महत्वाच्या बातम्या
-
मुंबई, ठाण्यावर भीषण पाणीसंकट; केवळ २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्वाच्या जलाशयांमध्ये केवळ वीस दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस झाला नाही, तर भीषण पाणीसंकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी मुंबई आणि ठाण्यात पावसाचं आगमन झालेलं नसून, अजून देखील उन्हाच्या झळा पोहोचत असून उकडाच कायम आहे. परिणामी उरलेल्या पाण्याची बाष्पीभवनाने अजूनच घट होत आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक या पाणीबाणीने चिंतित आहेत.
6 वर्षांपूर्वी -
९१ हजार कोटींच्या घोटाळ्यातील कंपनीवर फडणवीस सरकार मेहेरबान का? धनंजय मुंडेंचा सवाल
महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुका, जिल्हा आणि ग्रामपंचायत हे “महानेट” प्रकल्पाअंतर्गत इंटरनेट शिवाय वायफायने जोडणे हा प्रकल्प नुकताच महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पातील सर्व तांत्रिक बाबींचं ऑडिट करण्यासाठी ५ सल्लागार समित्या नेमण्यात आल्या आहेत. याच ५ कंपन्यांपैकी १ आहे “डेलॉइट”.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा: धडाकेजबाज पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांना स्वतःकडे खेचण्यासाठी सर्वच पक्षात चढाओढ
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षात निवडून येणाऱ्या आणि समाजातील विविध घटकांशी जोडल्या गेलेल्या व्यक्तिमत्त्वांचा शोध सुरु आहे. दरम्यान मुंबई पोलीस दलातील धडाकेबाज अधिकारी प्रदीप शर्मा यांना स्वतःच्या पक्षात ओढण्यासाठी जवळपास सर्वच पक्षात जोरदार स्पर्धा लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पोलीस दलात कार्यरत असले तरी प्रदीप शर्मा यांच्या पी. एस. फाउंडेशनने मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रात मोठी समाज कार्य केली आहेत. अंधेरी पूर्वेतील गरजूंसाठी स्वस्त धान्य भंडार, शैक्षणिक मदत आणि स्वास्थ संबंधित मदत करून प्रदीप शर्मा यांची पी. एस. फाउंडेशन सामान्यांच्या परिचयाची झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेनेचा मुख्यमंत्र्यांना शह? जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची जलसंधारण मंत्र्यांची कबुली
सध्या राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आजच्या एका धक्कादायक कबुलीने शिवसेनेने अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह दिल्याचं म्हटलं जात आहे. कारण राज्यातील महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना ही मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असून देखील शिवसेनेने म्हणजे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सभागृहाला दिलेल्या कबुलीने खळबळ माजली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले
मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून सामान्य लोकांना लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. तसाच एक प्रकार मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या गुजराती कुटंबासोबत घडला आहे. संबंधित बिल्डरने या गुजराती कुटंबाला तब्बल २१ लाखांचा चुना लावला होता. प्रकल्पात पैसे गुंतवून देखील मागील ५ वर्ष ना घरचा ताबा मिळत होता, ना पैसे परत दिले जात होते. संबधित कुटुंबाचे पैसे जवळपास बुडाल्यातच जमा होते.
6 वर्षांपूर्वी -
५ वर्ष पिकविमा कंपन्यांची कार्यालये मुंबईत, शिवसेनेला फसवणूक-लूट विधानसभा आल्यावर दिसली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल औरंगाबाद आणि नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. दरम्यान शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेकडून पीकविमा निवारण केंद्राची उभारणी करण्यात आली. यावेळी आयोजित छोटेखानी सभेत शेतकऱ्यांना नडाल तर तुमची मुंबईतील कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला होता.
6 वर्षांपूर्वी -
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यता
मुंबईकरांसाठी एक क्लेशदायक बातमी येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भांडयात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे बेस्टकडून भाडेकपातीचा निर्णय घेतला जात असतानाच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ मात्र होण्याची शक्यता आहे. सदर विषयाला अनुसरून शुक्रवारी परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायतीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात टॅक्सी संघटनांनी पंचवीस रुपये भाडेवाढीची मागणी केली. येत्या मंगळवारी भाडेवाढीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची रथयात्रा हे आंध्र प्रदेशातील 'वायएसआर' तंत्र महाराष्ट्रात? सेने विरुद्ध मोठं षडयंत्र?
