महत्वाच्या बातम्या
-
धारावीत कोरोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याची घंटा
कोरोना व्हायरसनं महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. त्यातही सर्वात जास्त धोका मुंबईला निर्माण झाला आहे. असं असतानाही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या धारावीमध्ये आतापर्यंत तीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस सापडल्या आहेत. त्यापैकी पहिल्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याचं थेट कनेक्शन दिल्लीत निजामुद्दीन इथे पार पडलेल्या तबलिगी जमासोबत असल्याचं समोर येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
यांच्यावर उपचार कसले करता, डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांना गोळ्या घालून ठार मारा - राज ठाकरे
करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
वरळी कोळीवाड्यातून लोकं समुद्रमार्गे माहीम'मध्ये बाजारासाठी; ५ जण अटकेत
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. या भागात फैलावणारा कोरोना रोखण्यासाठी प्रशासनानं युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले असून रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जी दक्षिण विभागात आहेत. कोरोनाचे तब्बल ३४ रुग्ण या विभागात सापडले आहेत. जी दक्षिण विभागात सापडलेल्या ३४ पैकी दोन रुग्णांचा मृत्युही झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ग्रेट रतन टाटा! पालिकेच्या आरोग्य सेवकांना ताज हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध
देशात ओढावलेल्या परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन तब्बल १५०० कोटींची घोषणा केली होती. आता त्यांनी आणखी एक समाजहित केलं आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी टाटा समूहाच्या मालकीची मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सची दारं खुली करून दिली आहे. या निर्णयानंतर समाज माध्यमांमध्ये रतन टाटा यांच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आनंद वार्ता! आईसह ३ दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. मात्र बाळाची आई आणि बाळ या दोघांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महिलेला प्रसतुकळा सुरु झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आल्यानं महिलेला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, दरम्यान, या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आले होते.
5 वर्षांपूर्वी -
आता रस्त्यावर येऊन आग नाही लावली म्हणजे झालं - खा. संजय राऊत
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगात अंधकार पसरला आहे, हा अंधार आपल्याला निरंतर प्रकाशानं दूर करायचा आहे. यासाठी रविवारी ५ एप्रिलला प्रत्येक भारतवासीयांनी ९ मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. यासाठी रात्री नऊ वाजता सर्वांनी आपल्या घराचे दिवे बंद करायचे आहेत. या नऊ मिनिटांत प्रत्येकांनी दरवाज्यात किंवा बालकनीत उभं राहून मेणबत्ती, दिवा लावून किंवा टॉर्च, मोबाइलची फ्लॅशलाइट सुरु करून अंधकार दूर करायचा आहे, असं आवाहन मोदींनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बस डेपोतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, टिळकनगर'मधील इमारत सील
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली! पोलीस कुटुंबीय देखील कोरोनाच्या कचाट्यात; वरळी पोलीस वसाहत
मुंबई महानगर पालिकेनं बुधवारी एकाच दिवशी शहरातील ४५ नवे परिसर सील करुन टाकले आहेत. या परिसरांचा समावेश‘no-go zones’मध्ये करण्यात आला आहे. ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळतात किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आल्यानं ज्या भागातील लोकांना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो असे भाग ‘no-go zones’मध्ये येतात. तो परिसर पूर्णपणे बंद करण्यात येतो. या आठवड्यात एकूण १९१ परिसर सील करण्यात आले आहेत.बुधवारी नव्यानं सील करण्यात आलेले बहुतांश परिसर हे उपनगरातले आहेत. पोलिसांनी परिसरात बॅरिकेट्स लावले असून येथील नागरिकांना बाहेर पडण्यास आणि बाहेरच्या व्यक्तीला आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गरीब घरातील श्रीमंत मनाचे मुंबई पोलीस हवालदार; मुख्यमंत्री निधीला १० हजार रुपये
मागील दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून ५००० पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
No-go zone: मुंबईत आता तब्बल १९१ ठिकाणं सील
मागील दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून ५००० पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
निजामुद्दीनमध्ये जे काही झालं त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार: शरद पवार
‘करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून येत्या १४ एप्रिल रोजी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारे सामूहिक सोहळे लांबणीवर टाकावेत व मुस्लिमांनी ८ एप्रिलचा ‘शब-ए-बरात’चा विधी आपल्या घरात राहूनच करावा,’ अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: आईसह ३ दिवसांच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण
मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. बाळाची आई आणि बाळ या दोघांचे सोमवारी चाचणीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. महिलेला प्रसतुकळा सुरु झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आल्यानं महिलेला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बापरे! त्यांचा ५ लांब पल्ल्यांच्या ट्रेनने प्रवास: पोलीस व रेल्वे प्रशासन सगळ्यांच्या डोक्याला ताप
निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ५००० जण करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात होते: आरोग्यमंत्री राजेश टोपे
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून ५००० पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: आर्थिक मदतीसोबत, सरकारी इस्पितळात अत्यावश्यक साहित्याचं 'मनसे' वाटप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत ९३ कोटी पाच लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मुंबईत महापालिकेकडून तब्बल १४६ परिसर सील
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनं मुंबई आणि उपनगर परिसरातील एकूण १४६ परिसर पूर्णपणे सील केले आहेत. या सील केल्या गेलेल्या ‘no-go zones’मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत किंवा बाधा झालेले रुग्ण या परिसरातील लोकांच्या संपर्कात आले असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे खबरदारीची पावलं उचलत हे परिसर सील करण्यात आले आहेत. हे परिसर सील करताना इथल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरुच राहिल याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वैद्यकिय कर्मचारी आणि पोलिसांच्या वेतनाबाबत अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत; शिवसेनेचं टीकास्त्र
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकचं नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरुन राजकारण करण्याची संधी भाजपा नेते सोडत नसल्याचं दिसून येतं.
5 वर्षांपूर्वी -
मृतदेहाचे फक्त दहन करण्याचा मुंबई महापालिकेचा आदेश तासाभरात मागे; नियमावली लागू
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८ वर पोहचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कांदिवलीत सॅनिटायझरचा साठा करणारी टोळी पकडली
राज्यात करोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच असून आज आणखी १५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पुण्यातील तब्बल पाच जणांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर गेला आहे.
5 वर्षांपूर्वी