महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण: निवडणुकीपूर्वी लाडू भरवणारे हेच ते नेते वैद्यकीय प्रवेश गोंधळानंतर गायब
निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणावर मार्केटिंग करून श्रेय घेणारे आणि एकमेकांना केमेऱ्यासमोर लाडू भरवत स्वतःची पाठ थोपटून घेणारे हे भाजप आणि शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सध्या मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेपासून लांब आहेत. सध्या मराठा समाजातील विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणींचा सामना करत आहेत आणि सत्ताधाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड संताप पाहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेल्फ डिफेन्सचे धडे घेताघेता शिवसेनाच अक्षयच्या डिफेन्समध्ये, त्याची कॅनडीयन नागरिकत्व तांत्रिक बाब
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर भाष्य करतानाच अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकत्वाच्या मुद्दावरुनही समर्थन केले आहे. अक्षय कुमार हा अस्सल हिंदुस्थानी आहे. त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा विषय ही एक तांत्रिक बाब आहे.
6 वर्षांपूर्वी -
अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदावर बढती देण्यात आली आहे. राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यावर निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता अजोय मेहता यांच्या नियुक्तीचा कायदेशीर आणि प्रशासकीय अडसर दूर झाला. पुढील तीन दिवसांत अजोय मेहता अधिकृतपणे पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. येत्या सप्टेंबरमध्ये अजोय मेहता निवृत्त होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी मला एकत्रित काम करण्याची ऑफर दिली होती, नारायण राणेंचा गौप्य्स्फोट
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष, माझी शिवसैनिक नारायण राणे यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले असून त्यातून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. खुलासे म्हणण्यापेक्षा विवादित खुलासे म्हणायला काही हरकत नाही, त्यास कारण देखील तसेच आहे. त्यांच्या आत्मचरित्रातून बराचसा इतिहास उलगडला आहे, हा इतिहास फार कमी लोकांना माहित आहे.
6 वर्षांपूर्वी -
गोराई जामझाड पाड्यात ७१ वर्षांनी वीज; मनसे शाखाध्यक्ष महेश नर यांच्या लढ्याला यश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटवत आहेत, तर दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यातील मूळ प्रश्नांना हात घालून त्याच्या समस्या सोडविण्याचे कार्य करून सामान्य माणसाच्या मनात घर करत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटाआड गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच होता. मनसेच्या निरंतर पाठपुराव्याने स्वातंत्र्याच्या तब्बल ७१ वर्षांनंतर अखेर या पाड्यात वीज पुरवठा झाला आणि पाड्यातील घर अन् घर उजळून निघाले. जणु आपले आयुष्यच उजळून निघाल्याचा आनंद प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
6 वर्षांपूर्वी -
व्यंगचित्रकार जुलमी राजवट उलथवून लावू शकतो : राज ठाकरे
जागतिक स्तरावर आज व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जात आहे. व्यंगचित्रातून विरोधकांचा समाचार घेणारं परिचित राजकीय व्यक्तिमत्व असलेले राज ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत व्यंगचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात भावना व्यक्त करताना, व्यंगचित्रकारात एखादी जुलमी राजवट उलथवून लावण्याची क्षमता असते अशी प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यमान सरकारला टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आनंदराज आंबेडकर यांचं काँग्रेसप्रवेशाचं वृत्त चुकीचं; ट्विट'करून खुलासा
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. दरम्यान, आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त काही इंग्रजी प्रसार माध्यमांनी दिलं होतं. परंतु अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही.
6 वर्षांपूर्वी -
पुरावे! मनसेने नाही तर गंभीरने ते फोटो अर्धवट माहितीवर ट्विट करून अफवा पसरवल्या होत्या
सध्या मनसे आणि भाजपमध्ये पुन्हा ट्विटर वॉर सुरु झाले आहे. भावनिक विषयांना पुढे करून राजकारण करणारी भाजप स्वतःच्या अर्धवट ज्ञानातून पून्हा तोंडघशी पडली आहे असंच म्हणावं लागेल. त्यात भर म्हणजे काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या लाव रे व्हिडिओ मोहिमेला प्रतीउत्तर देताना अनवेरिफाईड अकाउंटचा आसरा घेत स्वतःचा बचाव केला होता आणि राज ठाकरे यांनी भाजपच्या अधिकृत अकाउंटचा पुरावा द्यायला हवा होता असं म्हटलं होत.
6 वर्षांपूर्वी -
फायदा भाजपला होणार मग तो खर्च भाजपच्या नावावर टाका, नेटिझन्सची तावडेंवर टोलेबाजी
राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील ४८ पैकी ३७ ते ४० जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला होता.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले, मुंबईत आमदारांची बैठक बोलावली
लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं वृत्त आहे. शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच वरून राजाचं आगमन होणार असून, त्या काळात पक्ष विस्ताराची कामं हाती घेणं कठीण काम असतं. त्यात पावसाचा ३-४ महिन्याचा कालावधी संपताच लगेचच विधानसभा निवडणूक लागणार असल्याने सर्वच पक्ष आतापासूनच तयारीला लागतील असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेना खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी यांना १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा, उच्च न्यायालयात धाव
शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना सतरा अन्य आरोपींसह सत्र न्यायालयाने १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मतदानाच्यादिवशी चेंबूरमध्ये ट्रॉम्ब येथे गोंधळ घालण्याचा आणि मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप होता. कामिनी शेवाळे या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.
6 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील एकूण ७१ जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील हा शेवटचा टप्पा असून यात मुंबई आणि ठाण्यासह एकूण १७ मतदारसंघांतील तब्बल ३२३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य सुमारे ३ कोटी ११ लाख मतदार ठरवणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ३१.७४ टक्के मतदान झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.८२ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरुवात झाली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मू, ओडिसा, पश्चिम बंगाल येथेही आज सकाळी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे ९६ लाख मुंबईकर आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
न्यायालय व निवडणूक आयोगाच्या 'त्या' नियमामुळे मनोज कोटक यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते?
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्यापूर्वी समाज माध्यमांवरील पेड जाहिरातींचा गैरवापर टाळण्यासाठी न्यायालयाच्या मार्गदर्शनासाठी मुख्य निवडणूक आयोगाला आदेश देत एक नियमावली आखली होती. तसेच त्यासंदर्भात थेट फेसबुकला आदेश देत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फेसबुकने देखील अनेक बदल करत नव्या नियमाप्रमाणे उमेदवारांच्या सर्व पेड जाहिरातींची माहिती निवडणूक आयोगासोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे तशी तक्रार आल्यास आणि संबंधित उमेदवाराने ती जाहिरात हटवली तरी फेसबुककडे सर्व रेकॉर्ड राहील आणि तो निवडणूक आयोगाला मागणी केल्यास पुरवला जाईल.
6 वर्षांपूर्वी -
मनसेकडून भाजपच्या अजून एका खोट्या जाहिरातीची पोलखोल!
‘बोलव रे त्यांना’ करत मनसेकडून भारतीय जनता पक्षाच्या खोट्या जाहिरातीची पुन्हा पोलखोल करण्यात आली आहे. कौशल्य इंडियाच्या माध्यमातून भाजप सरकारने रेखा वाहटूळे नावाच्या महिलेला भाजप योजनांचे लाभार्थी दर्शवणारी जाहिरात केली. मात्र आपण भाजप योजनांचे लाभार्थी नसल्याचा दावा करणारया या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शनिवारी मनसेद्वारे राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलावले आणि भाजपच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड केली.
6 वर्षांपूर्वी -
शिवाजी पार्कातली काय, इथे कृष्णकुंज'च्या आतली झाडं पण जपली आहेत: शेलारांना नेटिझन्सच उत्तर
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दत्तक गावावर टीका केली होती. यावर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ दाखवून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास, अशी बोचरी टीका देखील केली. पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचं एक झाड देखील दत्तक घेतलं नाही ते गाव काय दत्तक घेणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला.
6 वर्षांपूर्वी -
शेलारांना माहीत नसावं, भाजपचे प्रवक्ते वेरिफाइड अकाऊंटवरून असे फेक व्हिडिओ शेअर करतात
मुंबई : आज मुंबईमध्ये आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या व्हीडीओ आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी जे काही दाखवलं त्यातील अनेक गोष्टी या हास्यास्पद होत्या. मुळात वेरिफाइड अकाउंट कोणाला मिळत याचे फेसबुक व ट्विटरने काही नियम आखले आहेत आणि अकाउंट वेरिफाइड करण्यासाठी संबंधिताला पुरावे देखील द्यावे लागतात. मुळात सामान्य वापरकर्त्याला फेसबुक किंवा ट्विटर अकाउंट वेरीफाईड करता येत नाही. अगदी अनेक पत्रकार, समाज सेवक आणि सामाजिक संस्था देखील आज अन वेरिफाइड अकाउंट वापरतात. त्यात मागील वर्षभरापासून फेसबुक व ट्विटरने भारतात अकाउंट वेरीफाईड करण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: राज यांचं पाकिस्तानशी नातं काय विचारणारे तावडे तुलसी जोशींच्या उत्तराने तोंडघशी
काल मुंबई भांडुप येथे राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी देखील राज ठाकरे यांनी मोदींना विशेष लक्ष केलं. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेत पुन्हा तेच भाजप समर्थकांच्या फेसबुक पेजवरील जाहिरातीतील कुटुंब पुन्हा समोर आणण्यात आलं आणि त्यांनी अधिक खुलासा देखील केला.
6 वर्षांपूर्वी -
मुरजी पटेल व केसरबेन पटेल यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, नगरसेवक पद रद्दच
जातीच्या दाखल्याअभावी पालिकेतील एकूण ५ नगरसेवकांवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत त्यांचे नगरसेवक पद रद्द केलं. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती रणजित मोरे आणि भारती डांगरे यांचे खंडपीठ निकाल जाहीर केला होता. त्यामुळे इतर पक्षातील दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना ३, कॉंग्रेस १ आणि समाजवादी पक्षाच्या १ उमेदवारांना नगरसेवकपदाची मोठी लॉटरी लागू लागली.
6 वर्षांपूर्वी -
किरीट सोमैयांचे व्हिडिओ नाहीत, असं ही ते काय बोलतात ते समजणार नाही
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भांडुप येथे जाहीर सभा झाली. यावेळी देखील त्यांनी नरेंद्र मोदी यांना विशेष लक्ष केलं. दरम्यान, सभेला संबोधित करताना त्यांनी महागाई या सामान्यांशी निगडित विषयाला हात घालून भाजपला कोंडीत पकडलं. यावेळी त्यांनी गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव यावरून भाजप नेत्यांचे पूर्वीचे व्हिडिओ जनतेला दाखवले.
6 वर्षांपूर्वी