महत्वाच्या बातम्या
-
गांधींना मारणारा हिंदूच होता; १५% मुस्लिमांच्या नावाने ८५% हिंदूंना भीती दाखविण्याचा प्रयत्न
नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमविरोधी आहेच, पण तो प्रत्येक गरीबाच्या विरोधात आहे, असं विधान अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे. १५ टक्के मुस्लिमांच्या नावाखाली ८५ टक्के हिंदूंना भीती दाखवून त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. पुण्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान, या कार्यक्रमात हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भाजपचे जवळचे लोक: गृहमंत्री
कोरेगाव-भीमामधील हिंसाचार भडकविण्यात भारतीय जनता पक्षाच्या जवळचे लोक होते, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. अशा लोकांचे पितळ उघडे पडेल या भीतीनेच एनआयएची चौकशी लावली असे देशमुख यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. या हिंसाचार प्रकरणी राज्य व केंद्र सरकारमध्ये गेले काही दिवस तणातणी सुरू आहे. देशमुख म्हणाले, या हिंसाचारामागील वास्तव समोर यावे म्हणून खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. त्यावर काही कार्यवाही होण्याआधी केंद्राने एनआयए चौकशीचे आदेश दिले. राज्य सरकारने एसआयटीमार्फत चौकशी केली असती तर या भाजपच्या विचारांविरुद्ध बोलणाऱ्यांची नावे हिंसाचार प्रकरणात गोवल्याचे उघड झाले असते.
5 वर्षांपूर्वी -
मंत्री अस्लम शेख यांना मनसेच्या मोर्चावर शंका; तर शेख यांना बॉम्बस्फोटातील दोषीची दया आली होती
‘बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,’ या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. परंतु या मोर्चाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे. मोर्चा संबंधित मान्यता मिळण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी पोलिसा अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कृष्णकुंज'वर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी; भगव्या मनसे मोर्चाची चर्चा देशभर होणार
राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची कास धरल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय. या वाढत्या भेटींमुळे ९ फेब्रुवारीच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला भारतीय जनता पक्ष छुप्या पद्धतीने सहकार्य करणार असल्याची चर्चा सुरु झालीय.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे नाराज आमदार तानाजी सावंत अखेर मातोश्रीवर
शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. तसेच राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर कोणतेच पद न मिळाल्याने जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ.तानाजी सावंत हे नाराज होते.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेतील सहकारी म्हणतात; ठाकरे सरकार ६ ते ८ महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री १०० दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत. फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - फरहान आझमी उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार; चितावणीखोर धार्मिक भाषण
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फरहान यांचे म्हणणे आहे की, मुख्यमंत्री १०० दिवस पुर्ण झाल्यावर अयोध्येत जाण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुस्लिमांना घाबरत आहेत असं फरहान आझमी म्हणाला आहेत. फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्ही सुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार. फरहान यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचा भगवा मोर्चा मोहम्मद अली रोडवरूनच जाणार असल्याने प्रशासन पेचात
‘बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी मुसलमानांना हाकलून द्या,’ या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच एक मोर्चा काढणार आहे. परंतु या मोर्चाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं घेतलेल्या भूमिकेमुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या मोर्चासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून जिजामाता उद्यान, भायखळा ते आझाद मैदानाचा मार्ग मागण्यात आला आहे. मोर्चासंदर्भात आयोजित बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा हा निर्णय झाला आहे. हा मोर्चा मोहम्मद अली रोडवरुन नेण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आग्रही आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील पेच वाढण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन
स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदिरा गांधींबद्दलच्या वक्तव्यावरून अशोक चव्हाण यांच आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर
जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल” असं आव्हाड म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार करुन मुनगंटीवारांनी ५०० कोटींचा बंगला बांधला: अमोल मिटकरी
महाराष्ट्रात शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळीकडून विविध मुद्यांवरून आरोप केले जात आहे. त्यात आता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर वृक्ष लागवडीत मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एनसीपीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी हे आरोप केले आहे. ठाण्यातील एका जिमच्या उदघाट्न कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
आजचा भारत बंद सरकार पुरस्कृत; मनसेचा धक्कादायक आरोप
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नागरकत्व नोंदणी (NRC) आणि ईव्हीएमविरोधात बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज (29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय, देशात डीएनएच्या आधारावर राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसी लागू व्हावा, अशीही मागणी करण्यात येत आहे. व्यापारी, दुकानदार, शैक्षणिक संस्था, नागरिकांनी या भारत बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे. या भारत बंदला शाहीन बागमधील आंदोलक महिलांनाही पाठिंबा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव प्रकरणी देवेंद्र फडणवीस चौकशीच्या फेऱ्यात अडकणार?
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशी आयोगासमोर उलट तपासणी करा, अशी मागणी कर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय लाखे पाटील यांनी केली आहे. आपल्या विशेषाधिकाराचा वापर करुन देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझं CAA'ला समर्थन नाही; मोर्चा घुसखोर पाकिस्तानी-बांगलादेशीं विरोधात: राज ठाकरे
राज ठाकरे यांनी आज सीएए’बाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या देशात सीएए-एनआरसीविरोधात निघणाऱ्या मोर्चांविरोधात आपण मोर्चा काढणार, मोर्चाला मोर्चानं उत्तर देणार अशी भूमिका राज ठाकरेंनी जाहीर केली होती. यानंतर आता राज यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दलची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. माझं सीएएला समर्थन नाही. मनसेचा ९ फेब्रुवारीला निघणारा मोर्चा कायद्याच्या समर्थनार्थ नसेल, तर घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्या मोर्चांविरोधात असेल, असं म्हणत राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची कृष्णकुंज'वर पदाधिकाऱ्यांशी पुन्हा महत्वाची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मला हिंदूह्रदयसम्राट म्हणू नका अशी सूचना पदाधिकाऱ्यांना केली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक काल आयोजित करण्यात आली होती. रंगशारदा येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला राज ठाकरे मार्गदर्शन करणार होते. मात्र राज ठाकरे १० मिनिटांतच बैठकीतून निघून गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांची तब्येत ठीक नसल्याने ते बैठकीतून निघून गेल्याचं सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार: सत्य बाहेर येण्याच्या भीतीने ‘एनआयए’कडे तपास दिला; पवारांचा केंद्रावर आरोप
भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी’कडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,’ असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राऊत म्हणाले होते; कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहिल्यास राम मंदिर बनायला १,००० वर्षे लागतील
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाची साथ सोडून थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत महाविकास आघाडी स्थापून सरकार बनवल्याने शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत सापडली आहे. त्यात मनसेने हिंदुत्वाच्या राजकारणाला सुरुवात केल्याने शिवसेना पेचात सापडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अयोध्या दौरा: राऊतां'कडून पुन्हा ७ मार्च तारीख जाहीर; आधी १६ जुन जाहीर केली होती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या ७ मार्च या दिवशी अयोध्येला जाणार असल्याचे शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे राऊत यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याच प्रमाणे ते शरयू नदीतीरावर आरती करतील अशी माहितीही राऊत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आधुनिक अफजल खानानी मराठी आणि हिंदूंच्या पाठीत खंजीर खुपसला: संदीप देशपांडे
राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे आणि मनसेला सामाना वृत्तपत्रात स्थानच नव्हतं. अगदीच राज ठाकरेंच्या मनसेची एखादी बातमी आलीच तरी त्या बातमीला एखादा कोपराच मिळत असे. मात्र ज्यावर आजपर्यंत राजकारण केलं तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि महाविकास आघाडीत सरकारमध्ये झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्याची कोंडी यामुळे शिवसेना पेचात अडकली आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणामुळे कोंडी झाली असताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला हात घालताच शिवसेनेच्या जळफळाटाने मनसे आणि राज ठाकरे यांना थाट सामनाच्या अग्रलेखात स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेची या मुद्यावरून किती कोंडी झाली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या राज'मार्गामुळे सेनेचा थयथयाट? राज यांना थेट सामना'च्या अग्रलेखात स्थान
राज ठाकरे यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन मनसेची स्थापना केल्यापासून राज ठाकरे आणि मनसेला सामाना वृत्तपत्रात स्थानच नव्हतं. अगदीच राज ठाकरेंच्या मनसेची एखादी बातमी आलीच तरी त्या बातमीला एखादा कोपराच मिळत असे. मात्र ज्यावर आजपर्यंत राजकारण केलं तो हिंदुत्वाचा मुद्दा आणि महाविकास आघाडीत सरकारमध्ये झालेली हिंदुत्वाच्या मुद्द्याची कोंडी यामुळे शिवसेना पेचात अडकली आहे. त्यामुळे बदलत्या राजकीय समीकरणामुळे कोंडी झाली असताना राज ठाकरे यांनी हिंदुत्वाला हात घालताच शिवसेनेच्या जळफळाटाने मनसे आणि राज ठाकरे यांना थाट सामनाच्या अग्रलेखात स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून शिवसेनेची या मुद्यावरून किती कोंडी झाली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी