवलं
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अशामध्ये मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० विमान उड्डानाद्वारे सुमारे ३७०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविण्यात आले आहे. बुधवारी विमानतळावरील एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी घोषीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात आंतरराष्ट्रीय आणि देशव्यापी विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील दोन पोलिस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण; इस्पितळात दाखल
कोरोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी