महत्वाच्या बातम्या
-
ते महागठबंधन नाही 'महाठगबंधन' आहे, तर शरद पवार हे शकुनी मामा: पूनम महाजन
नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत आणि विरोधकांकडे तर पंतप्रधानपदाचा उमेदवारच नाही. विरोधकांनो तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारल्यानंतर सोमवारपासून शनिवापर्यंत मायावती, अखिलेश, स्टॅलिन, चंद्राबाबू, ममता हे नेते एक एक दिवस पंतप्रधान होतील आणि रविवारी सुट्टीच्या दिवसाचे पंतप्रधान शरद पवार असतील, अशी खासदार पूनम महाजन यांनी विरोधकांची खिल्ली उडवली.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांच्या त्यावेळच्या जन आंदोलनामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी राळेगणसिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. दरम्यान, अण्णांनी राज ठाकरे यांच्याशी बंद दरवाज्याआड चर्चा सुद्धा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी जंगल के शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली: फडणवीस
सारी जनावरे एकत्र येऊन कळप केला, तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत, मोदी वाघ आहेत, शेर तो जंगलका शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली होते है, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी देशभरातील विरोधी पक्षांवर विखारी टीका केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेऊन विचारपूस करणार
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सलग ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ७वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांनी आमरण उपोषणकरून प्राणत्याग करण्यापेक्षा रस्त्यावर उतरुन लढा द्यावा: उद्धव ठाकरे
जनलोकपाल, लोकायुक्त, शेतक-यांचे प्रश्न या अशा अनेक प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात सगळं ५ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा ५वा दिवस असून त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले. दरम्यान, अण्णा उपोषणाला शिवसेनेने पाठिंबा देत काही चांगल्या आणि वाईट गोष्टी सुद्धा सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पश्चिम रेल्वेवरील तब्बल अकरा तासांचा मेगाब्लॉक संपला
लोअर परळच्या डिलाईल रोड पुलाच्या पाडकाम तसेच बांधकामासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते दादर दरम्यान तब्बल अकरा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला. या मेगा ब्लॉकदरम्यान चर्चगेट ते दादर दरम्यान एक सुद्धा लोकल धावली नाही. हा ब्लॉक आता पूर्ण झाला असून पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आता पश्चिम रेल्वेवरील मेल आणि एक्स्प्रेसची वाहतूक सुद्धा पूर्णपणे सुरळीत झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पहिली चर्चगेट-विरार लोकल रवाना झाली.
6 वर्षांपूर्वी -
शिंदेंना उत्तर भारतीयांची अनधिकृत दुकानं फोडल्याचे ज्ञात, पण मराठी माणसाची डोकी फोडल्याचा विसर?
काळाच्या ओघात शिवसेना मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठी गृहीत धरलेला पारंपरिक मतदार झाला आहे. शिवसेनेचे ठाण्यातील आमदार तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उत्तर भारतीय समाजाचे गोडवे गाण्यास सुरवात केली आहे. भाषणात मराठी माणसाचा एकही उच्चार न करता, त्यांनी केवळ उत्तर भारतीयांचे आणि शिवसेनेच्या अतूट नात्याचे दाखले नवी मुंबईतील आयोजित कार्यक्रमात दिले आहेत. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेने कधीही उत्तर भारतीय नागरिकांना त्रास दिला नाही.
6 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण; आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांकडून अटक
भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे याला आज सकाळी स्थानिक पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. दरम्यान, पुण्यातील सत्र न्यायालयानं काल त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत त्याला अटक केली.
6 वर्षांपूर्वी -
ते ४८ तास सावधान! या नियमाच्या आड कोणीही विजयी उमेदवारावर आधीच ट्रॅप लावू शकतो? सविस्तर
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे अनेक विजयी उमेदवार खोटे शिक्षणाचे दाखले, जातीचे दाखले तसेच संपत्तीबद्दलची खोटी माहिती निवडणूक आयोगाला दिल्यामुळे, त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्यापर्यंत विषय जाऊन पोहोचतो. परंतु, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याचा त्रास नसला तरी भविष्यात या नव्या नियमामुळे अनेक विजयी उमेदवार भविष्यात निवडणूक आयोगाच्या कचाट्यात अडकून स्वतःची खासदारकी किंवा आमदारकी गमावून बसू शकतात. विशेष म्हणजे कोणीही राजकीय विरोधक प्रतिस्पर्धीना मतदानाच्या ४८ तास आधी शिस्तबद्ध अडकवू शकतात.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई-ठाण्यात मराठी माणूस कोणासोबत? 'उत्तर भारतीय सन्मान' की 'मराठी आत्मसन्मान'? सविस्तर
आगामी निवडणुकीत पुन्हा मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उफाळून येऊ शकतो. त्यात मुंबई आणि ठाण्यातील मागील काही वर्षात अनेक लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघात अमराठी मतदारांचे प्रमाण इतके वाढले की शिवसेनेसारख्या पक्ष सुद्धा मतांच्या लाचारीत मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर’सारख्या शहरांमध्ये ‘उत्तर भारतीय सन्मान’ मेळावे आयोजित करून मराठी अस्मिता खुलेआम वेशीवर टांगताना दिसत आहेत. किंबहुना मुंबई ठाण्यासारख्या शहरातील मराठी माणूस हा शिवसेनेसाठी केवळ मतांसाठीच राखीव असल्याचे सध्याचे चित्र आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांच्यामागे सुद्धा हजारो मतदार, सोबत आले तर फायदाच: भुजबळ
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु, स्वतः शरद पवार किंवा राज ठाकरे यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना सदर युतीबाबत प्रसार माध्यमांनी विचारले असता, ‘राज ठाकरे याच्याकडे सुद्धा हजारो मतदार असून ते आघाडीसोबत आले तर फायदाच होईल’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच एकप्रकारे राज ठाकरे आणि मनसेचे आगामी लोकसभा निवडणुकीतील महत्व अधोरेखित केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस हायकमांडचे आदेश धुडकावून निरुपमांची उत्तर पश्चिम लोकसभेसाठी स्वयंघोषित उमेदवारी?
मागील दोन तीन दिवसांपासून चाललेल्या मुंबई काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतील लोकसभेच्या जागेसाठी पक्षाकडून उमेदवारी देण्यास स्थानिक काँग्रेस पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला होता. दरम्यान, राज्य काँग्रेस कमिटीने स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांची गंभीर दखल घेत, निरुपम यांना उत्तर मुंबई या त्यांच्या मूळ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात थंडीची हुडहुडी २ दिवसांत अजून वाढणार
राज्यभर सध्या थंडीची हुडहुडी भरली असता अजून एक वृत्त आले आहे. उत्तरेकडून राज्याच्या दिशेने येणार्या अतिथंड वार्यांच्या प्रवाहांमध्ये मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्राच्या अनेक भागातील किमान तापमानात मोठी घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळेच थंडीच्या लाटेची तीव्रता अजून वाढल्याचे जाणवत आहे, तर पुढील दोन दिवस थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने वृत्त दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
जॉर्ज यांनी कामगारांना अर्थवादात ओढले व कामगार चळवळीचे नुकसान झाले: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जॉर्ज यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहत अत्यंत दुःख व्यक्त केले. त्यात त्यांनी भावना व्यक्त करताना म्हटले की, जॉर्ज फर्नांडिस यांचा स्वतःचा असा एक कालखंड होता. ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या काळात तळपत राहिले. परंतु हा तळपणारा तारा आता निखळला. तसेच आता राजकीय क्षितिजावरील एक धगधगती मशाल सुद्धा विझली आहे. इतिहासाच्या पानावर जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव कुणाला पुसता येणार नाही, असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखात म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नाना पाटेकर यांना मातृशोक, आई निर्मला पाटेकर यांचे वृद्धापकाळाने निधन
ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नाना पाटेकरांच्या आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९९ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे
अमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे
6 वर्षांपूर्वी -
सेना, भाजप की काँग्रेस? लोकसभेनंतर 'या' विधानसभा क्षेत्रातील चित्र स्पष्ट होणार
सध्या अंधेरी पूर्वेचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. शिवसेनेचे रमेश लटके येथील विद्यमान आमदार आहेत. सदर मतदारसंघाचा समावेश असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसकडून संजय निरुपम किंवा सुरेश शेट्टी यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचं चित्र कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज येईल. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा सारखाच प्रभाव असल्याने हा मतदार संघ काहीसा मिश्र म्हणून परिचित आहे. कोणत्याही एकाच समाजाच्या मतांवर येथे निवडून येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे याच लोकसभा क्षेत्रातील या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रात लढाई खूपच अटीतटीची ठरणार आहे हे निश्चित.
6 वर्षांपूर्वी -
MIM आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे घेतली
महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाच्या आडून समाजात द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे, असा आरोप करत MIM चे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सदर मराठा आरक्षणा संदर्भातील दाखल झालेल्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी आमदार इम्तियाज जलील यांनी दाखल केलेली मराठा आरक्षणाविरोधातील याचिका अखेर मागे घेतली आहे. तसेच, महाराष्ट्र मागास प्रवर्गाचा संपूर्ण अहवाल मूळ याचिकाकर्ते तसेच विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कृष्णकुंज'वर आता दोन राजकन्या, अमित व मिताली यांचा आज मराठमोळा विवाह सोहळा
कृष्णकुंज हे महाराष्ट्र नवनिर्माणे सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आज अमित आणि मिताली यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त सजवण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासूनच घराचा परिसर प्रकाशाच्या झगमगाटात उजळून निघाला आहे. या विवाह सोहळ्यानिमित्त कृष्णकुंजवर यापुढे उर्वशी आणि मिताली अशा २ राजकन्या असतील. राजकारणातील एक मोठं कुटुंब असलं तरी साधेपणा हा त्यांच्या कुटुंबातील उत्तम गुण आहे.
6 वर्षांपूर्वी -
नीट पहा! फासावर लटकलेली व्यक्ती जलद धावते आहे? अरे कोण हे कार्टून व्यंगचित्रकार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी स्वतःला बळकटी देण्यासाठी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची बोचरी टीका राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून केली आहे.
6 वर्षांपूर्वी