महत्वाच्या बातम्या
-
भाजप-सेनेत तणाव विकोपाला गेल्याच फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत उघड?
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पवारांचा शिवसेना आणि भाजपाला मोलाचा सल्ला
सत्ता स्थापनेचा तिढा दोन आठवड्यांनंतरही सुटत नसल्यानं राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली कोंडी सोडवण्याबद्दलचा सल्ला घेण्यासाठी पवारांची भेट घेतल्याचं आठवलेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
काळजीवाहू बनून कोणीही सूत्रं हलवू नयेत; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
‘भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये तिसऱ्या कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन येणार असाल तर बोला,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भूमिका मांडली. त्यामुळं आता सत्तास्थापनेचा चेंडू भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात असून भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचं निधन
राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार यांची ख्याती होती. त्यांनी नेहमीच पोलीस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर सतत हल्ला चढवला होता. यामुळे ते नेहमीच चर्चेत असत. लेखक म्हणूनही अरविंद इनामदार प्रसिद्ध होते.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंनी रंगशारदा हॉटेलमध्ये सर्व शिवसेना आमदारांची भेट घेतली
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे सर्व वाघ मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये बंधिस्त
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही: संजय राऊत
भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापन करायची असेल, तर त्यांच्याकडे १४५ आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. भाजपकडे आत्ता ११५ ते ११७ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, याची शिवसेनेला भिती आहे. त्यामुळेच शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांना अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी -
खासदार संजय राऊत काय ऐकत नाहीत; सकाळ होताच भाजपाची 'शायराना' खिल्ली
मागील काही दिवसांपासून गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत सतत भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत आहेत. समाज माध्यमांवर, सामनातील अग्रलेख, पत्रकार परिषदा यांच्या माध्यमातून राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. आज त्यांनी कवी दुष्यंत कुमार यांचा एक शेर ट्विट केला आहे. ‘तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं,’ असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. यामधून त्यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केल्याची चर्चा आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्ता स्थापनेबाबत भाजप-शिवसेने दरम्यान आज मोठ्या घडामोडी
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील सत्ता स्थापनेबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरी, बुधवारचा दिवस दोन्ही पक्षांच्या नेत्यांना चर्चेच्या टेबलावर आणणारा ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसाबाबतच्या उपाययोजनांसाठी बोलावलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीला शिवसेनेचे सहा मंत्री उपस्थित होते. यातील शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे आज, गुरुवारी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली असून, यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याची गोड बातमी मुनगंटीवार महाराष्ट्राला देतील: संजय राऊत
मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा करुन सरकार बनवले पाहिजे. राज्यपालांना ते १४५ आमदारांच्या पाठिंब्याची यादी देणार असतील तर ती आनंदाची बाब आहे असे राऊत म्हणाले. त्याचवेळी संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा दावा केला. सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्राला लवकरच गोड बातमी मिळेल असे म्हणाले होते. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही ती गोड बातमी आहे असे राऊत म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येणार नाही: काँग्रेस खासदार हुसेन दलवाई
राज्यात सरकार बनण्याबाबतची अनिश्चितता निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातून पुढे जाऊ. मात्र, राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार येणार नाही, असं काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं. दलवाई यांनी आज सामना कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बंद दाराआड सुमारे अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केल्याने राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपा-शिवसेनेनेच सरकार स्थापन करावं: शरद पवार
भाजपा आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार मुंबईतल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर ठाम; शिवसेनेची कोंडी, संजय राऊतांची पंचायत?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानी अवघ्या दहा मिनिटं दोन्ही नेत्यांची भेट झाली. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत मातोश्रीला रवाना झाले. “ही नेहमीप्रमामे सदिच्छा भेट होती. परंतु राज्यातील अस्थिर स्थितीबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी भेटीनंतर माध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार: खा. संजय राऊत
निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ११ दिवस उलटले तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. विशेष म्हणजे महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढत असताना आता नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागले आहेत. युतीच्या राजकारणात मोठ्या भावाचं स्थान गमावलेली आणि मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना नवा घरोबा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यासाठी १९९५ चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील, असं वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं एनसीपीच्या नेत्याच्या हवाल्यानं दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस हे मावळते मुख्यमंत्री: शिवसेना
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी लोटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपद असेल किंवा काही महत्त्वाची खाती असतील यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील वाद अद्यापही सुटला नाही. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत ते मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून नागरिकांवर पाळत ही हुकूमशाहीच: राष्ट्रवादी काँग्रेस
काही दिवसात प्रसार माध्यमातून स्क्रुटिनचा प्रकार धुमाकूळ घालतोय. एनएसआय कंपनीमार्फत देशातल्या काही लोकांच्या माहिती काढल्या जात आहेत, गुजरातमध्ये मागच्या काळात घेडलेला हा प्रकार घडला होता, आता इतर ठिकाणीही घडतोय ही चिंतेची बाब आहे. चौदाशे लोक फेसबुकवर आहेत ज्यांच्यावर यावरून नजर होती. सॉफ्टवेरमार्फत पाळत ठेवली जाते हे फेसबुकने आधी सांगितले होते. याबाबत संपूर्ण माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती, याबातची मीहिती केंद्र सरकारने सर्वांसमोर आणावी असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी अजून सत्तास्थापन झालेली नसली तरी इतर पक्ष मात्र दैनंदिन पक्षीय भूमिकेकडे केंद्रित झाले आहेत. त्यालाच अनुसरून राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नव्या आंदोलनात उतरले आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.
6 वर्षांपूर्वी -
एनसीपीच्या बैठकीत असताना अजित पवारांना संजय राऊत यांचा एसएमएस
केंद्रात सक्रीय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते असं सूचक वक्तव्य एनसीपी’चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनसीपी’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवारांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
खड्डे'युक्त' रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांसाठी मुंबई महापालिका आहेच: नितीन गडकरी
पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं म्हणत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोपरखळी मारली आहे. पार्ले कट्टा कार्यक्रमात नितीन गडकरी आले होते. या कार्यक्रमात पाऊस पडू लागला तेव्हा निवेदिकेने त्यांना सांगितलं की नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडतो आहे पावसाचं काही खरं नाही. त्यावर तातडीने गडकरी उत्तरले की, “पावसात भिजलं की चांगलं भविष्य आहे असं पत्रकार म्हणतात” त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. स्वतः नितीन गडकरींनाही हसू आवरलं नाही.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान: शिवसेना
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू झालेला सत्तास्थापनेबाबतचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवट वक्तव्यावर जोरदार टीकास्त्रे सोडले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करत धमकी दिली असून ही धमकी म्हणजे जनमताचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे गैर असून राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडताना राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला जनादेश दिला असून आम्ही युतीधर्माचे पालन करू अशी भूमिकाही राऊत यांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी