महत्वाच्या बातम्या
-
मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाच्या अखेर मुसक्या आवळल्या!
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी पाटणा विमानतळावरुन त्याला अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याला २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे. एजाज लकडावाला मुंबई पोलिसांच्या वॉण्टेड यादीत होती. २००३ मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला अशी अफवा पसरली होती.
5 वर्षांपूर्वी -
संघ विचारांच्या कुलगुरूंच्या नियुक्त्या रद्द करा: आशिष देशमुख
संघ विचारांच्या कुलगुरु आणि प्र कुलगरु यांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) संघाच्या विचारांचे कुलगुरु आहेत, त्यामुळे तेथे काय झालं हे सर्वांनी पाहिलं आहे. तशी स्थिती राज्यात निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
CAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा
सुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका: पवारांचा स्वपक्षिय मंत्र्यांना सल्ला
राज्यात तीन पक्षांचे मिळून संयुक्त सरकार असल्याने मंत्र्यांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (ता.8) पक्षाच्या मंत्र्यांना केली. आपल्या मतदारसंघातील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांशी राजकारण करु नका. विकासकामे करताना त्यांना विश्वासात घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
पालकमंत्री जाहीर; आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगर तर अजित पवारांकडे पुणे
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगर जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा सेनेवर काहीही परिणाम होणार नाही: कृषीमंत्री दादा भुसे
२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
आपण इथल्या विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि आपण...पुढे काय म्हणाली सोनाली?
जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहेत. त्या कॅम्पसमधील आंदोलनात अनेक सिलीब्रीटी व्यक्ती देखील सामील होतं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. दरम्यान, मराठी कलाकारांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. मराठी चित्रपट श्रुष्टीतील अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णीने देखील या घटनेचा निषेध करत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सोनाली कुलकर्णीने ट्विटवर संताप व्यक्त करत केंद्र सरकारवर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ‘आपण आपल्याच देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाही आणि आपण इतर देशातील अल्पसंख्याकांना सुरक्षा द्यायला निघालो आहोत’ असं ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आणि फडणवीस यांची गुप्त बैठक; मनसे-भाजप एकत्र येण्याचे संकेत?
माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे अशी माहिती समोर येते आहे. दुपारी ३.३० वाजता फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या दोघांमध्ये १ तास चर्चा झाली असे समजते आहे. २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंगही बदलणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
तो पोस्टर काश्मीरमधील निर्बंध, ठप्प व्यवहार व इंटरनेट बंदी संबंधित; तरुणीचं स्पष्टीकरण
दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा या मागणीसाठी होते असा दावा केला.
5 वर्षांपूर्वी -
एकीकडे मंत्री नाराज आणि शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
राज्य मंत्रिमंडळाचे रखडलेले बहुचर्चित खातेवाटप तब्बल ७ दिवसांनंतर अखेर रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले. पसंतीची खाती न मिळाल्याने काही मंत्र्यांमध्ये नाराजी पसरली. राजीनाम्याची हूल दिलेले शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना ‘मातोश्री’वर समज देण्यात आली. राष्ट्रवादीत धक्कातंत्राचा अवलंब करण्यात आल्याने ज्येष्ठ नेत्यांची पंचाईत झाली, तर मंत्रिपदे न मिळालेल्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे सांगण्याची वेळ काँग्रेसवर आली. एका बाजूला असं चित्र असताना दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र मनसेकडे जात असल्याचं दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
हे असले बिनडोक फडणवीस यांचे सल्लागार होते; वरुण सरदेसाईंचा श्वेता शालिनी यांना टोला
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सल्लागार म्हणून परिचित असलेल्या श्वेता शालिनी यांच्यावर शिवसेना युवा नेते वरुण सरदेसाई यांनी जेएनयू’संबंधित ट्विट वरून खोचक टीका करत, फडणवीस यांना देखील अप्रत्यक्ष लक्ष केलं आहे. JNU’मध्ये काल रात्री झालेल्या हल्ल्यावरून देशभर आंदोलन आणि घटनेवर टीका होतं असताना श्वेता शालिनी यांनी भलतंच ट्विट केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
JNU हल्ला: ही तर २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याची आठवण: उद्धव ठाकरे
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात हिंसाचार घडवणाऱ्या बुरखाधाऱ्यांचे चेहरे समोर यायला हवेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. चेहरे लपवून हल्ले घडवणारे भेकड आहेत. त्यांच्यात इतकी हिंमत आहे तर मग ते तोंडावर मुखवटे लावून का फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होऊन हल्लेखोरांचे चेहरे देशासमोर यायला हवेत. हा संपूर्ण प्रकार कोणाच्या पाठिंब्यानं झाला ते पुढे कळेलच. त्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्याचा 'मातोश्री'त घुसण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकरी वडील आणि त्यांच्या लहान मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघंही आज दुपारी १२ च्या सुमारास मातोश्रीवर जाण्याच्या प्रयत्नात होते. आपल्या शेताच्या कर्जा संदर्भात झालेला गैरप्रकार सांगण्यासाठी ते रविवारी ‘मातोश्री’वर आले होते अशी प्राथमिक माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
माजी मंत्र्याची सेना सोडण्याची धमकी; पण पक्षासाठी कुचकामी असल्याचं शिवसैनिक म्हणतात
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले की, सध्या तरी महाविकास आघाडीत आलबेल आहेत असं वाटतं, मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, सगळ्यांना दालनं मिळाली आहेत. मात्र गेल्या जानेवारी महिन्यापासून माझ्याकडे कोणतंही काम नाही. राजकारणात खूप गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला मिळत नाही. जानेवारीपासून मला कोणतंही काम मिळालं नाही, मी कामासाठी भूकेला आहे. मी काम मागितलं होतं. पण कदाचित उद्धव ठाकरेंच्या व्यस्त कार्यक्रमामुळे मला काम दिलं नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
२०२२ पर्यंत इंदू मिलमधील स्मारकाचं काम पूर्ण करणार: अजित पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. या परवानग्यांचा केंद्राशी काहीही संबंध नसून राज्यस्तरावरील या परवानग्या आहेत. त्या लवकरच देण्यात येतील आणि येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
त्या अधिकाऱ्यांना PoK'वर पाठवा म्हणाले होते; अन राज्याच्या प्रधान सचिवपदी बढती दिली
राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज मुंबई मेट्रो -३ च्या संचालक अश्विनी भिडे यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अश्विनी भिडे यांना आता प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. तसेच एमएमआरसीएल आणि मेट्रो -३ चे संचालकपदही अश्विनी भिडे यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. आरे येथील मेट्रो-३ च्या कारशेडच्या मुद्द्यावरून अश्विनी भिडे आणि शिवसेना यांच्यात तीव्र मतभेद झाले होते. मात्र हे मतभेद बाजूला ठेवत अश्विनी भिडे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मूळ आडनाव बदलून 'भारतीय' केलं, पण गुजराती-मारवाडी-युपीच्या नेत्यांमध्येच भाजपचा भारत?
‘कंबोज हे स्वतःच मूळ आडनाव बदलून ‘भारतीय’ करून त्यावर मोठा इव्हेंट देखील भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी भरवून आणला होता. मात्र या महाशयांच्या ‘भारतीय’ या व्याख्येत अजून गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय एवढ्याच समाजाचा भारत सामावलेला आहे असंच म्हणावं लागेल. त्यात असे प्रश्न भाजपच्या नेत्यांना केवळ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाबाबतच पडत असल्याने काळाच्या मंत्रिमंडळात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांना स्थान मिळालं नसल्याने त्यांना वेगळीच पोटदुखी होऊ लागल्याचं दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
उद्धवा, अजब तुझे सरकार... किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार’ असं सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे.
5 वर्षांपूर्वी -
या वर्षातील इंटरटेनिंग ट्विट; 'देवेंद्रजी आणि अजित पवारजी तुम्ही करून दाखवलं'
राजकारण म्हटलं की नेते मंडळी नेहमीच स्वतःला समाज माध्यमांवरून एखाद्या घटनेवरून प्रतिक्रिया किंवा मत व्यक्त करत असतात. राज्याच्या राजकारणात अनेक मुख्यंमत्री होऊन गेले, मात्र त्यांच्या अर्धांगिनी कधीच झगमगत्या दुनियेत दिसल्या नाहीत. अर्थात याला अपवाद ठरल्या त्या अमृता फडणवीस.
5 वर्षांपूर्वी -
२ लाखांवरच्या कर्जधारकांसाठी नवीन योजना आणणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाआघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. कोणालाही नाराज न करता हा ३ मित्रपक्षांचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मंत्रिमंळ विस्तारानंतर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी जाहीर पत्रकार परिषद घेत दिली. या विस्तारांनंतर आता २-३ दिवसांमध्ये खातेवाटप होईल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी