महत्वाच्या बातम्या
-
मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सायनमध्ये पाणी तुंबलं नसून केवळ साचलं आहे
मागील काही दिवसांपासून उसंत घेणारा वरुणराजा काल रात्री पासून मुंबईमध्ये पुन्हा जोरदारपणे दाखल झाला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कार्यालयांकडे निघालेल्या मुंबईकरांना अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सकाळपासून ट्रॅफिकमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी आणि विशेष करून सखल भागात पाणी साचल्याने स्थानिक लोकांना देखील अनेक अडचणी येत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट प्रश्नी राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणतात ती मतं फक्त मोदींमुळे; तर चंद्रकांत पाटील म्हणतात बुथप्रमुख व पन्नाप्रमुखांमुळे
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात जोरदार बैठका सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाजनादेश यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत आणि पक्षासाठी पोषक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. तत्पूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकांवर बैठक सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नेतेगिरी मिरवू नका पक्षाला काय दिले ते सांगा: जे. पी. नड्डा यांनी खडसावले
मी २५ वर्षे भारतीय जनता पक्षाचे काम करतो, २० वर्षे पक्षाचे काम करतो असे स्वत:ला मिरवण्यापेक्षा एवढ्या वर्षात तुम्ही पक्षाला काय दिलं याचा विचार करा आणि निकाल देणारं काम करा अशा कानपिचक्या भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी शनिवारी भाजपचे प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत येथे दिल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे प्रभारी सरोज पांडे,माजी पक्षाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे प्रामुख्याने उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान
सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी ब्रँड निर्मितीचे 'तेच' कॉर्पोरेट मॉडेल आदित्य ठाकरेंवर राबवलं जातं आहे; अर्थात फलदायी ठरणार: सविस्तर
मोदी ब्रँड अर्थात होकारात्मक असो किंवा नकारात्मक पण आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे. मात्र ते गुजरात पुरता मर्यादित असलेलं राजकीय ब्रँड अचानक २०१४ पूर्वी पंतप्रधान पदाच्या चर्चेत कसं आणि एकदम देशावर राज्य कसं करू लागलं याचा अभ्यास केल्यास, ती एक शिस्तबद्ध आखली गेलेले योजनाच होती आणि आजच्या घडीला त्याला ‘राजकारणाचं कॉर्पोरेट मॉडेल’ म्हटलं तरी चालेलं. मात्र तत्पूर्वी भाजपने किंवा आरएसएस सारख्या संघटनांनी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नेमले आणि त्यांचे सल्ले स्वतः ऐकून ते प्रत्यक्ष अंमलात आणले असंच एकूण आहे. कारण आजच्या घडीला शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षात तज्ज्ञांच्या मतांची किंमत शून्यच असावी असंच म्हणावं लागेल. कारण इतर पक्षात तज्ज्ञ नेमून, त्यांच्या सल्ल्याने योजना अमलात आणण्यापेक्षा तंज्ञानाच ज्ञान देण्याचे प्रकार सुरु असावेत, मात्र आज शिवसेना त्याला अपवाद ठरली आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीस श्रीकृष्णासारखे चतुर: मंगल प्रभात लोढा
लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये मोठे बदल केले गेल्याचे दिसत आहे. त्यात ज्यांची मंत्रीपदी किंवा इतर मोठ्या पदांवर वर्णी लागली आहे त्यांना जुन्या जवाबदारीतून मुक्त करून नव्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावर वर्णी लागताच त्यांना महाराष्ट्र भाजप अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांची त्यापदावर वर्णी लागली आहे तर मुंबई अध्यक्ष पदी आमदार मंगल प्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे इफेक्ट! मासेविक्रेत्यांचं स्थलांतर मुंबईतच करावे म्हणून महापौरांचं पालिका आयुक्तांना पत्र
विषय मागील अनेक दिवसांपासून पेटत असताना शिवसेना पुन्हा विषय मनसेकडे जाताच जागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महापालिकेने पाठवलेल्या स्थलांतराच्या नोटिशीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रश्नी स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन भेटीस आलेल्या मासेविक्रेत्यांना दिल्यानंतर, आता शिवसेनेनेला जाग आली आहे. मुंबईतील अनेक विधानसभा क्षेत्रात कोळी समाजाची मतं महत्वाची असल्याने आणि विधानसभा निवडणुकीत पारंपरिक मतदार नाराज होऊ नये म्हणून शिवसेनेने विषय मनसेकडे जाताच धावपळ सुरु केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
तक्रारी होत्या खरीप विमा कंपनीच्या; उद्धव ठाकरेंचा मोर्चा 'रब्बी' विमा कंपनीवर
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीस नागपूर व मुंबई अशा २ मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता
राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच सर्वच पक्षातून नवनवीन बातम्या येत आहेत. विशेष करून भारतीय जनता पक्षात सर्वात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सूर केली केली आहे. त्यानुसार या विधानसभेला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील २ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा सेना किंवा भाजपातून राजकारणात?
पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशलिस्ट मानले जाणारे आणि खंडणी विरोधात कारवाई करून गुंडांची पळताभुई करणारे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख आयपीएस प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजकारणात सक्रिय होण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी आपल्या शासकीय सेवेचा मुदतपूर्व राजीनामा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आ. भातखलकरांचा पत्ता कट होणार? उत्तर भारतीय नेते रमेशसिंग ठाकूर यांना संधी?
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर्गत स्पर्धा देखील वेगाने होऊ लागल्या आहेत आणि त्यात विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यासाठी अनेक नेते मंडळी सरसावल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय सध्या कांदिवली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत असून विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं जाऊ शकतं.
6 वर्षांपूर्वी -
मी महापालिका आयुक्तांना भेटतो; तोपर्यंत कोणीही आले तरी तिथून हलू नका: राज ठाकरे
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
क्रॉफर्ड मार्केटमधील कोळी समाजाला पालिकेची स्थलांतराची नोटीस; कोळी समाज कृष्णकुंजवर
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत: नवनीत राणा
पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पी. साईनाथांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी थेट रिलायन्सचं इन्शुरन्सच नावं का घेतलं नाही?
पंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल विमान खरेदी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा आहे, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी कार्यकर्ते पी. साईनाथ यांनी नोव्हेंबर २०१८ मध्येच थेट जाहीर पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी त्यांनी अनेक कंपन्यांची यादी जाहीर करत बक्कळ नफेखोरी करणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली होती. त्यात रिलायन्स इंशुरन्ससारख्या तब्बल १० कंपन्यांचा समावेश होता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कसा घोटाळा किती मोठा आहे याच वास्तव त्यावेळी उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा 'वाघ झोपला होता'; नेटिझन्सकडून सेनेच्या निवडणूकपूर्व 'इशारा मोर्चाची' खिल्ली
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: शेतकरी मोर्चांना स्वतः ५ वर्ष भेट न देणारे उद्धव ठाकरे आज रस्त्यावर उतरणार
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जागा वाटपावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता?
दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल काँग्रेस आणि एनसीपी दरम्यान बैठक पार पडली. या बैठकीत एकूण जागा वाटपा विषयी सविस्तर चर्चा झाली. दरम्यान यावेळी एनसीपीने विधानसभेसाठी एकूण जागांपैकी निम्म्या जागांची मागणी काँग्रेसकडे केली आहे. त्यामुळे आघाडीत बोलणी प्राथमिक स्तरावर असतानाच पुन्हा बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
'राजकीय' कंत्राटी भरती तरुणांना मोठ्या महाबेरोजगारीकडे घेऊन जाणार: सविस्तर
लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांच्या भरती संदर्भातील बातम्या वेगेने येताना दिसत होत्या. त्यानंतर असलेले उच्च पदावरील अधिकारी ते खालच्या पदावरील अधिकाऱ्यांना देखील नारळ देऊन त्याजागी खाजगी सेवेतील लोकांना नियुक्त करण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र शासनाने देखील एकावर एक अशा अनेक खात्यांच्या भरती सदंर्भातील बातम्या पेरण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर सर्वच गुदस्त्यात बांधलं गेलं.
6 वर्षांपूर्वी