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या रथयात्रेसाठी “फिर एक बार शिवशाही सरकार” आणि ”अब कि बार २२० पार” अशी घोषवाक्ये तयार करण्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्यात ही रथयात्रा निघणार आहे. मात्र हेच तंत्र आंध्र प्रदेशात ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत आलेल्या वायएसआर काँग्रेसने तेथिल विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २-३ महिन्यापूर्वी राबविले होते. यावेळी भाजपने शिवसेनेच्या मतदारसंघातून देखील ही रथयात्रा काढण्याची रणनीती आखली आहे असे वृत्त आहे. त्यामुळे शेवटच्या शनी स्वतःच्या बाजूने वातावरण निर्मिती करून शिवसेनेला शह दिला जाऊ शकतो असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेसाठी आता शरद पवारचं मैदानात, मुंबईत महत्वाची बैठक
लोकसभा निवडणुकीत पराभव सहन करावा लागल्याने एनसीपीने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे, लोकसभेतील पराभव झटकून टाकत नव्या दमाने कामाला सुरुवात करण्यासाठी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य; मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. यावरच अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गृहनिर्माण मंत्र्यांची गिरणी कामगारांना मुंबईबाहेर धाडण्याची भाषा, सत्ताधारी सेना मूग गिळून शांत
मुंबईचे पूर्वीचे मालक आणि राबणारे हात म्हणजे तत्कालीन गिरणी कामगार, मात्र सध्या राज्याचे नवनियुक्त गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हाडाच्या बैठकीत केल्याने विधानाने गिरणी कामगारांमध्ये संतापाची भावना आहे. बैठकी दरम्यान राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की म्हाडाने मुंबईबाहेर घरे बांधावीत, अशी सूचना करणाऱ्या गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट गिरणी कामगारांच्या घरांबाबत देखील धक्कादायक सल्ला दिला आहे. गिरणी कामगारांना सुद्धा बेलापूर, उरणमध्ये घरे द्यावीत, असे म्हाडाच्या बैठकीत विखे कोणताही मागचा पुढचा विचार न करता म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
कोण काय छापतं? मुख्यमंत्रिपदाची जागा पुढील ५ वर्षांसाठी रिकामी नाही: अवधूत वाघ
लोकसभा संपून भाजप सरकार बहुमताने सत्तेत आले आणि मंत्रिमंडळ वाटप पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येतो आहे. एका बाजूला विधानसभेत दोन्ही बाजूचे वरिष्ठ नेते युतीसाठी प्रयत्न करत असताना काही नेत्यांकडून आग लावण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी काळात या विषयावरून भाजप सेनेमध्ये पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
जागावाटपात स्वबळावर बार्गेनिंगसाठी? पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला मुख्यमंत्री करायचाच असा ठाम निर्धार शिवसेनेने केला असून भारतीय जनता पक्षाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून आगामी विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी सर्व शक्तीनिशी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. आज शिवसेनेचा ५४वा वर्धापन दिन असून त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आज फडणवीस सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प
महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. सदर अहवालात राज्याची अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास दरापेक्षा अधिक वेगाने म्हणजे ७.५ टक्के दराने विकसित होत असून राज्याने आधीच्या ४ वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊनही प्रगतीची घोडदौड निरंतर राखण्यात यश प्राप्त झाले असल्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे मुनगंटीवार आज दुपारी १.४५ वाजता राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.
6 वर्षांपूर्वी -
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; दुष्काळावर विशेष चर्चा
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर काल रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या रुपरेषेची माहिती देण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये नवी आणि प्रलंबित अशी एकूण २८ विधेयकं मांडली जाणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
एसआरए घोटाळ्यामुळे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून डच्चू?
अखेर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल सकाळी अकरा वाजता पार पडला. यात एकूण तेरा आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. १३ मंत्र्यांना सामावून घेताना फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील आधीच्या एकूण ६ मंत्र्यांना डच्चू दिला आहे. विशेष म्हणजे हे सहाही मंत्री भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातील आहे. आज भारतीय जनता पक्षाच्या १०, शिवसेनेच्या २ नेत्यांना तर आरपीआय आठवले गटाच्या अविनाश महातेकर यांना मंत्रिपपदाची शपथ देण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलीस व एटीएस'मधील वाद चव्हाट्यावर; आयुक्तांकडून 'त्या' अधिकाऱ्यांना अभय की?
मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्यातील चढाओढ आणि वादविवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. देवेन भरती यांनी एटीएस प्रमुख पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या ठिकाणी बदलीसाठी थेट महासंचालकांकडे अर्ज करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील १२ धडाकेबाज अधिकाऱ्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस बॉम्ब टाकल्याने खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दल म्हटलं की पाहिलं डोळ्यासमोर येतं ते शिस्त, मात्र अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे खुलेआम नियमांचे उल्लंघन करणे ही बाब पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी अत्यंत गंभीरपणे घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी संबंधित १२ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरिष्ठांना वेटिंग लिस्टवर ठेवून 'आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे' अभियान सुरु
देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजप सरकार बहुमताने सत्तेत विराजमान झाले. मोदी त्सुनामीत शिवसेनेची सुद्धा लॉटरी लागली, मात्र भाजप बहुमताने सत्तेत विराजमान झाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पावर जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे केंद्रात भविष्यात देखील काहीच हाताला लागणार नाही याचा पक्ष नैतृत्वाला मनातून का होईना साक्षात्कार झाला असणार.
6 वर्षांपूर्वी -
मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही: दिशा पटानी
बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकंच त्यांना समाज माध्यमांवरील ट्रोलिंगला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री दिशा पटानीला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. दरम्यान या गोष्टीमुळे दिशाला समाज माध्यमांवर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आणि दिशा पटानीला हैराण करून सोडले होते. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने देखील प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार: निलेश राणे
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले असतात शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसविण्याचे भाष्य केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी