महत्वाच्या बातम्या
-
VIDEO: कमलेश राय कोणत्या पक्षात? म्हणाले उद्धवजींना घेऊन या, अंधेरी पूर्वेतील काँग्रेस निवडणुकीसाठी सक्षम आहे
मरोळ अंधेरी पूर्व काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश राय यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी सुषमा राय या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यामुळे काँग्रेस नगरसेविकेच्या निधी आणि प्रयत्नातून मरोळ भवन ते सागबाग रोडचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, या भूमिपूजनाच्या कामाचे श्रेया लाटण्याचा शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी आणि आमदारांनी केविलवाणा प्रयत्न केला खरा, परंतु विद्यमान काँग्रेसच्या नगरसेविका असलेल्या सुषमा राय यांचे पती आणि माजी नगरसेवक कमलेश राय यांनी भाषणादरम्यान अंधेरी पूर्वेतील काँग्रेस किती सक्षम आहे याची जाणीव थेट उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत करून देण्याचं भाष्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे उपस्थित शिवसेनेचे आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिक पदाधिकारी सुद्धा तोंडघशी पडले आहेत. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार रमेश लटके आणि माजी नगरसेवक प्रमोद सावंत उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
बेस्ट कर्मचाऱ्यांनी उपसलं संपाचं हत्यार, मुंबईकर वेठीस
मुंबई बेस्ट कामगारांचा संप टळण्यासाठी मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका कुचकामी ठरल्या आहेत. दरम्यान, सामान्यांचे हाल टाळण्यासाठी आणि संप मोडून काढण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ‘मेस्मा’अंतर्गत कारवाईचा इशारा दिला, तसेच औद्योगिक कोर्टातून संप बेकायदेशीर ठरवून कामगारांनाच थेट कायदेशीर आव्हान दिले. त्यामुळे संतप्त झालेले बेस्ट कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
होय जाणारच अमितच्या लग्नाला, त्यात राजकारण नाही! आदित्य ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेचं लग्न येत्या २७ जानेवारीला होणार आहे. त्यानिमित्त राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही मातोश्रीवर नेऊन दिली, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाला लग्नाचे निमंत्रण दिले. परंतु, पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना लग्नाला जाणार का असा गमतीने प्रश्न विचारला.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयात पुन्हा एकदा तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; ६व्या मजल्यावरून उडी
मंत्रालयात पुन्हा एकदा एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु, संरक्षण जाळीमुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. या घटनेमुळे मंत्रालयात मोठी धावपळ झाली होती. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस यंत्रणेच्या मदतीने या तरुणाला सुरक्षितरित्या खाली उतरवलं.
6 वर्षांपूर्वी -
पोकळ धमक्या आणि पाद्रया पावट्यांच्या इशाऱ्यांना आम्ही घाबरत नाही: संजय राऊत
‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नहीं हुई तो पटक देंगे’, या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लातूर येथे दिलेल्या इशाऱ्यावरून आता शिवसेना-भाजपात शाब्दिक हमरीतुमरीला सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना उत्तर देताना असल्या पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे असे म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेचे नाव पुढे करून आयोजकांवर नागपूरहून दबाव आला का? असीम सरोदे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेच्या स्थानिक शाखेने इंग्रजी लेखिका असल्याच्या कारणावरून सहगल यांना विरोध केल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले असे आयोजक कारणं देते आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचा राजीनामा
शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेच्या दीपक सावंत यांचा मंत्रीपदाचा म्हणजे विधानपरिषद आमदारकीचा कालावधी आज संपणार आहे. दरम्यान, मी पक्षावर नाराज नाही, परंतु शिवसेनेत मला एखादी नवीन जबाबदारी दिली जाईल अशी आशा आहे, असं त्यांनी प्रसार माध्यमांकडे मत व्यक्त केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावं : राज ठाकरे
प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले आहे. त्यानंतर बरेच वादळ निर्माण झाले होते. साहित्यावर नितांत प्रेम करणारे राज ठाकरे यांच्या पक्षाकडून तशी मागणी झाल्याच्या बातम्या पुढे आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परंतु, त्याबरोबर अनेकांनी वेगळीच शंका सुद्धा व्यक्त केली होती आणि ती म्हणजे मनसेच्या नावाने दुसरंच कोणी तरी हे करत आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: दिव्यांग महिलेची टिंगल करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र सैनिकाच्या मदतीने अद्दल घडवली
दिवा येथे वास्तव्यास असणाऱ्या नूतन शेलार या दिव्यांग महिला असून, त्या काही कामानिमित्त घाटकोपर मार्गे अंधेरी येथे आल्या होत्या. त्यांच्या सोबत कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, अंधेरी येथे मेट्रोने उतरताच त्या वॉशरूमच्या दिशेने जात असताना तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या चालण्याची टिंगल टवाळी करण्यास सुरुवात केली.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना-भाजपामध्ये जागावाटप आणि युतीच्या गुप्त चर्चा सुरू, ४ बैठका झाल्या
आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस-एनसीपीदरम्यानचे जागावाटप पूर्णत्वाला आली असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीची सुद्धा गुप्तपणे चर्चा सुरू झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये आतापर्यंत एकूण ४ बैठका मुंबईतच पार पडल्याचे वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वाच्या नावावर असा खेळखंडोबा काँग्रेसच्या काळात सुद्धा झाला नव्हता: उद्धव ठाकरे
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उफाळलेला केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेने मोदी सरकार आणि आरएसएस’वर सामनामधून बोचरी टीका केली आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर देशात सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा तर काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा झाला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामनामधून केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
गुंतवणुकदारांचे पैसे थकवले, भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांच्या लोकमंगल'ची खाती सेबीकडून सील
गुंतवणुकदारांचे तब्बल ७४ कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश धुडकावल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभास देशमुख यांना ‘सेबी’ अर्थात सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने जोरदार दणका दिला आहे. मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’चे म्युच्युअल फंड आणि डी-मॅट खात्यांना सेबीकडून सील ठोकण्यात आले आहे. तसंच ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंत्री सुभाष देशमुख यांना नोटीस सुद्धा धाडण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा अपवाद वगळता, एकाही मराठी नेत्याला मराठी सिनेमाबाबत कळकळ नाही: मांजरेकर
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर अर्थात समोर नाव येते ते पुलंचेच. होय! पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या नावाची काय जादू आहे हे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आज सुद्धा जाणतो. लवकरच म्हणजे अगदी शुक्रवारी त्यांच्या आयुष्यावर ‘भाई’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. परंतु, दुर्दैव हे की अशा महान व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारित सिनेमासाठी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील महत्वाच्या थिएटर्समध्ये स्क्रीन आणि प्राइमटाइमच उपलब्ध नाही.
6 वर्षांपूर्वी -
पद्म पुरस्कार: फिल्मी भाजप, श्रीदेवी, रमाकांत आचरेकर सर व राज यांनी मांडलेलं ते वास्तव आज सिद्ध झाले
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
‘बोला काय विचारू?’, ‘मोदीमय’ मुलाखतीची राज ठाकरेंकडून खिल्ली
पंतप्रधानांच्या त्या मुलाखतीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून खिल्ली उडवली आहे. मोदींची ती मुलाखत म्हणजे स्वतःच स्वतःला प्रश्न विचारल्यासारखं होतं, असा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधानांना लगावला आहे. व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी हे स्वतःच स्वत:ची मुलाखत घेत असून यावेळी “बोला काय विचारु ?” असं प्रश्न ते स्वतःलाच दुसऱ्या बाजूने करत आहेत असं दाखवलं आहे. त्या मुलाखतीचा एक ‘मनमोकळी’ मुलाखत ! असा उल्लेख राज ठाकरे यांनी केला असून, ती ठरवून केलेली मुलाखत होती असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींची मुलाखत म्हणजे चहाच्या पेल्यातले वादळ : उद्धव ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या मुलाखतीचे वादळ हे चहाच्या पेल्यातलेच ठरले आणि मोदी हे केवळ बचावात्मक पवित्र्यात दिसले तसेच २०१९ ची चिंता त्यांच्या हावभावात स्पष्ट दिसत होती, अशा बोचरी टीका सामनामधून मोदींच्या मुलाखतीवर करण्यात आली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्योगमहर्षि रतन टाटांना अमित ठाकरे यांच्या लग्नाचे निमंत्रण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरूडेशी होणार असून नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मंडळींना आमंत्रित करत लग्न अगदी साध्या पद्धतीने करणार असल्याचे राज ठाकरे यांनी याआधीच सांगितले होते. त्यामुळे घरातील आणि नात्यांमधील ती मोजकी मंडळी कोण याची सरावांनाच उत्सुकता होती.
6 वर्षांपूर्वी -
नगर: प्रथम सेनेकडून एनसीपी व काँग्रेससोबत पाठिंब्यासाठी चर्चा सुरु होती: रामदास कदमांचा गौप्यस्फोट
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिलेला झटका शिवसेनेच्या फार जिव्हारी लागलेला आहे. दरम्यान, नगरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम पाठिंब्यासाठी काँग्रेस आणि एनसीपीशी चर्चा केली होती. परंतु, एनसीपीने आयत्यावेळी धोका दिल्याचा आरोप शिवसेनेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
नववर्षाचं स्वागत सिद्धिविनायकाच्या आरतीने
जगभरात सध्या नववर्षाची धूम पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांवर मध्यरात्री मुंबईकरांसह राज्यातून न्यू ईअरचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या सेलिब्रेशननंतर आता, नववर्षाची सुरुवात श्री. सिद्धिविनायकाच्या चरणी नमन करून होते आहे. त्यामुळे भाविकांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
'बायको शिवसेनेसारखी पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही' : नितेश राणे
आमदार नितेश राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सामनातील आजच्या संपादकीय मध्ये आलेल्या अग्रलेखाचा संदर्भ घेऊन निलेश राणेंनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा त्यांच्याच भाषेत चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे.
6 वर्षांपूर्वी