महत्वाच्या बातम्या
-
भाजपच्या आयात आणि निष्ठावंतांमध्ये तणाव वाढण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा यु-टर्न
मुंबई: मेगाभरतीमुळं भाजपची संस्कृती बिघडली असं विधान करणारे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी घूमजाव केलं आहे. लोकसभा आणि विधानसभेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नेत्यांमुळं भारतीय जनता पक्षाला फायदाच झाला असं स्पष्टीकरण आज चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. पिंपरीतल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात खंत व्यक्त करणारे सूर आळवले होते. त्यामुळं चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर भाजपच्या आयात आणि निष्ठावंतांमध्ये तणाव वाढण्यापूर्वीच चंद्रकांत पाटलांचा पत्रकार परिषद घेऊन यु-टर्न घेतल्याचं म्हटलं जातं आहे. त्यांच्या विधानाने फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या एकाधिकारशाहीकडे देखील अनेकांनी बोटं दाखवलं.
5 वर्षांपूर्वी -
या भांडणातून बाहेर पडा आणि देशाच्या विकासासाठी काम करा: आदित्य ठाकरे
राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेसाठी विरोधी पक्ष फोडून केलेली मेगाभरती भाजपाला आज चुकीची वाटतेय: सचिन सावंत
विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला विरोधात बसावं लागल्याचं मोठं दुःख आहे. त्यात भारतीय जनता पक्षातील जुन्या जाणत्या अनेक निष्ठावंतांना पक्षात तिकीटं मिळाली नाही याचा देखील प्रचंड राग आहे. त्यामुळे खुद्द महाराष्ट्र पक्षाध्यक्षांनीच निवडणूकपूर्व मेगाभरतीला वाचा फोडल्याने भारतीय जनता पक्षातील हा सुप्त असंतोष कदाचित मोठ्या प्रमाणावर वाढीस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन कृष्णकुंज'वर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन येत्या २३ तारखेला मुंबईत होणार असून त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्या रूपात दिसणार असल्याचं वृत्त आहे. यावेळी तब्बल एक लाख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाचा नवा झेंडा जाहीर करणार आहेत असं म्हटलं जातं. मात्र या मेळाव्याचं नवं पोस्टर प्रकाशित करण्यात आलंय. पोस्टरवर भगव्या रंगात महाराष्ट्राचा नकाशा दाखविण्यात आलाय. आधिचा पंचरंगी झेंडा पोस्टरवरुन गायब झालाय. राज ठाकरेंची महाराष्ट्रधर्माची भूमिका असणार असल्याचं स्पष्ट झालंय. सततच्या अपयशाला दूर सारण्यासाठी राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ निर्माण करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.
5 वर्षांपूर्वी -
संदीप देशपांडेंचं ते ट्विट सत्य; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ: सविस्तर वृत्त
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'युवराजांचा' नाईट लाईफचा हट्ट पुरविण्यास राष्ट्रवादी सज्ज? स्वतःची पोस्टरबाजी आज अंगलट
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
नको आम्हाला नाईट लाईफ, होईल त्याने वाईट लाईफ; राष्ट्रवादीचं ते विरोध प्रदर्शन: सविस्तर
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
२६ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर ‘नाईट लाईफ’ सुरु होणार: आदित्य ठाकरे
मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार असल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबई रात्रभर जागणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई: हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मराठी अभिनेत्रीची सुटका
मुंबई पोलिसांनी अंधेरी पूर्वेकडील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये चालविले जाणारे हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उध्वस्त केले आहे. पोलिसांनी छापा टाकून २९ वर्षीय महिलेला अटक करण्यात आले आहे. तसेच तीन अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. सुटका केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदेश रेवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र धर्म आणि भगव्या हिंदुत्वाची सांगड; मनसेचे शिवसेना भवनासमोर पोस्टर
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या झेंड्यात बदल करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होतं असताना त्याला मनसेत कोणीही जसे स्वीकारले तसेच नाकारले देखील नाही. मात्र भविष्यात भगवे बदल होणार याचे अप्रत्यक्ष संकेत मात्र दिले आहेत. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलत्या राजकारणाला अनुसरून एकतर सेक्युलर भूमिका स्वीकारेल किंवा हिंदुत्वाची असे निरनिराळे अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पॅरोलवरील कुख्यात दहशतवादी 'डॉ. बॉम्ब' मुंबईतून फरार
१९९३ मधल्या मुंबईतल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी जलीस अन्सारी गुरुवारी मुंबईतून गायब झाला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो २१ दिवसांच्या पॅरोलवर कुटुंबीयांशी भेटण्यासाठी तुरुंगाबाहेर आला होता. आग्रीपाडा पोलीस स्टेशनला तो बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र एटीएस आणि क्राइम ब्राँचनं हाय अलर्ट जारी केलं आहे. तसेच दहशतवादी जलीस अन्सारीला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
योगेश सोमण सुट्टीवर गेले, गणेश चंदनशिवे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी संचालक
मुंबई विद्यापीठाच्या थियेटर ऑफ आर्ट्सचे संचालक योगेश सोमण यांना आम्ही सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला असून ते सुट्टीवर गेल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. दरम्यान त्यांच्या जागी प्रभारी संचालक म्हणून प्राध्यापक गणेश चंदनशिवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेट्रो भवन: फडणवीसांच्या काळात १५ हजार कोटीचा गैरव्यवहार? काँग्रेसकडून कॅगचा पुरावा
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यकाळातील घोटाळ्यांबाबत धक्कादायक आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ आणि २९ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस सरकारच्या काळातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये टेंडरचा आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळा उघडकीस आणला होता. यासंदर्भात काँग्रेसने केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदिराजींबद्दल कोणताही शिवसैनिक अपशब्द काढणार नाही: आदित्य ठाकरे
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीविषयी संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सारवासारव केली आहे. “शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जे विधान केले, ते वेगळ्या कारणांमुळे होते. कोणताही शिवसैनिक इंदिराजींबद्दल अपशब्द काढणार नाही,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
RNA ग्रुपच्या ४०० कर्मचाऱ्यांचे २ वर्षाचे पगार थकले; कामगारांचं राज ठाकरेंना पत्र
आरएनए ग्रुपच्या सुमारे ४०० कर्मचारी-कामगारांना मागील २ वर्षं पगार मिळालेला नाही. आपल्या हक्काचे पैसे व देणी कंपनीकडून मिळवण्यासाठी ह्या कर्मचाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. अखेर आरएनए ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच पत्र लिहून या प्रकरणात “न्याय मिळवून द्या तसेच कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवकणूक व दमदाटी करणाऱ्या आरएनए मालकाला धडा शिकवावा”, अशी विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का?; फडणवीसांचा काँग्रेसला सवाल
आता दाऊदच्या इशाऱ्यावर राज्य चालवायचं का? असा सवाल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय. काल संजय राऊत यांनी एका मुलाखतीमध्ये अंडरवर्ल्डबाबत विधान केलं होतं. यामध्ये इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायला मुंबईत येत होत्या, याचसोबत मंत्रालयात अंडरवर्ल्डचे गुंड येत जात असायचे, असं देखील संजय राऊत म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फैलावर घेत काही गंभीर सवाल उपस्थित केलेत. काँग्रेसने संजय राऊत यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं असं देखील फडणवीस म्हणतायत.
5 वर्षांपूर्वी -
पोरी पळवण्याचं भाष्य करणारे राम कदम शिवप्रेमी? कदमांकडून राऊतांची पोलिसात तक्रार
उदयनराजे यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असे नाव करावे, असे म्हटले होते. यावर राऊत म्हणाले होते की, उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि आम्ही त्यांना दैवत मानतो. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावे लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई ९/११ हल्ला: त्यानंतर मी 'लादेनला' दम दिला होता; मनसे नेत्याकडून राऊतांची खिल्ली
मी दाऊद इब्राहिमला दम भरला आहे, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांना कानपिचक्या लगावण्यात आल्या आहेत. मी ओसामा बिन लादेनशी बोललो होतो, असं ट्वीट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. तर मनसैनिकांनी आपली गाडी जाळल्याचं संजय राऊतांनी सांगितल्यावर, राज ठाकरेंकडून तुम्ही नवीकोरी गाडी घेतली होतीत, अशी आठवण देखील देशपांडेंनी करुन दिली.
5 वर्षांपूर्वी -
अच्छे दिन येतील तेव्हा येतील 'निदान बरे दिन होते ते तरी आणा' - शिवसेना
महागाईच्या मुद्द्यावरून अग्रलेखात भारतीय जनता पक्षाच्या ‘अच्छे दिन’ या संकल्पनेची खिल्लीही उडवण्यात आली आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील, पण महागाई आटोक्यात आणून निदान जे काही बरे दिन होते ते तरी सामान्य माणसाच्या जीवनात आणा, असा टीका वजा सल्ला अग्रलेखाद्वारे देण्यात आला आहे. ‘महंगाई डायन मारी जात हैं’ असा प्रचार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत करून ज्यांनी सत्ता प्राप्त केली त्यांच्या राजवटीत तीच महंगाई डायन पुन्हा सामान्य जनतेच्या मानगुटीवर बसली आहे, असे म्हणत जे लोक या परिस्थितीविरुद्ध बोलतात त्यांना देशविरोधी ठरवायचे काम भक्त मंडळी आहेत, अशा शब्दात शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजेंचा सातारा येथे पराभव घडवून आणल्याचे सांगत..राऊतांच भाजपकडे बोट
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज उदयनराजे यांना शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावेच घेऊन येण्याचे आव्हान दिले होते. हा वाद एवढ्यावरच थांबलेला नसून आता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनीदेखील यामध्ये उडी घेतली आहे. शिवरायांच्या घराण्यात आम्ही जन्माला आलोय, हे जनतेला माहिती आहे. वेगळे पुरावे द्यायची गरज नसल्याचे सुनावतानाच त्यांनी हा वाद संजय राऊत यांनी सुरू केला आहे, त्यांनीच संपवावा असे आवाहन केले होते. यावर संजय राऊत यांचे नुकतेच ट्विट आले आहे.
5 वर्षांपूर्वी