महत्वाच्या बातम्या
-
वरळी कोळीवाड्यातील कोरोनाबाधित चौघांपैकी एकजण ट्रॉम्बेला आचारीचं काम करणारा
देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधित ४ रुग्ण आढळले; पोलिसांकडून परिसर सील
देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण हे आता १०००च्या वर गेले आहे. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २१५ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार असे दिसून आले आहे की, पुण्यातील ५, मुंबईतील ३, नागपुरातील २, कोल्हापूर १, नाशिकमधील १ असे एकूण नवे १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. काल (रविवार) राज्यात एकूण २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. एकूण १० नवे रुग्ण काल मुंबईत आढळले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ही वेळ टीका, आरोप करण्याची नाही; शिवसेनेचं फडणवीसांवर टीकास्त्र
सरकारच्या सूचना व लॉकडाऊनचे नियम धुडकावून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ही वेळ वादविवादाची नाही. टीका, आरोप करण्याची नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे. सरकारी पगार भाजपच्या कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे,’ असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या साथीत पैशासाठी शाळेला हॉल भाड्याने देणाऱ्या इस्पितळाने OPD बंद केला
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १५९वर गेली असून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ५६वर पोहोचली आहे. विमानांचे उड्डाण बंद केल्यानंतरही मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दोन कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन चुकून झालं तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
5 वर्षांपूर्वी -
आधी कोरोना बेरीज करत होता आता गुणाकार करतोय; पुढचे दिवस अत्यंत कसोटीचे
कोरोना व्हायरस आतापर्यत बेरीज करत होता. आता मात्र तो पुढच्या म्हणजेच धोक्याच्या टप्प्यात पोहोचला आहे. कोरोना व्हायरस आता गुणाकार करत आहे. त्यामुळे पुढचे १५ दिवस अत्यंत कसोटीचे, परीक्षेचे असून जिथं आहात, तिथंच थांबा. घराबाहेर पडू नका, घरातच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन आणि कडकडीची विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु ठेवा; पण दुकानात माल आहे कुठे?
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, किराणा दुकानं, औषधांची दुकानं २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो कोणी पदार्थ खाल्ले तिकडे? अन्न पुरवणाऱ्या 'त्या' महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
या संकटाची तीव्रता कमी होवो; पुन्हा आरोग्याचं वातावरण येवो; राज ठाकरेंच्या शुभेच्छा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करोनाच्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी होऊन पूर्ण सर्वत्र आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, अशा सदिच्छा राज यांनी ट्विट करुन दिल्या आहेत. राज यांनी त्यांच्या ट्विटवर अकाऊटंवरुन एक ऑडिओ मेसेज पोस्ट केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
संचारबंदी लागू आहे; टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका - मुख्यमंत्री
राज्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोरोना व्हायरस या संकटाचं गांभीर्य ओळखून लोकांनी सहकार्य करावं, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ‘संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे’, असा धीर देत नागरीकांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, असं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अन्नधान्याचा साठा पुरेसा; काळजीचे कारण नाही.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत पोलिसांकडून तब्बल १५ कोटींचे २५ लाख मास्क जप्त
करोना व्हायरसला रोखण्यामध्ये मास्क अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये मास्कला मोठया प्रमाणात मागणी आहे. मागणी वाढत असल्याने मास्कचा काळाबाजार सुरु आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सूचनेवरुन मास्कचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
क्वॉरंटाइन कँम्पमधून रुग्णांचे पलायन सुरु; अखेर मनसेची 'ती' मागणी योग्य ठरली
करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोलकरणीला कोरोना झाल्याचे सिद्ध..श्रीमंतांमार्फत कोरोना झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचला
करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक व कठोर निर्णयांचा सल्ला
मुंबईची लाईफलाईन असलेली उपनगरीय लोकल रेल्वे सेवा, बेस्ट बस आणि मेट्रोसेवा बंद झाल्यानं रोज गजबजणारी ठिकाणं आज सुनीसुनी वाटत आहेत. रिक्षा आणि टॅक्सी सेवा मात्र सुरु असल्यानं रस्त्यावर वाहनांची वर्दळ काही प्रमाणात दिसत आहे. मुलुंड चेकनाक्यावर तर खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात दिसल्यानं जमावबंदी लागू केली तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप झाला नसल्याचं चित्र सोमवारी सकाळी दिसत होतं.
5 वर्षांपूर्वी -
एक्सप्रेस महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी, पोलिसांनी अनेकांना परत पाठवलं
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लोकांनी गर्दी करू नये म्हणून जमावबंदी आदेशही जारी करण्यात आलेले आहेत. सरकारकडून सर्व प्रयत्न सुरू असतानाच मुंबई-पुण्यातील नागरिक मात्र बेपर्वाईने वागताना दिसत आहेत. मुंबई-पुण्यातील लोक आज नेहमीप्रमाणे रस्त्यावर उतरले. त्यामुळे मुंबईत मुलुंड आणि सायन येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी! तुम्हीच सणासारखे वातावरण निर्माण केले; संजय राऊत संतापले
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या आवाहनानंतरही काही लोकांकडून त्याची गंभीरपणे अंमलबजावणी झाल्याचे दिसले नाही. अनेकजण अजूनही सुरक्षेचे उपाय करताना दिसत नाही. सरकारच्या आवाहनानंतरही सोमवारी मोठ्याप्रमाणात लोक बाहेर पडले आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बेजबाबदारपणावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी सोमवारी टि्वट करुन आपली नाराजी जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या; मुख्यमंत्र्यांची विनंती आणि इशारा देखील
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनामुळे ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
खासगी बस, एसटी पूर्णपणे बंद; शहरातील बस सेवा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी: मुख्यमंत्री
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कलम १४४ लागू; ५ पेक्षा जास्त जण एकत्र आल्यास ताब्यात घेणार: मुख्यमंत्री
करोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशात ‘जनता कर्फ्यू’चं आवाहन केलं होतं. त्याला मुंबई,ठाणे,पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यात रस्त्यांवर, लोकल आणि बसमध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. लोकांनी घरातच राहणं पसंत केल्याने राज्यात कडकडीत संचार बंदी पाळली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती : महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने...
महाराष्ट्रामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली असून ती आता ७४वर पोहोचली आहे. काही तासांमध्ये हे आकडे वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आता संपूर्ण देशात रुग्णांचा आकडा ३२४ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील काही तासांत कोरोनाचे १० नवे रुग्ण समोर आले आहेत. यातील ६ रुग्ण मुंबईतील असून इतर ४ रुग्ण पुण्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी