महत्वाच्या बातम्या
-
शहांना संरक्षण खातं दिलं तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल: उद्धव ठाकरे
काल नरेंद्र मोदी यांच्या बहुमतातील सरकारचा दिल्लीत शपथविधी समारोह पार पडला. त्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीय मधून मोदींवर पुन्हा स्थुतीसुमनांचा पाऊस पडला आहे. सामनात उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, ‘देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत, मोदींचे सरकार त्या दिशेने गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही, मोदी-२ सरकारचा चेहरा मोदी हाच आहे असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून निक्षून सांगितलं आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. नाहीतर अमित शहा यांचा चाबूक तेथे आहेच. अमित शहा यांच्या येण्याने नरेंद्र मोदी सरकारला बळ मिळेल असा विश्वास देखील उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या कृष्णकुंजवर भेटीगाठी सुरु
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः शरद पवार प्रयत्नशील असताना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी त्याला तीव्र विरोध केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी थेट कृष्णकुंज गाठायला सुरुवात केली आहे. राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरेंची निवासस्थानी भेट घेतली.
6 वर्षांपूर्वी -
बारावी निकालात मुलींची बाजी, कोकण टॉप, सरासरी निकाल ८५.८८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात नेहमीप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. विभागनिहाय आकडेवारीत कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्यातील एकूणच निकालाची टक्केवारी ८५.८८ टक्के आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.
6 वर्षांपूर्वी -
आज राष्ट्रवादी-कॉंग्रेसची मुंबईत आढावा बैठक; तत्पूर्वी राजू शेट्टीं व राज ठाकरे यांची भेट
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज मंगळवारी मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींसह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ते दरवर्षी स्वा. सावकारांना अभिवादन करतात, पण काही माध्यमं अभिवादन लोकसभेशी जोडत आहेत?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३६ वी जयंती आहे. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. वास्तविक मनसे अध्यक्ष दरवर्षी अशा थोर व्यक्तींना न चुकता अभिवादन करत असतात. मात्र आज काही प्रसार माध्यमांनी त्याचा थेट संबंध कोणताही विषय नसताना लोकसभेशी जोडत म्हटलं आहे, ‘राज ठाकरे यांनी विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करुन यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील आपल्यावरील ठपका पुसण्याचा प्रयत्न केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज ठाकरेंची भेट
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप बहुमताने पुन्हा देशात सत्तेत आली आहे. त्यात राज्यात भल्या भल्या दिग्गजांचे पराभव झाले आहेत. मात्र असेच पराभव देशभरातील दिग्गज नेत्यांचे झाल्याचे देखील सिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने विरोधी पक्षांकडे फारच कमी वेळ असणार आहे. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरळी विधानसभा लढाई; रस्त्यावरील खड्डयांनी त्रस्त जनता विरुद्ध नाईट लाईफ अशी असेल
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा लढवण्याची शक्यता
शिवसेना नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता शिवसेनेतच जोर धरू लागली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नेमके कोणत्या मतदारसंघातून लढावे याची पूर्ण चाचपणी एका सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिवसेनेने केल्याची खात्रीलायक माहिती प्रसार माध्यमांकडे आहे. युवा सेनेचे सरचिटणीस व आदित्य यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून या विषयाची माहिती सार्वजनिक केली. संबंधित पोस्टमध्ये लिहिले की, ‘हीच वेळ आहे हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय!’ त्यामुळे ठाकरे कुटुंबात आदित्य यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू असल्याचे म्हटले जाते.
6 वर्षांपूर्वी -
कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण: राष्ट्रवादीचा आरोप
खाजगी कोचिंग क्लासेसचे मालक आणि राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याने खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असून देखील तो मंत्रालयात केवळ धूळखात पडून असल्याचा थेट आरोप एनसीपीचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केला आहे. तसेस याकडे शिक्षणमंत्री विनोद तावडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी देखील अनिल देशमुख यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का! मिलिंद देवरा पराभूत: सेनेचे अरविंद सावंत विजयी
काँग्रेसला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून जोरदार धक्का मिळाला आहे. कारण इथून मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांनी पराभव केला आहे. या मतदारसंघातून मिलिंद देवरा निवडून येतील आणि ही लोकसभेची जागा काँग्रेसच्या भरोशाची मानली जात होती. काहीसा उच्च शिक्षित आणि उच्चभ्रू समाजातील लोकांचा मतदारसंघ म्हणून सर्वांना परिचित असलेला हा मतदारसंघ समजला जातो.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर मुंबईत: भाजपचे गोपाळ शेट्टी विजयी; काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा पराभव
लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना अगदी सहज झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी घेणारे गोपाळ शेट्टी आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांचा आज शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश
मागील ३ वर्षे पक्षाच्या सर्वच जाहीर कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवणारे एनसीपीएचे मराठवाड्यातील दिग्गज नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईतील मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयदत्त क्षीरसागर भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे त्यांना शिवबंधन बांधतील. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय सुट्यानिमित्त परदेश दौऱ्यावर असल्याने हा प्रवेश लांबला होता.
6 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागातील भीषण दुष्काळासंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली महसूल मंत्र्यांची भेट
राज्यातील ग्रामीण भागात यंदा ऐतिहासिक दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात वणवण भटकत आहेत. राज्यातील सत्ताधारी नेतेमंडळी अजून लोकसभा निवडणुकांच्या वातावरणातच अडकून आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी अनेक वृत्त वाहिन्यांवर एक्झिट पोलच्या गप्पा मारण्यासाठी तासंतास स्टुडियोमध्ये वेळ देत आहेत. मात्र सत्तेत असून देखील त्यांच्याकडे दुष्काळ दौऱ्यासाठी वेळ नसल्याचे दिसते.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा निवडणुकीत मनसे गाठणार आमदारांचा दुहेरी आकडा
लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात न उतरताही राजकीय वातावरण ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसणार असून मनसेचे दोन अंकी आमदार आगामी विधानसभा निवडणूकीत निवडून येतील’ असे भाकित ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मराटकर यांनी वर्तवले. नाशिक येथे चालू असलेल्या ज्योतिष संमेलनदरम्यान मराटकर यांनी हा अंदाज वर्तवला.
6 वर्षांपूर्वी -
वैद्यकीय प्रवेश: खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची आज राजभवनासमोर निदर्शने
राज्यात मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची काहीच चिन्हं दिसत नाहीत. दरम्यान पदवीधर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने अध्यादेश काढल्यानंतर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. राज्यपालांनी राज्य सरकारच्या अध्यादेशावर अध्यादेशावर स्वाक्षरी करू नये यासाठी मराठा विद्यार्थी आणि पालक राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आजवर मोदी व शहांनी दादागिरीच केली, मग ममतांनी केली तर बिघडले कुठे? राज ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे करत आहेत ते योग्यच आहे. मात्र आजवर या दोघांनी म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी इतरांसोबत दादागिरीच केली आहे. मग ममतांनी केली तर त्यात बिघडले कुठे? अमित शाहांना कळू दे दादागिरी काय असते ते. कोलकात्यातील रॅली अर्धी सोडून अमित शहा पळून आले. यांच्या बाबतीत हेच पाहिजे होते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पत्रकार परिषदेत ‘मौन की बात’! राज ठाकरेंचं ट्विट
नरेंद्र मोदींनी काल पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. मोदींना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी उत्तरं दिली. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच विरोधकांनी मोदींवर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे. आमच्या देशाचा पंतप्रधान पत्रकारांना सामोरा जायला घाबरतो, अशी टीका महिन्याभरापूर्वी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मोदींवर नेमक्या शब्दांत शरसंधान साधलं.
6 वर्षांपूर्वी -
दुष्काळ: ग्रामीण जनतेची गोड्या पाण्यासाठी वणवण तर सत्ताधारी खाऱ्या पाण्यात तरंगत आहेत
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आटोपून सत्ताधारी सध्या कुटुंबासोबत सुट्टीची मजा घेत आहेत. कुटुंबासोबत सुट्टीवर जाणं गैर नसलं तरी, ते कधी याचं किमान जनतेने निवडून दिलेल्या सत्ताधाऱ्यांना तरी भान ठेवणं गरजेचं आहे. भर उन्हाळ्यात राज्यात ऐतिहासिक दुष्काळ पडलेला असताना सत्ताधारी नेते मात्र स्वतःच्या उन्हाळी सुट्ट्या देशाबाहेर घालवून, पुन्हा पावसाळ्याचा आनंद लुटायला स्वगृही परततील.
6 वर्षांपूर्वी -
अजित पवारांनी आझाद मैदानात घेतली आंदोलक मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट
राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात जोरदार आंदोलन छेडलं आहे. एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या २५० विद्यार्थ्यांचं भविष्य सध्या सरकारच्या गलथान कारभारामुळे अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल रोखठोक अजित पवार यांनी प्रसार माध्यमांकडे उपस्थित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा: आमदार नितेश राणे
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही, यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. या निर्णयानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने वैद्यकीय प्रवेशात मराठा विद्यार्थ्यांचे खच्चीकरण थांबवा, अन्यथा मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा मराठा महासंघाने पत्रकाद्वारे दिला आहे.
6 वर्षांपूर्वी