महत्वाच्या बातम्या
-
रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग...
तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले होते. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला आणि नव्याने तयारी सुरु केली होती.
5 वर्षांपूर्वी -
'तो' शब्द भाजप पक्षातील नेत्यांकडूनच फिरवला गेला: सुधीर मुनगंटीवार
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये आम्ही जे काही ठरविले होते, त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारकत घेतली. त्यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी फारकत घेतली, असं धक्कादायक विधान माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ICSE बोर्डाचे सीईओ व आदित्य ठाकरेंची भेट; मुंबई पालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावणार
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची आज आयसीएसई शिक्षण बोर्डाचे सीईओ गॅरी अरॅथॉन यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा झाली. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आयसीएसई दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आदित्य ठाकरे प्रयत्न करत असून, त्यानिमित्त ही भेट झाल्याचं त्यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार संत गाडगेबाबांच्या 'दशसुत्री' प्रमाणे काम करेल: मुख्यमंत्री
संत गाडगेबाबा यांच्या ‘दशसुत्री’ शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालय येथे केले. दरम्यान आज मंत्रालयात कोरोनाच्या संदर्भातील महत्वाची बैठक पार पडली.
5 वर्षांपूर्वी -
प्रियांका चतुर्वेदी इंग्रजी चांगल्या बोलतात...म्हणून; खैरेंचा आदित्य ठाकरेंना टोला?
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा न्यूजचं वृत्त खरं ठरलं; नवख्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा हात सोडून शिवबंधन बांधणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेतल्या ५५ जागांसाठी मार्च अखेरीस मतदान होत आहे. यात राज्यातल्या ७ जागांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत चुरस पाहायला मिळत होती. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत पाऊल ठेवण्यास इच्छुक होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेतील जुनेजाणते नेतेही शर्यतीत असले तरी शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं वृत्त महाराष्ट्रनामा न्यूज’ने काही दिवसांपूर्वी दिलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातून पुण्यात ८ तर मुंबईत २ कोरोनाग्रस्त रुग्ण : मुख्यमंत्री
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहे. हे १० जण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, पण ते गंभीर नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनही याच आठवड्यात गुंडाळणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईतील दोघांच्या कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आढळले आहेत. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या दोघांच्या चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या असून राज्यातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा हा ७ वर पोहचला आहे. राज्यात दुबईहून परतलेल्या पुण्यातील कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कुटुंबियांच्या विमानातून मुंबईत आढळलेल्या रुग्णांनी प्रवास केला होता. या रुग्णांवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार सुद्धा पडणार असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांना मुडेंचं प्रतिउत्तर
मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिकन-मटण खाल्ल्याने कोरोना व्हायरल होत नाही: अजित पवार
राज्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन दिवसांत ५ वर पोहचली आहे. पुण्यातील दुबईहून परतलेल्या एकाच कुटुंबियांतील तिघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील कोरोनाचा धक्कादायक आकडा समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (आज) बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्लॅकमेल करण्याचे प्रकार करू नका...हे बरे झाले: शिवसेना
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार... - सविस्तर वृत्त
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
पुन्हा ‘शॅडो’वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच; शिवसेनेकडून मनसेची खिल्ली
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयाचेच शिवसेनेने बुधवारी वाभाडे काढले. मनसेच्या शॅडो मंत्रिमंडळाच्या निर्णयावर शिवसेनेने कडाडून टीका केली. राज्यात १०५ आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले नाही. पण एकमेव आमदारवाल्यांनी शॅडो मंत्रिमंडळ तयार केले असे सांगत नाव न घेता मनसेवर टीका करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
१४ वर्ष कधीही 'प्रकाशात' न आलेल्यांनी शॅडो कॅबिनेटचा निर्णय घेतला: काँग्रेस
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसेने राजकारणासाठी शॅडो कॅबिनेट केली असेल तर आम्ही...शिवसेनेची प्रतिक्रिया
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही: शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी आम्हाला काही प्रदर्शन करण्याची गरज नाही. आमची छाती फाडली तर त्यात रामच दिसेल असं ते म्हणाले होते. त्यावर आता शिवसेनेने पलटवार केलाय. ‘सामना’च्या अग्रलेखातून पाटील यांचा ठाकरे शैलीत समाचार घेण्यात आलाय.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या वंचित विरुद्ध पवार आक्रमक
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. २६ फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर ४५ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या फॉलोअर्सना ट्रोल करण्याचा देखील अधिकार: अदिती तटकरे
भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारा आणि ट्रोल करणाराही मोठा वर्ग आहे. याबाबतच बोलतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
भुजबळ म्हणाले; राज ठाकरेंनी प्रबोधनकारांची शिकवण लक्षात ठेवावी...पण का? - सविस्तर
कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांनी रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. येत्या २४ तारखेला संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रूक याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ते कृष्णकुंज येथे आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा झाली. राज ठाकरे आणि एकबोटे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमा प्रकरणातील मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला

5 वर्षांपूर्वी