महत्वाच्या बातम्या
-
दुर्दैव! हवेतल्या नेत्यांचे जमिनीवर भव्य इमले, तर जमिनीवरील नेत्याचे भूमिगत स्मारक?
स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आणि त्यांच्या जयंतीदिनी म्हणजे २३ जानेवारीला शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा समारंभ लहान स्वरूपात होणार असल्याने दिल्लीतुन कोणालाही निमंत्रण आणेल. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभास विशेष उपस्थित राहतील, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
विशेष रिपोर्ट- प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ही सेम असतं! सर्वकाही ठरवून?
आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना सुद्धा वेग आला आहे. परंतु, भाजप आणि शिवसेनेतील सर्व घडामोडींवर बारीक नजर टाकल्यास सर्वकाही २०१४ मधील लोकसभा निवडणुकीप्रमाणे ठरवून सुरु आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे याच २०१४ मधील राजकीय रणनीतीप्रमाणे भाजप आणि शिवसेनेने निवडणुका लढवल्या होत्या आणि प्रसार माध्यमांना एकप्रकारे स्वतःवर केंद्रित करून अप्रत्यक्षरीत्या गंडवले होते, असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई मॅरेथॉन: केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉनचा विजेता
मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाच्या वर्षातही केनिया तसेच इथियोपियाच्या धावपटूंनी स्पर्धेवर वर्चस्व गाजवलं. केनियाच्या कॉसमस लॅगटने पुरुष गटात मुख्य स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. तर महिला गटात इथिओपियाच्या वोर्केंश अलेमूने पहिला क्रमांक पटकावला. तर दुसरीकडे पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय खेळाडूंच्या गटात पुरुषांमध्ये नितेंद्रसिंह रावतने प्रथम तर सुधा सिंहने महिलांच्या गटात प्रथम स्थान मिळवलं आहे. पुरुषांमध्ये गोपी टी. ने द्वितीय क्रमांक तर करणसिंहने तिसरा क्रमांक मिळवला.
6 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत अंधेरी पूर्व भाजपकडून मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
भारतीय जनता पक्षाचे अंधेरी पूर्व येथील कार्यसम्राट नगरसेवक मुरजी पटेल, नगरसेविका केसरबेन पटेल आणि त्याची समाजसेवी संस्था ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ यांच्या सहकार्यातून भव्य मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून विशेष उपस्थिती होती.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई मॅरेथॉनने नाकारलं, त्याच ज्युनिअर मिल्खासिंग साईश्वर या मराठी धावपटूला देशभरातील मॅरेथॉनमध्ये वाईल्ड-कार्डने आमंत्रण
वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे. एकदा सहज म्हणून फिरायला कोल्हापूरला आला आणि धावण्याची हौस म्हणून पहिल्यांदा त्याने कोल्हापूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्याने सहज खिशात टाकली. परंतु तिथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील हिल मॅरेथॉन ही अवघड स्पर्धा जिंकली.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात संजय दीना पाटीलांचे किरीट सोमैयांना मोठे आवाहन?
आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यंदा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय दीना पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या या मतदारसंघात भाजपचे किरीट सोमैय्या खासदार असून त्यांच्यापुढे संजय दीना पाटील हे तगडं आवाहन उभं करतील अशी शक्यता आहे. किरीट सोमैयांची मुख्य मतपेटी ही मुलुंडमधील गुजराती वस्ती असलेला भाग आहे, तर संजय दीना पाटील यांची मुख्य मदार ही भांडुप आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कामगारांच्या संपात भाजपाने तेल ओतलं: उद्धव ठाकरे
बेस्ट कामगारांनी तब्बल ८ दिवसांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने संप मागे घेतला. मात्र मुंबई बेस्ट कामगारांच्या संपात भारतीय जनता पक्षाने तेल ओतलं आणि त्यांनीच कामगारांना शिवसेनेच्या नावाने शहरभर बोंबाबोंब करण्यास सांगितले, अशा रोखठोक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात वेटरची १३ पद आणि ७००० अर्ज, राज्यातील बेरोजगारीचं भीषण चित्र
भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड होत आहे. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले असून, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा: उत्तर पश्चिम मुंबईतून इच्छुक संजय निरुपम यांना स्थानिक कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता उत्तर पश्चिम मुंबईतून संजय निरुपम सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे वृत्त आहे. संजय निरुपम यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघातून लढविण्यापेक्षा ते स्वतःसाठी नवख्या आणि काही प्रमाणात भरवशाच्या उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत गोटातून समजते.
6 वर्षांपूर्वी -
आता डान्सबार सुरु झाल्याने छोटा पेंग्विन खूश असेल: नीलेश राणे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुंबई नाइट लाइफची मागणी देवाकडे इतकी मनापासून केली की डान्स बार पुन्हा चालू झाले, अशी बोचरी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका: उद्धव ठाकरे
इतरवेळी राज्य सरकार राजकीय निर्णय प्रचंड वेगाने घेतात, परंतु राज्यातील बहुचर्चित शिवस्मारकाबद्दल हलगर्जीपणाच आहे. भारतीय जनता पक्षाला आडवे येतील त्यांना ‘पटकून’ टाकू अशी भाषा वापरणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात आहे. तसं असेल तर मग शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांना सुद्धा पटकून टाका, अशा शब्दांमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोबाइल-सोनसाखळी चोर निघाला शिवसेना शाखाप्रमुखाचा मुलगा, स्थानिकांनी चांगलच झोडलं
अंधेरी पूर्वेकडील वॉर्ड क्रमांक ८० च्या शिवसेना शाखाप्रमुख कविता पांचाळ यांचा मुलगा विनायक याला तेथील स्थानिक लोकांनी तुफान तुडवून चांगलाच राग व्यक्त केला. त्याला भर रस्त्यात मार दिल्यानंतर स्थानिक पोलिसांच्याही स्वाधीन केलं. दरम्यान, विनायक विरोधात याआधी ५० पेक्षा अधिक मोबाइल चोरी तसेच सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठी सिनेमे ‘नशिबवान’ नाहीत; भाऊ कदमची पोस्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची गळचेपी झाल्याचं उदाहरण समोर आलं आहे. विशेष करून हिंदी भाषिक सिनेमांमुळे मराठी चित्रपटांची होणारी गळचेपी रोजचीच झाली आहे .कारण ‘आणि…डॉ काशिनाथ घाणेकर’, भाई, लव्ह यू जिंदगी या चित्रपटानंतर आता भाऊ कदमची मुख्य भूमिका असलेला ‘नशिबवान’ या चित्रपटाला शो मिळणे सुद्धा फार कठीण झाले आहे. त्यामुळे भाऊने कदमने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्वतःच्या भावना आणि चीड व्यक्त केली आहे. ‘नशिबवान’ हा चित्रपट मागील शुक्रवारी म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित झाला होता.
6 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का; डान्स बार'मधली छमछम सुरु होणार
राज्यात पुन्हा छमछम सुरू होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारने डान्स बारसाठी घालून दिलेली नियमावली सुप्रीम कोर्टाने आजच्या निकालात रद्द केले आहे. त्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा डान्स बारमधील छमछम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नियमांविरोधात अनेक डान्स बार मालकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी -
मतांसाठी वाट्टेल ते? प्रभू राम हे महाराष्ट्रात येणारे पहिले उत्तर भारतीय: पूनम महाजन
उत्तर भारतीय समाज म्हणजे मुंबईचा कणा असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या खासदार पूनम महाजन यांनी एका कार्यक्रमात विधान केला आहे. युपीच्या लोकांनी पुढे जाण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. तसेच या समाजानं मुंबईच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्याही विकासात मोलाचं आणि भरीव योगदान दिलं आहे, असं सुद्धा त्या उपस्थित उत्तर भारतीयांना संबोधित करताना म्हणाल्या. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात?
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी मुंबई काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार हालचाली सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे उत्तर मध्य मुंबईची आगामी लोकसभा निवडणूक प्रिया दत्त लढणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, त्यांच्या जागी आता स्वच्छ प्रतिमेचे राज्याचे माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवस्मारकाचे काम तातडीने थांबवण्याचे कोर्टाचे आदेश
राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणारे भव्य शिवस्मारक. परंतु, आता त्याच शिवस्मारकाचे काम थांबवण्यात यावे असे थेट आदेश महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
कोस्टल रोड; नवा टेंडर नवी युक्ती? विरोध करणाऱ्या उच्चभ्रूंसोबत सेना खासदार-आमदार-नगरसेवकांचा लाडीगोडी मॉर्निंगवॉक'?
मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे काही दिवसांपूर्वीच उदघाटन करण्यात आले होते. दरम्यान, प्राथमिक कामांना सुरुवात झाल्याने सी-फेसच्या प्रॉमनेडवर बॅरिकेटिंग केल्याने मॉर्निंग वॉक, जॉगिंग, व्यायाम करायला येणाऱ्या उच्चभ्रू स्थानिक रहिवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ‘वरळी सी-फेसच्या जॉगर्स अँड वॉकर्स असोसिएशन’ आणि ‘लाफ्टर क्लब’च्या सदस्यांनी कोस्टल रोडच्या कामाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
6 वर्षांपूर्वी -
हि बाकी 'बेस्ट' बातमी; ८ दिवसांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
बेस्ट कामगारांनी अखेर ८ दिवसांनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घोषित केला आहे. सदर प्रकरणी मुंबई हायकोर्टाने आता मध्यस्थाची नेमणूक करण्याची सूचना केली आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत तासाभरात संप मागे घेत असल्याचे जाहीर करा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. याला कामगार युनियनचे संबंधित नेते आणि वकिलांनी सुद्धा मान्यता दिली आहे. त्यानंतर पूढच्या काही तासाभरातच कर्मचारी युनियनकडून संप मागे घेत असल्याची घोषणा जाहीर होण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयांच्या सन्मान रॅलीत सेनेचे मंत्री-आमदार-खासदार जातात, मग मराठी बेस्ट कामगारांसाठी?
मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये उत्तर भारतीय समाज संकटात सापडताच मुंबई आणि ठाण्यात थेट ‘उत्तर भारतीय सन्मान मेळावे आणि मोर्चे’ आयोजित करणारा शिवसेना पक्ष बेस्टचा मराठी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय रास्त मागण्यांसाठी संपावर गेल्यावर कुठे मग्न होता, असा प्रश्न मुंबईकरांना मागील ९ दिवसांपासून पडला आहे.
6 वर्षांपूर्वी