महत्वाच्या बातम्या
-
मोदींच्या हस्ते होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही
आगामी लोकसभा निवडणुका अगदी ३-४ महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने निवडणुकीचे उदघाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते कल्याण तसेच पुण्यात मेट्रो ट्रेनचे भूमिपूजन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे हा कार्यक्रमाला भाजपचा मित्र पक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही.
6 वर्षांपूर्वी -
सेना आमदार उदय सामंत म्हाडा अध्यक्ष, हा योगायोग? सेना शाखाप्रमुखाला ५ कोटींची दोन घरे!
माजी खासदार निलेश राणे यांनी काही दिवसापूर्वीच मुंबई म्हाडाचे अध्यक्ष आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांच्याबाबत एक ट्विट केलं होतं. दरम्यान, काल घोषित झालेल्या नशीबवान उमेदवारांमध्ये खरी लॉटरी लागली आहे ती शिवसेनेच्या एका शाखाप्रमुखाला. इथे खरी लॉटरी लागली आहे ती शिवसेना खासदार, नगरसेवक आणि शाखाप्रमुख यांची असंच म्हणावं लागेल. कारण म्हाडाच्या इतिहासातील ग्रँट रोड येथील ५ कोटी किंमत असलेल्या दोन घरांसाठी शिवसेना शाखाप्रमुख विनोद शिर्के यांना खरी लॉटरी लागली आहे. तर शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना लोअर परळ येथील ९९ लाखांच्या घराची लॉटरी लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईतील सेव्हन-हिल्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या पैशातून मोठा आर्थिक घोटाळा?
मुंबईमधील अंधेरी पूर्व येथील सेव्हन-हिल्स हॉस्पिटल’मध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे वृत्त आहे. सध्या व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या नावावर हा घोटाळा ढकलून स्वतःची कातडी वाचवण्याच्या हालचाली करत असल्याचे वृत्त आहे. सदर हॉस्पिटलचा विक्री व्यवहार सध्या न्यायप्रविष्ट आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंच्या हस्ते कोस्टल रोडचे भूमिपूजन; तर राज ठाकरे स्थानिक कोळी समाजाच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वरळी कोळीवाड्याला भेट दिली. कारण मुंबईतील नियोजित सागरी मार्गामुळे स्थानिक मच्छिमार मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान, या मार्गासाठी बांधकाम करताना भराव टाकला आणि खांब उभारले तर आम्हाला आमच्या बोटी उभ्या करता येणार नाही. आणि त्यामुळे होणाऱ्या बदलांमुळे मच्छीमारी करणे सुद्धा अवघड होणार आहे. दरम्यान, या सर्व समस्या कोळी समाजाने राज ठाकरे याना सांगितल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
जेवणाचे बुरे दिन! सामान्यांच्या ताटातील भाकरी महागली
सध्या महागाईने हैराण झालेल्या सामान्य माणसाच्या ताटातील भाकरी सुद्धा महागली आहे. उत्पादनात घट झाल्याने मुंबईत ज्वारी आणि बाजरीचे दर दाम दुप्पट झाले आहेत. तसेच खानावळीत सुद्धा तयार भाकरीच्या दरात जवळपास ४ ते ५ रुपयांची वाढ झाल्याने मुंबईकरांच्या खिशाला भगदाड पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरबीआय गव्हर्नरपदी दास यांची नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात : उद्धव ठाकरे
आरबीआय’च्या गव्हर्नरपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. मोदी सरकारला कोणत्याही विषयात सत्य समोर ठेवणारे लोक नको असून केवळ हो ला हो बोलणारे होयबा हवेत अशी खरमरीत शब्दांत टीका केली आहे. दरम्यान, शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नेमणूक त्याच उद्देशाने झाली असेल तर ही येऊ घातलेल्या आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असं मत सामनाच्या अग्रलेखातून आज व्यक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे मोदी सरकार अर्थव्यवस्थेशी खेळत असल्याचे सामनातून म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंचा पाळलेला कुत्रा: नितेश राणे
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी काल खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, नारायण राणे म्हणजे कोकणाला लागलेला काळा डाग आहे, हा डाग धुतल्याशिवाय राहणार नाही’. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी रामदास कदमांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कंत्राटी महाभरतीमुळे भाजप-शिवसेना बेरोजगारांना भविष्यात महा-बेरोजगारीकडे ढकलतील? सविस्तर
महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकार आगामी निवडणुकीच्या तोंडावर कंत्राटी महाभरतीचा खेळ करत आहे खरा, परंतु कंत्राटी नोकरी प्राप्त करणारे हेच उमेदवार भविष्यात बेरोजगार महाबेरोजगार ठरण्याची शक्यता अभ्यासाअंती समोर येते आहे. कारण विविध विभागांतील आणि क्षेत्रीय कार्यालयांतील रिक्त जागांपैकी ७० टक्के पदे बाहेरील यंत्रणेमार्फत आणि कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गडकरींकडून विजय मल्ल्याची पाठराखण, म्हणाले 'तो घोटाळेबाज कसा'?
विजय मल्ल्याचे लंडनमधून भारतात प्रत्यार्पण होण्याआधीच त्याला सज्जन असल्याचा दाखल देण्यास भाजपकडून सुरुवात. कारण खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीच बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून आणि देशातून पलायन कडून लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या मल्ल्याची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेवर मतं फोडाफोडीचे आरोप करणारी शिवसेना देशभर भाजपची मत फोडण्यात व्यस्त?
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव आणि ३ हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शिवसेना उमेदवारांचे या हिंदी भाषिक राज्यांमध्ये डिपॉझिट जरी जप्त झाले असले तरी, याच तीन राज्यांमधील भाजपचे ५ आमदार शिवसेनेने घेतलेल्या मतांमुळे पराभूत झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तो पराभव मोदींचाच! सामनातून उद्धव ठाकरेंची टीका
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाला आलेल्या अपयशावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सामनातून टीका बोचरी टीका केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नम्रपणाची स्तुती करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व जनतेने स्वीकारले : शरद पवार
५ राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे जाहीर अभिनंदन केले. जनतेने कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व स्वीकारले असे सुद्धा ते म्हणाले, तसेच नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
6 वर्षांपूर्वी -
हिंदी भाषिक राज्यांतील निकालाने भाजप-सेनेच्या मुंबई व आसपासच्या उत्तर-भारतीय राजकारणाला सुरुंग?
कालच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात तेलंगणात तिथला स्थानिक पक्ष टीआरएस’ने बाजी मारली, तर मिझोरामची सत्ता काँग्रेसने गमावली असली तरी तिथे सत्ता ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या स्थानिक पक्षाकडे गेली आहे. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यामध्ये भाजपच्या पुरता फज्जा उडाला असून भाजपचं या दोन राज्यांमधील अस्तित्व नगण्य झाले आहे. परंतु, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करेल हे निश्चित आहे.
6 वर्षांपूर्वी -
नेटकऱ्यांचे प्रश्न: 'मतदारांनी खरे धाडस दाखवले', पण तुम्ही सत्तेला लाथ मारण्याचं धाडस कधी दाखवणार?
४ राज्यांमधील मतदारांनी आगामी निवडणुकीत पर्याय कोण? याचा जराही विचार न करता जे नकोत त्यांना थेट नाकारले आहे. आणि त्यांना उखडून फेकले आहे. त्यामुळे असे धाडस दाखवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संध्याकाळी ५ वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आजच ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाला सर्व राज्यांमध्ये अपयश आल्याचे चित्र आहे. प्रसिद्ध होत असलेल्या निकालांनंतर भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: मुंबई उच्च न्यायालयाच्याबाहेर वकील सदावर्तेंवर हल्ला
मुंबई हायकोर्टाच्याबाहेर वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एका अज्ञातांव्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हल्ला केलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून राग मनात ठेवून सदर व्यक्तीने हल्ला केला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्या हल्लेखोराला पोलिसांनी न्यायालयाच्या आवारातच ताब्यात घेतलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आढावा विधानसभेचा: अंधेरी पूर्व मध्ये 'काटे की टक्कर', भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत मुरजी पटेल यांचं पारडं जड
सध्या अंधेरी पूर्वेचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. शिवसेनेचे रमेश लटके हे येथील विद्यमान आमदार आहेत. परंतु आगामी निवडणूक मात्र त्यांच्यासाठी जड असल्याचे एकूण चित्र आहे. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा सारखाच प्रभाव
6 वर्षांपूर्वी
असल्याने हा मतदार संघ काहीसा मिश्र म्हणून परिचित आहे. कोणत्याही एकाच समाजाच्या मतांवर येथे निवडून येणे जवळपास अशक्य आहे. या मतदारसंघात यंदाची विधानसभा लढाई खूपच आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. -
मातोश्रीवरील 'ती' डिजिटल स्क्रीन, राज ठाकरेंच्या भोवती सेनेचं पुन्हा तेच २०१४'चं मृगजळ?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळं होत स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. आज मार्ग वेगवेगळे असले तरी आरोप प्रत्यारोपांच्या मार्गे अनेक गोष्टीत घडला असल्या तरी राज ठाकरे यांचे मातोश्रीवर स्थान अजून टिकून आहे असंच म्हणावं लागेल. कारण, ‘मातोश्री’वर एका डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून शिवसेनेचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये राज ठाकरेंची अनेक छायाचित्रं आहेत. निवडणुकांची चाहूल लागताच राज ठाकरेंना पाण्यात पाहणारे त्यांची जवळीक साधण्याचे अप्रत्यक्ष प्रयत्न सुरु करतात आणि एखाद्या विषयावरून चर्चा घडवून आणतात.
6 वर्षांपूर्वी -
सेना नेत्यांवर योगी इफेक्ट? मलबार हिलचे नाव 'रामनगरी' करण्याची मागणी
सध्या देशभर शहर आणि विविध स्थानकांचे नामकरण करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. मूळ पायाभूत सुविधा दुर्लक्षित करून लोकांना धार्मिक नामकरणाच्या आडून मूर्ख बनवण्याचे उद्योग सुरु आहेत. यात सर्वाधिक विक्रम उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहेत. त्याचा परिणाम आता सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांवर सुद्धा झाल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
मनसेच्या आंदोलनाचा शॉक, चौकशीचे आदेश आणि अदानी’च्या वीज दरवाढीस MERC'चा अटकाव
काही दिवसांपूर्वी नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत अनेक लोकांच्या तक्रारींच्या रीघ लागल्या असताना अदानी इलेक्ट्रिसिटीच्या कारभाराकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत होतं. त्यांनतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या नैतृत्वाखाली थेट अदाणींच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर अदानी व्यवस्थापनाशी सदर प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करून लोकांच्या अडचणी तसेच कंपनीकडून होणाऱ्या त्रुटी निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या.
6 वर्षांपूर्वी