महत्वाच्या बातम्या
-
आज देवळं बंद झालीत, पण खरं देवत्व सिद्ध करणाऱ्या पोलिसांना सलाम...कोणी म्हटलं?
कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा ४१ एवढी झाली आहे. त्यात २७ पुरूष आणि १४ महिला असे ४० करोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यासंदर्भात अधिकृत ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४१ वर; सदर व्यक्ती अमेरिकेतून आल्याचं वृत्त
कोरोनाबाधित रुग्णांची राज्यात आज मोठी वाढ झाली नसली तरीही पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आथा ४० एवढी झाली आहे. त्यात २६ पुरूष आणि १४ महिला असे ४० करोना पॉझिटिव्ह रूग्ण असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
व्यवस्थित नियोजन करून मुंबई बंद केली तर? - पंकजा मुंडे
कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी आपल्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण सध्या कोरोना व्हायरसच्या फेज २ मध्ये असून फेज ३ मध्ये जाऊ नये, यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले. खासगी क्षेत्रात शटडाऊन गरजेचं आहे. अत्याआवश्यक सेवा वगळून ‘वर्क फ्रॉम होम’वर जवळपास सर्व कंपन्यानी सहमती दर्शवली आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक आणि मुंबईत लोकल, मेट्रो ट्रेन बंद करायच्या की नाही, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे ६४ वर्षीय वरिष्ठ नागरिकाचा कस्तुरबा इस्पितळात मृत्यू
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. संबंधित रुग्ण हा ६५ वर्षांचा होता. या संदर्भातील माहितीला मुंबई महापालिकेने दुजोरा दिला आहे. या रुग्णाला आधीपासून मधुमेह आणि इतरही काही आजार होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे महाराष्ट्रात मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना: घरी कॉरंटाईन केलेल्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील शिक्का असा आहे
राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. परदेशातून परतल्यानंतर ज्यांना १०० टक्के घरी क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येत आहे. समाजात या व्यक्ती वावरताना आढळल्यास त्याची ओळख पटावी, यासाठी त्यांच्या डाव्या हातावर खास शिक्का उमटवण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती देखील दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात लॉकडाऊनची गरज नाही, पण पुढचे १५ दिवस महत्त्वाचे: मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना चाचणी: घरी क्वारंटाइन केलेल्यांच्या हातावर शाई मारणार: आरोग्यमंत्री
मुंबईपाठोपाठ आता नवी मुंबईतही कोरोनाव्हायरसचा नवा रुग्ण आढळून आला आहे, ज्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली आहे. आज दिवसभरात राज्यात मुंबईत ४, यवतमाळमध्ये एक आणि नवी मुंबईत एक असे एकूण ६ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात कोणत्या ठिकाणी कोरोनाव्हायरसचे किती रुग्ण आहेत, याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर पुढील काही दिवस बंद
जगभरात हाहाकार माजवलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरू नये, म्हणून सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा तसंच विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारसोबतच विविध संस्थाही पुढे येत याबाबत उपाययोजना करत आहेत. अशातच सिद्धिविनाय मंदिर समितीनेही मोठं पाऊल उचलत पुढील काही दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाकडे विनंती
जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. आता खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसंच, महापालिका आणि ग्रामपंचायता निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याचा निर्णय झाला असून तशी शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आणखी ४ नवे रुग्ण; कोरोना बाधितांची संख्या ३७ वर
राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखीन ४ रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती मिळत आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३७ वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिकेकडून सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात; ५०० बेड्स उपलब्ध करणार
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी राज्य शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर सरकारी रुग्णालयात नव्या लॅब सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश; ३१ मार्चपर्यंत कलम १४४ लागू
मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने मुंबई पोलिसांनीही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज मुंबईत जमावबंदी आदेश लागू केली आहे. गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं.
5 वर्षांपूर्वी -
फसवणूक? ‘महापोर्टल’ ते 'महाआयटी'....लोकप्रतिनिधींच्या मागणीला केराची टोपली
तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले होते. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला आणि नव्याने तयारी सुरु केली होती.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - मुंबई ते मांडवा प्रवास...रो-रो सेवेमुळे आता पाऊण तासात
भाऊचा धक्का ते मांडवा या मार्गावरील बहुप्रतीक्षित रो रो सेवेचा शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी रो रो सेवेचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई-अलिबाग अंतर आता अवघ्या पाऊण तासात गाठता येईल. भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी सेवेसारखीच जलवाहतूक किनारपट्टीवरील अन्य ठिकाणी सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; लागण झालेल्यांची संख्या २६ वर
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (COVID-१९) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या २६ वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: मनसेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द
करोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात होत असून, या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मनसेनं गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका होणार असून, सध्याची परिस्थिती पाहता सरकारनं या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलाव्यात, अशी मागणीही मनसेनं केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद: मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सामना...हा तर आमचाच पेपर आहे: अजित पवार
‘ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प दिशाभूल करणार आहे. तसंच हा अर्थसंकल्प विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करणारा आहे, अशी टीका भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, ‘अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भाला काहीही दिले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर दिशाभूल करणारे आहे. सिंचनाबद्दल उपमुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. तसंच, हा एकांगी आणि जनतेची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आहे. केवळ राजकीय भाषण, राजकीय टोलेबाजी शिवाय उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणात काहीच नव्हते, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाकडून चूक झाली, पण चुकीला माफी नाही...बरोबर ना मुख्यमंत्रीसाहेब
‘हो आम्ही शिवसेनेला फसवलं, आमची चूक झाली’ या सुधीर मुनगुंटीवार यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला चांगलेच चिमटे काढले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली पण आता चुकीला माफी नाही, हे वक्तव्य करताना बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजित पवारांनी कटाक्ष टाकला, त्यावर मानेने नकार देत उद्धव ठाकरे यांनीही चुकीला माफी नसल्याचं सुचित केलं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोणी ज्योतिरादित्य निर्माण होईल याची ५ वर्ष वाट बघत बसा - अजित पवार
राज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली, कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी