महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या लोकांना भाजप सरकार त्रास देत आहे? मनसेचा आरोप
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रभर नाही तर देशभर गाजत आहेत. एक वेगळ्याच प्रकारे व्हिडिओ प्रेझेंटेशन देऊन राज ठाकरे सध्या भाजप सरकार तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल करत आहेत. या पोलखोल दरम्यान राज ठाकरेंनी बरेचसे व्हिडिओ दाखवले आहेत आणि या व्हिडिओ मधून बरेचसे चेहरे महाराष्ट्राला नव्याने कळले.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची तोफ धडाडणार! आज मुंबईत सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार उभा नसला केला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय पटलाच्या क्षितीजावरुन हटविण्याचा चंग बांधला आहे. यासाठी राज ठाकरे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात सभा घेत या दोघांनाही आणि त्यांच्यामुळे ज्यांना फायदा होईल अशांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. आता राज ठाकरे यांच्या मुंबईसह नाशकात सभा होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अजब! उद्धव म्हणाले माझं ‘डासां’सोबत रक्ताचे नाते, तर राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
धारावीतील रहिवाशांना जो डास चावतो तोच डास मला देखील चावतो. त्यामुळे आपले रक्ताचे नाते आहे, अशी अजब भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना घातली. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांच्या जाहीर सभेचे रविवारी आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे ज्या घाणीमुळे डास निर्माण होतात किंवा वाढतात त्यावर त्यांना काहीच बोलावसं वाटलं नाही. प्रचारात विकासावर बोलण्याचं त्यांचं धाडसच दिसून येत नाही आणि वायफळ विषयांवर अधिक भर देताना उद्धव ठाकरे दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईत संजय पाटील यांना मिळणारा पाठिंबा भाजपसाठी धोक्याची घंटा?
ईशान्य मुंबईतील शिवसेना आणि किरीट सोमैयांच्या वादानंतर अखेर किरीट सोमैया यांचा पत्ता कट होऊन मुलुंड मधील स्थानिक नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्याची वेळ भाजपवर आली. प्रचार शिगेला पोहोचला असताना अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांना ठिकाणी स्थानिक मतदारांनी चांगलेच फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
२०१४ ला भाजपने माझ्या सभांचा खर्च केला होता का? राज यांचा भाजप नेत्यांना सवाल
मुंबई: नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला भारतीय राजकारणाच्या पटलावरून घालवण्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्रात सभांचा झंझावात सुरु केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार उभा नाही तरीही राज ठाकरे महाराष्ट्रात प्रमुख शहरांमध्ये सभा घेऊन भाजपच्या अडचणी वाढवताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबईसह राज ठाकरेंच्या मुंबईत २ सभा
‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अख्या महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षाविरोधात सभांचा धडका लावला आहे. राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची जनतेसमोर पोलखोल करत आहेत. सत्ताधाऱ्यांची पोलखोल करणाऱ्या राज ठाकरेंची तोफ आता मुंबईत देखील धडाडणार आहे. २३ एप्रिल रोजी शिवडी येथे आणि २४ एप्रिल रोजी भांडूप येथे राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्याशिवाय २५ एप्रिल रोजी पनवेल येथे आणि २६ एप्रिल रोजी नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावर सायंकाळी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला पुणेकरांचा अल्पप्रतिसाद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्वपक्षीय नेत्यांचा सभांचा धडाका सुरु असून वंचित बहुजन आघाडीचा देखील प्रचार जोमात सुरु आहे. परंतु, पुण्यात शनिवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेला लोकच जमली नाहीत. यासभेला फारशी गर्दी झाली नव्हती. मैदानातील खुर्च्या मोठ्या प्रमाणावर रिकाम्याच होत्या. संध्याकाळी याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून या सभेला तरी पुणेकर येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशात पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचं कार्टुन नेटवर्क होईल, अशी व्यंगात्मक टीका देखील आदित्य ठाकरेंनी केली. शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी आयोजित सभेत आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई ते पालघर; शिवसेना महाराष्ट्रात निवडणूक लढवत आहे की गुजरातमध्ये?
सध्या लोकसभा प्रचाराचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला असताना सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यासाठी प्रचाराचे नवं नवे फंडे वापरण्यात येत आहेत. परंतु शिवसेनेचा मुंबई ते पालघर पर्यंतचा प्रचार हा मुख्यत्वे गुजराती भाषेत होताना दिसत आहे. भाजपसोबत युती करण्याचा शिवसेनेचा मूळ उद्देश केवळ गुजराती मतदार तर नव्हता ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कड्डक ट्विट! तुलसी जोशींच्या 'त्या' फाईल चोर व्हिडिओने महाराष्ट्र भाजप तोंडघशी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या तडाख्याने राज्यातील भाजप पूर्ण विचलित झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रचा दौरा करत राज ठाकरे भाजपाला आणि मोदी-शहा या जोडीला व्हिडिओ पुराव्यानिशी कात्रीत पकडत आहेत. परंतु, राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या एकही प्रश्नाचं उत्तर न देता महाराष्ट्र भाजप ‘लाव रे तो व्हिडिओ’ या नावाने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याचे व्हिडिओ ट्विट करून त्यात राज ठाकरेंना मेन्शन करून टोला लगावत आहेत. वास्तविक ज्यांचा साडी चोरतानाचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपने ट्विट केला आहे, त्या महिला कार्यकर्त्यांची त्याच दिवशी अधिकृतरित्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात मराठी विरोध निरुपम यांना भोवण्याची शक्यता; मराठी वस्त्यांमध्ये प्रतिसाद मिळेना
मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणून अपयशी ठरलेले उत्तर पश्चिमचे उमेदवार संजय निरुपम यांनी मराठी माणसाचा कैवार घेतल्याचे आठवत नाही. त्यांनी केवळ उत्तर भारतीयांना तसेच हिंदीलाच पाठींबा दिला आणि काँग्रेसला त्यांच्या दावणीला बांधले. यामुळे आता त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मराठी माणसांची मते मिळावी म्हणून त्यांना आता मराठी सिनेकलाकारांना प्रचारासाठी आणावे लागत आहेत, नाहीतर मराठी मतदार प्रचार रॅलीकडे बघणार सुद्धा नाही याची त्यांना जाणीव आहे. तसेच हा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे जेथे मनसेने काँग्रेसला समर्थन दिलेले नाही. परिणामी त्याचा फायदा शिवसेनेच्या गजानन कीर्तिकारांना होण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींनी बांधलं 'शिवबंधन'
काँग्रसेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेत मातोश्रीवर जाऊन जाहीर प्रवेश केला. गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडून शिवसेनेचे ‘शिवबंधन’ हाती बांधले आहे.
6 वर्षांपूर्वी -
भांडूप, शिवडी, पनवेलमध्येही राज ठाकरेंच्या सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील विविध भागातील सभांचा झंजावात सुरू झाला आहे. आतापर्यंत नांदेड, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी सभा झाल्या असून आज पुण्यात तर उद्या रायगड येथे सभा होणार आहे. ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेतलेले राज त्यांच्या प्रत्येक सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पक्षाची पोलखोल करत आहे. महाराष्ट्रातील हा सभांचा झंजावात संपाल्यावर राज त्यांच्या सभांचा मोर्चा भांडूप, शिवडी, पनवेलमध्ये वळवणार असल्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
ईशान्य मुंबई: मतदारांनी भाजप उमेदवार प्रवीण छेडा व किरीट सोमैयांना सुनावलं
ईशान्य मुंबई’मधील लोकसभा आधीच किरीट सोमैया आणि शिवसेनेतील वादातून चर्चेत आली असताना आता स्थानिक मतदाराचा रोष देखील भाजप उमेदवाराला सहन करावा लागत आहे. भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि किरीट सोमैया घाटकोपर येथे प्रचाराला आले असता स्थानिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
6 वर्षांपूर्वी -
विनोद तावडेंचे राज ठाकरेंना चॅलेंज, 'कट-पेस्ट' चं राजकारण सोडून ठोस भूमिका घ्यावी
मुंबई: साऱ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगभरातील मराठी माणसांना आपल्या भाषणाने मंत्रमुग्ध करणाऱ्या राज ठाकरेंना विनोद तावडेंनी खास टोला लगावला आहे. विनोद तावडेंनी राज ठाकरेंना थेट आव्हान देत ‘कट-पेस्ट’ चं राजकारण सोडून काहीतरी ठोस भूमिका घ्या असं म्हटलं आहे. तसंच पुढे ते म्हणाले राज ठाकरेंनी त्यांचा माणूस आमच्या सोबत पाठवावा मग आम्ही त्यांना गावाची दुसरी बाजू दाखवू.
6 वर्षांपूर्वी -
उर्मिलाच्या हटके प्रचारामुळे गोपाळ शेट्टींना सारखे मोदी-मोदी-मोदी इव्हेंट करण्याची वेळ?
काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिलाच्या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले. भयभीत झालेल्या गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा उर्मिलाच्या प्रचार रॅलीत मोदी…मोदीच्या घोषणा दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या घोषणाकडे दुर्लक्ष केल्याने नवा संघर्ष टळला.
6 वर्षांपूर्वी -
मनसे उपाध्यक्ष संदीप दळवींच्या पुढाकाराने अनाथ आश्रमातील मुलांसाठी बालचित्रपटाचे आयोजन
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा थेट जनसामान्यांशी जोडला गेलेला आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष असल्याचं अजून एक उदाहरण समोर आलं आहे. सध्या लोकसभेच्या अनुषंगाने मुंबईसह संपूर्ण राज्यातील वातावरण प्रचार सभांनी व्यापून गेलं असलं तरी हा बच्चे कंपनीचा सुट्यांचा काळ आहे हे विसरता येणार नाही. त्याच निमित्ताने मनसेचे उपाध्यक्ष आणि सवाई सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक संदीप दळवी यांच्या पुढाकाराने अनाथ आश्रमातील चिमूलकल्या मुलांसोबत शालेय विद्यार्थ्यांना सुट्टीतील विरंगुळा म्हणून एक स्तुत्य उपक्रम राबवला गेला.
6 वर्षांपूर्वी -
भाजप कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीमुळे एक महिला प्रवासी पडली, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चोप
एकीकडे भारतीय जनता पक्षाच्या महिला उमेदवारांना अश्लील टिप्पणीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीचा सामना करावा लागला आहे. यावर मातोंडकर यांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस संरक्षणाचीही मागणी केली आहे. या हुल्लडबाजींमध्ये एक महिला प्रवासी पडल्याने जखमी झाली आहे. तर या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
निवेदन असं उभं राहून स्वीकारतात? तावडेंचा 'स्टॅन्ड अप कॉमेडी' विनोदी फोटो व्हायरल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत असं म्हणत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये शो पार पडला आता लवकरच महाराष्ट्रात आणखी काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत, असं विधान देखील तावडे यांनी उपरोधाने म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
लातूरच्या शेतकरी कुटुंबाची फसवणूक करणाऱ्या कंपनीने ३ लाख परत केले
सध्या राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघाला असताना, शेतीत होणाऱ्या नुकसानीमुळे आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. त्यात अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त दुसऱ्या नोकरीच्या शोधात देखील भटकत आहेत. त्यात कमी शिक्षणाअभावी आणि पूर्व अनुभव नसल्यामुळे शहरांमध्ये नोकरी मिळणे देखील अतिशय कठीण असल्याचे अनुभव त्यांना येत आहेत.
6 वर्षांपूर्वी