महत्वाच्या बातम्या
-
मंत्रिमंडळात भावाला स्थान न मिळाल्याने संजय राऊतांचं नाराजी नाट्य
महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे. अनिल परब, उदय सामंत, अब्दुल सत्तार यांच्यासह १३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मात्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आमदार सुनील राऊत राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तार; राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अपरिपक्वपणा! वर्षा बंगला सोडताना देखील भिंतीवर 'विकृत-प्रवृत्ती' दर्शन?
महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. अशातच मुंबईतील मुख्यमंत्री बंगल्यावर म्हणजेच वर्षावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात आली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे नंतर मुंबई पालिका? अमृता फडणवीस यांच्या ट्विटमुळे AXIS बँक मोठे ग्राहक गमावणार
शिवसेना विरूद्ध अमृता फडणवीस वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचत चालला आहे. अमृता फडणवीस यांच्या टीकेनंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस दलाची खाती एक्सिस बँकेतून वळवल्यानंतर आता ठाणे महानगरपालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे एक्सिस बँकेत खाती आहे. आता या बँकेतील खाती सरकारी बँकेमध्ये ताबडतोब वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी आज तातडीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
5 वर्षांपूर्वी -
डिटेन्शन कँपची पद्धत ब्रिटिशांनी आणलेली; तीच मोदी आणत आहेत: प्रकाश आंबेडकर
“अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
आशिष शेलार यांची Y दर्जाची सुरक्षा काढली; यापुढे त्यांच्यासोबत केवळ २ हवालदार
भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात अनेक व्यक्तींना विशेष सुरक्षा पुरवली होती. त्यात आपलंच सरकार असल्याने अनेक भाजप नेत्यांनी गरज नसताना केवळ स्टेटस दाखविण्यासाठी मोठ्या दर्जाच्या पोलीस सुरक्षा घेतल्या होत्या. सध्या ठाकरे सरकारने त्यासर्व सुरक्षेचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून अनेकांची सुरक्षा घटवून राजकीय टिमक्या मिरवण्यापासून रोखले आहे. त्याचा विशेष फटका भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना देखील बसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहांचं अभिनंदन! लोकांचं मंदी, महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यात ते यशस्वी
सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई कोस्टल रोड प्रकल्प; मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली
मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. प्रकल्पाचे काम सुरू करा, असे निर्देश न्यायालायनं दिले आहेत. या निर्णयामुळं मुंबई महापालिका व राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं १६ जुलै रोजी कोस्टल रोडच्या कामास मनाई केली होती.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच राजकीय भूकंपाचे आठवलेंकडून संकेत, पण कसा ते त्यांना सुद्धा माहित नाही
नागपुरात विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यातच राज्यात राजकीय पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचे विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र नेमका भूकंप कसा शक्य आहे ते देखील त्यांना माहित नसल्याचं दिसलं आणि त्यामुळे केवळ कोणाच्यातरी सांगण्यावरून राजकीय वातावरण दूषित करण्याऱ्या टीममध्ये ते देखील असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी -
वृक्षतोडूवरून सेनेवर कमिशनचा आरोप; पण फडणवीस सरकारच्या आरे वृक्षतोडीवरच भ्रष्टाचाराचं वलय?
मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण २०११ झाडं तोडण्यात आली. मात्र त्यासाठी फडणवीस सरकारने तब्बल २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. म्हणजे सदर आकडेवारीनुसार एक झाड तोडण्यासाठी एकूण १३, ४३४ रुपये एकदा खर्च करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ते कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी आरेतील वृक्षतोडीसाठी नेमका किती खर्च करण्यात आला, याबद्दलची सविस्तर विचारणा माहिती अधिकाराच्या माध्यमातून एमएमआरसीएलकडे केली होती. त्यानंतर सदर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
GST वाद चिघळला! तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, मोदी सरकारवर शिवसेनेची टीका
केंद्र सरकारकडून राज्यांना देणे असलेला वस्तू व सेवा कर अर्थात, जीएसटी (GST) परतावा रखडल्यामुळं संतापलेल्या शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘जीएसटी परताव्यावरून राज्यांची मुस्कटदाबी व आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रकार सुरू असेल तर केंद्रातील ठकसेनांविरुद्ध राज्यांना आवाज उठवावा लागेल,’ असं ठणकावतानाच, ‘तुम्ही व्यापारी असाल तुमच्या घरचे, राज्यांचे पाकीट का मारता,’ असा खडा सवाल शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’तून करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेत मतदारसंघाचे प्रश्न न विचारण्याचे विक्रम रचणाऱ्या आ. कदमांचे राष्ट्रवादीला तारांकित प्रश्न
भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते नवाब मलिक यांना सभागृहाची नियमावली आणि कायदे समजून न घेताच तारांकित ट्विटचे प्रश्न करत आरोप केले आहेत. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक महाराष्ट्राची दिशाफ़ुल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहिर आहेत. आमदारना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजन शून्यता. आणि BAC तारांकित प्रश्नांपासून आमदारना रोखण्यासाठी नव्हती. मात्र त्यावर सभागृहाचे नियम सांगून आ. राम कदम तोंडघशी पडले आहेत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जे स्वीकारलं आहे त्यावर आ. राम कदमांनी हरकत घेतल्याचे समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्व खात्यांचे यथोचित खातेवाटप होईल: अर्थमंत्री जयंत पाटील
राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचे बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर आज जाहीर करण्यात आले. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रीपद तर काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रीपद आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गुपचूप भाजपमध्ये गेलेल्या हाजी अरफात शेख यांचं महामंडळ सुद्धा गुपचूपपणे रद्द
फडणवीस सरकारने निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांचा पंचनामा करतानाच काही वादग्रस्त निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बुधवारी महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द करीत भाजपला धक्का दिला.
5 वर्षांपूर्वी -
काहीजण 'जनपथला' घाबरुन सभागृहातून पळाले: आशिष शेलार
राज्यसभेत बुधवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्याअगोदर ते लोकसभेतही मंजूर झाले होते. या विधेयकाला दोन्ही सभागृहात विरोधकांनी विरोध केला होता. शिवसेनेने लोकसभेत फारसा विरोध केला नाही. परंतु, राज्यसभेत शिवसेनेने विरोध केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सभागृहात या विधेयकावर स्पष्ट मत मांडले. या विधेयकाच्या माध्यमातून मतांचे राजकारण व्हायला नको, असे राऊत म्हणाले. एवढेच काय तर या विधेयकाला विरोध करण्यासाठी शिवसेनेने सभात्याग केला. परंतु, तरीही राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. दरम्यान, शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन भारतीय जनता पक्ष नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं! समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग’ म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचं नेतृत्व अन कार्यकर्ते सुद्धा सक्षम; पण पक्षातील नेते मंडळींचे कार्यक्रम काय? सविस्तर वृत्त
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही हालचाल सुरु नव्हती. मात्र राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे. सर्वाधिक जागा जिंकून भाजपा विरोधी बाकांवर बसले आहे. त्यामुळे एकंदर राज्यातील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली; सोबत ओबीसी समाजाचे नेते देखील
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सेनेचा अपमान छोट्या-मोठ्या गोष्टीं? भाजपा - शिवसेना यांनी एकत्र यायला हवं: मनोहर जोशी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर उत्तम होईल, पण सध्या दोन्ही पक्ष त्या मानसिकतेत नाहीत, असं मनोहर जोशी म्हणाले. मनोहर जोशी यांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचंही यावेळी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
पार्टटाइम गृहमंत्री गेले; मुख्यमंत्र्यांनी महिलांवरील अत्याचारांसंदर्भात तातडीची बैठक बोलावली
देशभरात सध्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांनी मोठ्याप्रमाणावर तोंड वर काढलं आहे. मात्र राज्यात मुख्यमंत्री पदासहित गृहमंत्री पद देखील सांभाळणारे हे केवळ पार्टटाइम गृहमंत्री असल्याचा आरोप विरोधकांनी नेहमीच केला होता. कारण, देशभरात महाराष्ट्र राज्य महिला विषयक गुन्ह्यांमध्ये द्वितीय क्रमांकावर असल्याचं राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २०१७ मध्ये दिलेल्या अहवालात स्पष्ट झालं होतं. तसाही राज्याला गृहमंत्री आहे हे सामान्य माणसाला फडणवीस सरकारच्या काळात कधी माहीतच नव्हतं.
5 वर्षांपूर्वी