महत्वाच्या बातम्या
-
छत्रपतींचा अपमान भाजपा सहन करणार नाही: चंद्रकांत पाटील
उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.
5 वर्षांपूर्वी -
जाणत्या राजाचे सैनिक की मुंबईचे नवाब? कप्तानगिरीत कामगारांचे हातपाय तोडण्याची भाषा
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जवळपास एक महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रभागात वर्क ऑर्डरशिवाय काम सुरु असल्याचं लक्षात आल्यानंतर कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केली. तसेच कामगारांना हात पाय तोडण्याचीही धमकी दिली. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
बंधूंमध्ये राजकीय फूट? वंचित'च्या अपयशामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य: आनंदराज आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
शर्मिला ठाकरेंच्या पुढाकाराने व्हेंटिलेटरवरील वाडिया इस्पितळास अर्थमंत्र्यांकडून ४६ कोटी देण्याचं मान्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी थेट मंत्रालयात दाखल झाल्या आहेत. या भेटीत त्या अजित पवार यांच्यासोबत वाडिया हॉस्पिटलच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. शर्मिला ठाकरे यांनी वाडियाचा प्रश्नात व्यक्तिगत लक्ष घातलं आहे. काल देखील त्यांनी स्वतः वाडिया येथील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या.
5 वर्षांपूर्वी -
मी स्वत: देखील राणेंच्या संपर्कात आहे; भुजबळांकडून राणेंची खिल्ली
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत न जाता राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले. याबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता, “भारतीय जनता पक्ष कोणाकडे गेली नव्हती. शिवसेना स्वत: आली होती. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कुणाचीही फिकीर नाही. खरतर काळजी करण्याची गरज त्यांना आहे. कारण त्यांचे ५४ पैकी ३५ आमदार नाराज आहेत”, असे नारायण राणे म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी देखील मोदींची तुलना महाराजांशी केली होती; सचिन सावंत यांनी ट्विट केला व्हिडिओ
‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचा संबंध नाही कसा? दिल्ली पक्ष कार्यालयातच पुस्तक प्रसिद्ध झाले: शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणारं ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी पुस्तक मागे घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल रात्री उशिरा दिली. मात्र यावरुन शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाचा लक्ष्य केलं आहे. ‘आज के शिवाजी’ पुस्तक म्हणजे ढोंग अन् चमचेगिरीचा सर्वोच्च नमुना असल्याची टीका शिवसेनेनं ‘सामना’मधून केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने संभाजी भिडेंना सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे असं म्हटलं होतं: सविस्तर वृत्त
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
मोदींनी सात जन्म घेतले तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी करता येणार नाही
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही; शर्मिला राज ठाकरे देखील मैदानात
अत्यंत जुनं आणि लहान मुलांचं स्पेशलिस्ट असलेलं वाडिया रुग्णालय आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे वाडियामधील सर्व रुग्ण, कर्माचारी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज लाल बावटा कामगार संघटनेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
5 वर्षांपूर्वी -
मूठ आवळून 'बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय' बोलणाऱ्या फडणवीसांची पुस्तकावरून बोलती बंद?
दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
उदयनराजेंना, शिवेंद्रराजेंना आणि छत्रपती संभाजी राजेंना हे मान्य आहे का? - संजय राऊत
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं हे पुस्तक दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रकाशित झालं आहे. मात्र, या पुस्तकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटणारं नाही.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंचा खऱ्या अर्थाने सक्रिय राजकारणातील प्रवेश आणि भविष्यातील आव्हाने: सविस्तर वृत्त
अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. अमित ठाकरे राजकारणात सक्रिय कधी होणार याची सर्वत्र कायमच चर्चा होती. अशात आता अमित ठाकरे राजकारणात पूर्णपणे सक्रिय होणार याबात आता माहिती समोर येतेय. येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पाहिलं वाहिलं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनातच अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होणार असल्याचं समजतंय.
5 वर्षांपूर्वी -
जेएनयू हल्ला: होय देश संकटात आहे; सुनील गावसकर यांची प्रतिक्रिया
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचारावर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू लिटील मास्टर सुनील गावसकर यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. देश संकटात आहे, असे गावसकर यांनी म्हटले आहे. लाल बहादूर शास्त्री स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून आ. तानाजी सावंत यांना धडा शिकविण्याची तयारी; पक्ष शिस्तीचा संदेश देणार?
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षाला मदत केली होती. मात्र सध्या शिवसेना त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी करत असल्याचं वृत्त आहे. शिवसेना पक्ष त्यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पक्षविरोधी करवाई केल्याने सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची देखील पदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचं महाअधिवेशन आणि शिवसेनेचा जल्लोष मेळावा एकाच दिवशी
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेना वारंवार लक्ष होताना दिसत आहे. तसेच आघाडीचं सरकार असल्याने शिवसेना देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेस दुखावली जाणार नाहीत याची काळजी घेताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हायप्रोफाईल SEX रॅकेट उघडकीस; मुंबई पोलिसांकडून दोन बॉलिवूड अभिनेत्री ताब्यात
गोरेगावमध्ये मुंबई पोलिसांनी सेक्स उघडकीस आणले आहे. रॅकेटमध्ये सहभागी असल्याप्रकरणी दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. गोरेगाव पूर्व येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकला. या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. माहिती योग्य असल्याची खात्री होताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी एक ३२ वर्षीय आणि २६ वर्षीय अभिनेत्री-मॉडेलला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेरजेच्या राजकारणावरून मनसे नेत्यांचा सुरात सूर; संदीप देशपांडेंचं 'बेरजेवर' ट्विट
देशातील एकूण राजकरण बदललं आहे, मात्र ध्येय धोरणांमध्ये गुरपटलेली मनसे तत्वांच्या आड नेहमीच पक्ष फायद्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आल्याने, आज मोठी राजकीय किंमत मोजत आहे. पक्षाचं नुकसान आणि पक्ष संपला तरी चालेल, पण समाज माध्यमांवर आम्ही तोंडघशी पडताकामा नये अशाच अविर्भावात मनसेचे कार्यकर्ते अनेकदा वावरताना दिसतात. आपण एक राजकीय पक्ष आहोत की समाज सेवी संस्था याचा अजून कारकर्त्यांनाच उलगडा झालेला दिसत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ज्याप्रमाणे नैतृत्व घेईल तो निर्णय पक्ष हिताचा समजून, केवळ बेरजेचं राजकरण समजून घेतात ते मनसेच्या कार्यकर्त्यांना स्वीकारताना अत्यंत कठीण असल्याचं दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी: प्रकाश आंबेडकर
मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी झाली आहे, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो: फडणवीस
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
5 वर्षांपूर्वी