महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षण विधेयक; आज एटीआर विधिमंडळात
मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचे विधेयक तसेच मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील महाराष्ट्र सरकारचा कृती अहवाल, आज विधिमंडळात मांडण्यात येणार असा;असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ युपी २०१६; रामलीला'मध्ये नवाजुद्दीन मुस्लिम असल्याने शिवसेनेने विरोध केलेला, आज?
सध्या शिवसेनेने अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सुरु केलं असलं तरी त्यांचा खरा मुखवटा अनेक विषयांवरून समोर येताना दिसत आहे. शिवसेना नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार करते असे सांगत असताना, दुसऱ्या धर्माचा सुद्धा आदर करते असे भाषणात नेहमीच कानावर पडते. शिवसेना केवळ पाकिस्तान आणि बांगलादेश धार्जिण्या मुस्लिमांच्या विरोधात आहे, असं ठासून सांगत असते. परंतु, उत्तर प्रदेशातील मुज्जफरनगर यथे २०१६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रामलीला’मध्ये मारीच’ची भूमिका करणाऱ्या नवाजुद्दीन सिद्दीकीला शिवसेनेने केवळ तो मुस्लिम असल्याने रामलीला’मध्ये भूमिका करण्यास तीव्र विरोध केला होता.
7 वर्षांपूर्वी -
महागाईत भाजप-शिवसेना सरकारची भेट, मुंबईत घर खरेदी अजून महागणार
मुंबईकरांना घर खरेदी करणे अजून आवाक्याबाहेर जाणार आहे. कारण भाजप-शिवसेना युती सरकारने स्टॅम्प डय़ुटीत १ टक्का वाढ केली असून तसे विधेयक विधानसभेत काल अधिकृतपणे मंजूर केले आहे. दरम्यान, अधिवेशनात मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक सुद्धा कोणतीही चर्चा न करता गोंधळातच मंजूर झाले असे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वतः दिलेल्या आश्वासनांचं काय ते न सांगता, उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपच्या आश्वासनांवर आगपाखड
राज्यात मागील ४ वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची सत्ता असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा प्रमुख घटक असलेली शिवसेना मागील साडेचार वर्षांपासून केंद्रात सुद्धा भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आहे. वास्तविक सामान्य लोकांना भाजप आणि शिवसेना हे दोन्ही सत्ताधारी पक्ष उत्तर देण्यास बांधील असताना शिवसेना सामान्यांना केवळ भाजपच्या आश्वासनांची आठवण करून देण्यात व्यस्त आहे असे दिसते.
7 वर्षांपूर्वी -
सिंचन घोटाळा; माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास : अजित पवार
महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकण विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारास संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार हेच पूर्णपणे जबाबदार आहेत, असे प्रतिज्ञापत्र अँटी करप्शन विभागाने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी रीतसर दाखल करण्यात आले आहे. त्यावर प्रसार माध्यमांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न केला असता माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विधानभनवाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला अटक
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाने भीषण परिस्थिती ओढवली आहे. नापिकीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत असून तो आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर राजीनाम्याच्या कागदी होड्या सापडल्याचे वृत्त: विखे पाटील
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारी केल्यानंतर आता विरोधकांनी त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर राजीनाम्याच्या काही कागदी होड्या सापडल्या आहेत, अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट पत्रकार परिषदेत केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मूळ प्रश्न सोडून 'राम मंदिर' गंभीर विषय करणाऱ्या सेनेला मतदार अद्दल घडवू शकतो: सविस्तर
सध्या देशात विविध प्रश्नांनी शहरी आणि ग्रामीण जनता त्रासलेली आहे. त्यात वाढलेली महागाई, बेरोजगारी, दुष्काळ आणि उद्योगांचा घसरता आलेख असे एक ना अनेक गंभीर प्रश्न राज्यापुढे असताना केवळ आगामी निवडणुकीच्या उद्देशाने प्रेरित होऊन आणि मतदाराला गृहीत धरून राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्वाचा असल्याचे देखावे करणाऱ्या शिवसेनेबद्दल सामन्यांमध्ये प्रचंड रोष असल्याचे पाहायला मिळत आहे. सामान्य लोंकांना अशा विषयांमध्ये काहीच रस राहिलेला नसून केवळ याच विषयाला पुढे रेटणाऱ्या शिवसेनेविरुद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण: ‘संवाद यात्रा’ विधान भवनावर येण्याआधीच कार्यकर्त्यांची धरपकड
सध्या मुंबईमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज ‘संवाद यात्रा’ आयोजित केली आहे. आज मुंबईमध्ये थेट विधान भवनावर धडकणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक मुंबईमध्ये विधानभवनावर धडक देणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
प्रभू श्रीराम म्हणतात, देश घातलात खड्यात आता माझ्या नावाने!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यांनी आजच्या व्यंगचित्रातून अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना, भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांवर बोचरी टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरल्यानेच त्यांना राम मंदिर आठवलं
भारतीय जनता पार्टीने सामान्यांना विकासाची दाखविलेली स्वप्ने पूर्णपणे भंग पावल्याने ते सामान्यांचे मन विचलित करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने पुन्हा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. असे असले तरी रामाच्या नावावर भविष्यात पुन्हा मते मिळणार नाहीत,’ असं पृथ्वीराज चव्हाण यांनी मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा आमच्या युतीसाठी पोषक : फडणवीस
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अयोध्येतील राम मंदिराच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान, काल पासून ते अयोध्येच्या दौऱ्यावर असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या संबंधित प्रकरणावर प्रसार माध्यमांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी या दौऱ्याचे सर्मथन केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
निवडणुकांआधी राम-राम आणि निवडणुकांनंतर आराम, हेच मोदी सरकारचं काम
येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, अयोध्येला येण्यामागे माझा कोणताही छुपा अजेंडा नाही. मी केवळ देशातील तमाम हिंदुंची भावना व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे. परंतु, आता मोदी सरकारने तमाम हिंदुंच्या भावनांशी अजिबात खेळू नये. एवढे दिवस, वर्षे आणि पिढी गेली तरी अजून अयोध्येत राम मंदिर उभे राहत नाही. युपीचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीच सांगितल्याप्रमाणे मंदिर येथे होतं, आहे आणि राहिलं सुद्धा या मताशी आम्ही पण सहमत आहोत. परंतु, हे राम मंदिर आम्हाला दिसत का नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे कुटुंबीय आज विशेष विमानाने अयोध्येला रवाना होणार
सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनी धार्मिक राजकारण तापविण्यास सुरुवात केली आहे. आधीच भाजप समर्थक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा आणि लॉन्गमार्च आयोजित करत आहेत. त्यात उद्या उद्धव ठाकरे कुटुंबीय सुद्धा आज विशेष विमानाने अयोध्येला प्रयाण करत आहेत. सध्या तणावाचे राजकीय आणि धार्मिक वातावरण निर्माण करून त्याचा पक्षाला कसा फायदा करून घेता येईल अशी सत्ताधाऱ्यांची रणनिती आहे.
7 वर्षांपूर्वी -
अयोध्येत संयुक्त व्यापार मंडळं उद्धव ठाकरेंना काळे झेंडे दाखवणार
अयोध्येत राम मंदिर निर्माणाचे काम सुरु करण्यात यावे यासाठी येत्या २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर इतर अनेक हिंदुत्ववादी संघटना अयोध्येत त्याच दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यात स्थानिक व्यापारी वर्गाच्या मनात भितीची भावना निर्माण झाली असून केवळ निवडणुकीच्या राजकारणापायी इथली शांती भंग करण्याचा या संघटनांनी चंग बांधला आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी आयुक्तांसोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव हे केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज हे महापौर बंगला मागत आहेत, उद्या राज भवन सुद्धा मागतील. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
दूध आणि अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप: गिरीश बापट
यापुढे महाराष्ट्रात दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करून सामान्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांना यापुढं जन्मठेपेची शिक्षा होणार आणि तशी अधिकृत माहिती गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत दिली. त्यासाठी सरकारकडून कायदा केला जाणार असून तसं विधेयक लवकरच सभागृहात मांडलं जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे आझाद मैदानावर जाऊन उपोषणाला बसलेल्या शिक्षकांची भेट घेणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी मुबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेणार आहेत. आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयात दुपारी १.०० वाजता ही भेट होणार असल्याचे समजते. काही दिवसांपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानावर उपोषणास बसलेल्या शिक्षकांची सुद्धा ते भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
मातीत राबणारा बळीराजा मुंबईत, तर सत्ताधीश हेलिकॉप्टरने मातीचा कलश घेण्यासाठी शिवनेरीवर
राज्यातील दुष्काळ तसेच आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभरातील बळीराजा आणि आदिवासींनी भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. भव्य लोकसंघर्ष मोर्चा मुंबईतील सोमय्या मैदानातून आता आझाद मैदानाच्या दिशेनं रवाना झाला आहे. प्रलंबित वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि संपूर्ण कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा आणि आदिवासींनी हा भव्य मोर्चा काढला आहे. दरम्यान, झोपलेल्या भाजप-शिवसेना सरकारला जाग आणण्यासाठी ठाणे, पालघर पासून ते थेट भुसावळ जिल्ह्यातील बळीराजा आणि आदिवासी समाज एकवटला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शिवराय लक्षात ठेवतील, कधी न येणा-या कावळ्यांना : नितेश राणे
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामनामाचा जप करण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केल्याने त्यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जाण्यापूर्वी माती कलश घेऊन जाण्यासाठी शिवनेरीवर दाखल झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी