महत्वाच्या बातम्या
-
आदित्य माझ्या मुलाप्रमाणे, तो निवडणूक लढवत असेल तर त्यात गैर काहीच नाही: राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये विकोपाचे वाद असले तरी, ठाकरे कुटुंबीयांनी अजून कौटुंबिक जिव्हाळा जपला असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेबांप्रमाणेच प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यात रस कधीच घेतला नसला तरी पुढच्या पिढीला आडकाठी न घालता त्यांना बदलत्या राजकारणात वेगळे निर्णय घ्यावेसे वाटत असतील तर दोन्ही कुटुंब प्रोत्साहन देतील असच काहीस आहे.
6 वर्षांपूर्वी -
'हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवायची’, मग ५ वर्ष झोपले होते काय? राज ठाकरे
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा शिवसेना आमदार अनिल परब यांनी बोलून दाखवल्यानंतर युवासेनेला स्फुरण चढलं होतं. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी पोस्टरबाजी करण्यात आली होती. संपूर्ण वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘हीच ती वेळ आहे , नवा महाराष्ट्र घडवायची’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मागील ५ वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेली शिवसेना सत्ताकाळ विसरून पुन्हा ‘हीच ती वेळ, नवा महाराष्ट्र घडवायची’ अशी बॅनरबाजी करू लागल्याने त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार: तेजस ठाकरे
कोणत्याही परिस्थितीत आरे वाचावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. माझ्यासारखे अनेक पर्यावरण प्रेमी या लढाईत एकत्र आले आहेत’, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. युवासेनाप्रमुख आणि शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरे यांच्या प्रचार रॅलीत ते सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया साधत असताना त्यांनी आरे वृक्षतोडीवर आपली भूमिका स्पष्ट केली.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्षांत राजीनामे खिशातून निघाले नाहीत: राज ठाकरे
विधानसभा निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहिसरमध्ये येथे सभा झाली. राज यांनी त्यांनी शिवसेना-भाजप सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. शिवसेना-भाजप होर्डिंगच्या खाली लिहिलंय ‘हीच ती वेळ’, यावरून राज यांनी टोला लगावला. राज म्हणाले, मग ५ वर्षे वेळ नव्हता का? गेली ५ वर्ष यांना खिशातले राजीनामे बाहेर काढता आले नाहीत. फक्त धमक्या दिल्या. त्या धमक्याही फक्त पैशाचे काम अडले की देतात.
6 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँक खातेधारकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; सर्व कैफियत मांडली
आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.
6 वर्षांपूर्वी -
वचननाम्यात महिला सक्षमीकरण मुद्दा; दुसरीकडे मुलींना पळविण्याचं भाष्य करणाऱ्याला आशिर्वाद
वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नवा वचननामा प्रसिद्ध; १२ मंत्री व ६३ आमदारांनी ५ वर्षात काय दिवे लावले त्यावर तोंड बंद
“वचननाम्यात वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे. १० रूपयांमध्ये अन्न देण्याचा घेतलेल्या निर्णयात आम्ही बचतगटांची मदत घेणार आहोत. तिजोरीवर कितीवर भार पडेल हा विचार करून आम्ही जेवण १० रूपयांनी देण्याचा निर्णय घेतला आहे. समतोल ढळणार नाही याचा विचार करून वचननामा तयार केला आहे. यातलं एकही मत खोटं ठरणारं नाही,” असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. तसंच घरगुती वीजेचे दरही कमी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई यांच्या उपस्थिती आज हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेच्या या वचननाम्यात आश्वासनांची खैरात वाटण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर: मुख्यमंत्र्यांची सभा फ्लॉप; सभेतील रिकाम्या खुर्च्यांची चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्यभर सभांचा सपाटा लावला असून त्यांच्या दिवसाला ३-४ सभा नियोजित असल्याचं कळतं. मात्र अनेक ठिकाणच्या आयोजकांनी सभेसाठी मागवलेल्या खुर्च्या देखील भरत नसून त्यांच्या सभेकडे लोंकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे. प्रसार माध्यमांचे कॅमेरे सभेतील केवळ स्टेजचं चित्रीकरण करत असल्याने इतर वास्तव समोर येत नसल्याचं प्रकाशाने निर्दशनास येतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँके खातेदार राज ठाकरेंची भेट घेणार; भाजप कनेक्शन गडद होणार
याच महिन्यात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आणि सर्व बँक खातेदारांची धाबेच दणाणले. त्यानंतर सर्वत्र केंद्र सरकारबद्दल प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. त्यानंतर संतापलेल्या खातेदारांनी केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री ते भाजप आणि सेनेच्या अनेक नेतेमंडळींची भेट घेऊन सरकारला जाब विचारला होता. मात्र बँक खातेदारांच्या वाट्याला आश्वासनांशिवाय काहीच आलं नसल्याने त्यांचा संताप अजूनच दुणावतो आहे.
6 वर्षांपूर्वी -
ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है
असाच काहीसा प्रकार घाटकोपर मतदार संघात घडला आहे. दोन दिवसांपूर्वीच घाटकोपरमधील मनसेचे उमेदवार गणेश चुक्कल यांनी शिवसेना कार्यालयात जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी काही शिवसैनिक देखील उपस्थित होते. मात्र चुक्कल यांनी पुष्पहार अर्पण करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच “ये अंदर की बात है, शिवसेना मनसे के साथ है” असं कॅप्शन लिहून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
१२४ जागा लढवून शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल, सुनिल ताटकरेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक करत शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या, नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या व समस्यांवर आवाज उठवणाऱ्या सक्षम, प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची राज्याला गरज आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना विजयी करून सक्षम विरोधी पक्षासाठी संधी द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वांद्रे येथील त्यांच्या पहिल्या जाहीर सभेत केले.
6 वर्षांपूर्वी -
तो आलाय... सत्तेची भिक मागायला नाही तर सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला!
आजवर माझ्या हाती सत्ता द्या असे म्हणणारे राज ठाकरे आता काहीसे वेगळ्या भूमिकेत दिसले. त्यांनी “आता मला सत्ता नाही तर प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या” अशी मागणी महाराष्ट्राला केली आहे. सत्तेत असलेला आमदार हा कधीच सरकारला सर्वसामान्य लोकांच्या वतीने जाब विचारू शकत नाही, ते फक्त १ प्रबळ आणि कणखर विरोधी पक्षच करू शकतो आणि म्हणून तुमचे प्रश्न मांडण्यासाठी, तुमच्या वतीने सरकारला जाब विचारण्यासाठी, तुमच्यासाठी वेळप्रसंगी सरकारच्या अंगावर धावून जाण्यासाठी तुम्ही मला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या.
6 वर्षांपूर्वी -
आज मुंबईत राज ठाकरेंच्या दोन जाहीर सभा; आरे आणि पीएमसी बँकेचा मुद्दा उचलणार?
‘मेघ’ गर्जनेमुळे पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर गुरूवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेद्वारे राज ठाकरे विधनसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता पहिली सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आरेतील झाडांची कत्तल आणि पीएमसी बँकेमुळे लाखो मुंबईकर संतापलेले असताना या दोन्ही विषयांशी भाजप आणि सेनेचा थेट संबंध असल्याने राज ठाकरे हा मुद्दा सभेत उचलण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप-सेना सरकारला धक्का! ‘आरे’तील वृक्षतोड तात्काळ थांबवा; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरूच असून, या परिसरात नाकाबंदी आणि जमावबंदी कायम आहे. दरम्यान, विधि शाखेच्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे आरेमधील वृक्षतोडीकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. विद्यार्थ्यांच्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर करण्यात आले आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी सुरू असलेली वृक्षतोड तत्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.
6 वर्षांपूर्वी -
आरेतील वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालय गंभीर; आज सुनावणी
मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलातील झाडांची बेसुमार कत्तल केली जात असताना त्याची गंभीर दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. विधी शाखेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने रिषभ रंजन या विद्यार्थ्याने एका पत्राद्वारे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारचं ‘झाडे लावा, झाडे जगवा’ जुनं झालं; आता 'कर्फ्यू लावा, झाडे पाडा'
शनिवार, रविवारच्या धुमश्चक्रीनंतर आरेमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली असून, ती अनिश्चित काळासाठी लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याविरोधात पर्यावरणप्रेमी मुंबईकरांनी निषेध नोंदवला असून, ‘आरेमध्ये नेमकी कोणती देशद्रोही कारवाई होण्याची शक्यता आहे की ज्यामुळे तिथे सरकारला रविवारीही जमावबंदी कायम ठेवावी लागली?’ असा प्रश्न हे मुंबईकर करत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात; किरकोळ दुखापत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याचं वृत्त आहे. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्या कारचाही समावेश आहे. अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे तर, चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.
6 वर्षांपूर्वी -
आरे विषयावर माहिती घेऊन योग्य वेळी बोलू: उद्धव ठाकरे
आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आरे'मध्ये दंडुकेशाही; कलम १४४ लागू, पत्रकारांना देखील ताब्यात घेतलं
आरेमधील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या परिसरात कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
'आरे'मध्ये झाडे तोडणाऱ्यांना 'पीओके'मध्ये पाठवा: आदित्य ठाकरे
आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. काल, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात उपस्थित होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास अटकाव केला. या सर्व परिस्थितीमुले रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
6 वर्षांपूर्वी