महत्वाच्या बातम्या
-
गरीब संजय राऊतांना अगोदर कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या: निलेश राणे
राज्यात सत्तास्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद आता चिघळला आहे . लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळेवेळी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. आता राऊतांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटवरुन जोरदार टीका केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप मुंबई महानगरपालिकेतील पाठिंबा काढणार; तरी सेना सेफ: सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज पुन्हा एकदा बैठक होणार आहे. राज्यातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होणार आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याने अखेर शिवसेना भाजपसोबतचं नातं तोडून आपला मुख्यमंत्री बसवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाण्याची ही तयारी ठेवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांदरम्यान निर्णायक चर्चा सुरु
सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यानंतर आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
'सत्तेपेक्षा तत्व महत्वाचे' असं तत्वज्ञान देणाऱ्या चित्रा वाघ यांना राष्ट्रवादी व नेटिझन्सनी झाडलं
राज्यात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेनेसोबत जाणार की नाही, यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचा दावा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांंनी सांगितले. काॅंग्रेसने ठरविल्याशिवाय राष्ट्रवादी आपला निर्णय घेणार नसल्याचेही राष्ट्रवादीने सांगितले आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाला बहुमत असूनही सत्तास्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी दिलेली मुदत संपतानाच भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की, आम्ही सरकार स्थापन करणार नाही. या निर्णयाचा भारतीय जनता पक्ष नेत्यांनी स्विकार केला.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसमध्ये एकाकी पडलेले संजय निरुपम यांचा सत्तास्थापनेवरून तिळपापड
अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने युतीतील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला. त्यातच देशात स्थिर सरकार देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाल्याने त्याला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला व सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना कळवल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
राज्यपालांकडून दुजाभाव; भाजपाला ७२ तासांचा तर सेनेला २४ तासांचा अवधी दिला: संजय राऊत
शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींकडून आम्हाला सत्ता स्थापन करण्यास कमी कालावधी मिळाल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी भारतीय जनता पक्षाला ७२ तासांचा अवधी दिला होता. पण, शिवसेनेला केवळ २४ तासात सरकार स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. वास्तविक राज्यातील परिस्थिती पाहता, आम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं होतं, पण तसं झालं नाही, असे म्हणत राऊत यांनी दुजाभाव झाल्याकडे लक्ष वेधलं.
6 वर्षांपूर्वी -
प्रामाणिक पत्रकारितेवर भ्याड हल्ला; मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक
प्रामाणिक पत्रकारिता आणि विशेषकरून व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यमांची सातत्याने मुस्कटदाबी होताना दिसत आहे. तशीच घटना रवींद्र आंबेकर आणि निखिल वागले यांच्या टीमने मॅक्समहाराष्ट्र’च्या बाबतीत अनुभवली आहे. कारण मॅक्समहाराष्ट्रचं यूट्युब अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस 'पुन्हा येणार नाहीत'; भाजपच्या शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले असून हे आमंत्रण फडणवीस स्वीकारणार का? बहुमताच्या अग्निपरीक्षेला ते सामोरे जाणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेणार
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.
6 वर्षांपूर्वी -
राज्यपालांनी संधी दिल्याने भाजपने सत्ता स्थापनेचा लाभ घ्यावा: खा. संजय राऊत
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाला सत्तास्थापनेच राज्यपालांकडून निमंत्रण
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याचबरोबर राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे. या अगोदर फडणवीस यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वात सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.
6 वर्षांपूर्वी -
अयोध्येचा वाद मिटल्याचा आनंद, २-३ दिवसांत शिवनेरीवर जाणार: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या जमीन वादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचं स्वागत करताना निकालाचा आनंद जरूर साजरा करा पण कुठेही काही वेडेवाकडे होईल असे वागू नका, असे आवाहन केले आहे. आपण येत्या २-३ दिवसांत शिवनेरीवर तर २४ नोव्हेंबर रोजी पुन्हा अयोध्येत जाणार असल्याचेही उद्धव यांनी जाहीर केले.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात 'पुलोद प्रयोग' हा भाजपच्या अधोगतीची सुरुवात ठरणार: सविस्तर
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव यांचा 'ठाकरी बाणा' महाराष्ट्राला भावला; ठाम राहण्याची अपेक्षा
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
चुकीच्या लोकांसोबत युतीकरून गेलो याचं दु:ख: उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीसांकडून माझ्यावर खोटेपणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी मला खोटं म्हटल्यामुळे मी संवाद थांबवलाय. त्यामुळे यापुढे भाजपा खरं बोलणार असेल तरच युती होईल, असा ठाम पवित्रा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
आ. राजू पाटलांचा सेनेला सावधतेचा इशारा 'धनुष्य आलंय मोडकळीला, जाणीव नाही “बाणा”ला?
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
मी बाळासाहेबांना शब्द दिलेला; पण सेनेला संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न होता: उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आहे. विधानसभेचा कालावधी संपण्याच्या एक दिवस आधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यावेळी मित्रपक्ष शिवसेनेच्या सध्याच्या भूमिकेबाबत त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने कधीच दिला नव्हता. तसेच पुढचं सरकार भारतीय जनता पक्षाच स्थापन करेल, असा पुनरुच्चारही फडणवीस यांनी केला.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईत शिवसेनेच्या आमदारांना पोलीस संरक्षण लागत ही चिंतेची बाब: विनोद तावडे
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे काल शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
युतीतील बोलणी न होण्यास शंभर टक्के शिवसेनाच जवाबदार: देवेंद्र फडणवीस
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अद्याप तरी युती तुटलेली नाही, असं फडणवीस का म्हणाले? मोठे उलटफेर होण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी