महत्वाच्या बातम्या
-
राज्यात दुष्काळ असताना सत्ताधारी राम मंदिरावरून वातावरण दूषित करत आहेत
सध्या राज्यात दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकरी तसेच शेती व्यवसाय संकटात आहे आणि त्यामुळे आत्महत्या सुद्धा वाढत आहेत. परंतु केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल जराही आस्था राहिलेली नाही. कारण राज्यातील दुष्काळावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी पक्ष केवळ राम मंदिराचा मुद्दा काढून समाजात जाणीवपूर्वक दुषित वातावारण तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात भर म्हणजे घटनात्मक संस्थांवर हल्ले करुन त्या सर्व बाजूनी दुबळ्या करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून सत्तेतून हद्दपार करुया, असा थेट हल्लाबोल एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सरकावर केला.
7 वर्षांपूर्वी -
आता वॉचमन-लिफ्टमन'साठी राम कदमांकडून 'ओडोमॉस' वाटप; नेटकऱ्यांनी झाडलं
सध्या मच्छरचा त्रास हा केवळ रात्रपाळी करणाऱ्या वॉचमन – लिफ्टमनलाच होतो याचा जावईशोध भाजपचे वादग्रस्त आमदार राम कदम यांनी लावला आहे. त्यासाठीच त्यांनी थेट ‘ओडोमॉस’ जाहिरातबाजी करून त्यांनी आपला एक व्हिडीओ ७ नोव्हेंबर रोजी फेसबूक आणि ट्विटरवरुन शेअर केला होता. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हा व्हिडीओपाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे रोखठोक पणे मराठीची व्याख्या थेट उत्तर भारतीयांच्या मंचावर मांडणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर भारतीय महापंचायतने १२ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, ते निमंत्रण त्यांनी स्वीकारल्याची अधिकृत माहिती पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला स्वतः राज ठाकरे संबोधित करून पक्षाची भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
२५ नोव्हेंबरलाच सेनेचं ‘चलो अयोध्या’ आणि RSS'ची सभा? देशात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर देशात धार्मिक तेढ वाढविण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न सुरु झाले आहेत का अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. कारण हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा हाती घेत शिवसेनेने ‘२५ नोव्हेंबरला चलो अयोध्या’ चा कार्यक्रम आखला आहे आणि त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा म्हणजे २५ नोव्हेंबरला राम मंदिराच्या मागणीसाठी प्रचंड सभा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
२७ लाख भाडे! मराठी आजींची शिवसेनेच्या मुंबई महापालिकेकडून लुबाडणूक तर मनसे मदतीला
२७ लाख भाडे! मराठी आजींची शिवसेनेच्या मुंबई महापालिकेकडून लुबाडणूक तर मनसे मदतीला
7 वर्षांपूर्वी -
२७ लाख भाडे! मराठी आजींची शिवसेनेच्या मुंबई महापालिकेकडून लुबाडणूक तर मनसे मदतीला: सविस्तर
मुंबई महानगरपालिकेच्या KEM रुग्णालयात तब्बल ३७ वर्षे सेवा करणा-या परिचारिकेने सेवानिवृत्त झाल्यानंतर, कुटुंबाला राहण्यास हक्काचे घर नसल्याने त्या पतीसोबत स्टाफ क्वाटर्समध्ये मागील ४ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतु, या ४ वर्षांचे तब्बल २७ लाख रुपये इतके प्रचंड भाडे मुंबई महापालिकेने आकारल्याने या गरीब आजींना रोज रडू कोसळत आहे. तब्बल २७ लाख रूपये भाडे आकारत शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आणि रुग्णालय प्रशासन या गरीब आजींना लुबाडत आहे का ? असा सवाल मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्याचे वनमंत्री शिकारी माफियासोबत पैसे कमवत आहेत: संजय निरुपम
कांग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या शिकारीनंतर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वनमंत्री सुधीर मुंगंटीवार हे शिकारी माफियांसोबत पैसे कमवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
हिंदूंनो! पुतळ्याचे लॉलीपॉप दाखवणाऱ्यांपासून सावधान: शिवसेना
जसजशी लोकसभा निवडणुक जवळ येत आहे, तसा राम मंदिराचा विषय अधिक गडद करण्याचा प्रयत्नं सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात श्री. रामचा भव्य पुतळा उभारण्याचे संकेत दिले होते. त्याला अनुसरूनच मित्र पक्ष शिवसेनेने सामना या मुखपत्रातून मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर’ला प्राइमटाइम द्या.....अन्यथा!, मनसे मैदानात
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या दिमाखात प्रदर्शित झालेल्या “आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर”या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात सलग सुट्ट्यांमुळे ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपटट पाहण्यासाठी कल्याणमधील सिनेमॅक्स येथे गेलेल्या प्रेक्षकांचा पूर्ण हिरमोड झाला आहे. दरम्यान, उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या या चित्रपटाला कल्याणमधील सिनेमॅक्समध्ये दिवसभरात केवळ एकच शो देण्यात आला आहे. आणि तो सुद्धा भर दुपारी ३ वाजताचा. परंतु, प्रेक्षकांचा पूर्ण भ्रमनिरास करणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे सिनेमॅक्समध्ये शो जास्त ठेवण्यात आले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अखेर आज मराठा समाजाच्या स्वतंत्र पक्षाची स्थापना
पाडव्याच्या मुहूर्तावर आज ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नव्या मराठा समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्ही राजकीय पक्षाची स्थापना करत असल्याचं सुद्धा ते म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
शेतकरी जोडपं...एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून तर याद राखा: व्यंगचित्र
राज्यातील बळीराजाची घोर फसवणूक करून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्रातील युती सरकारला दमडीची सुद्धा ओवाळणी देऊ नये असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीतले त्यांचे ५वे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना साडी नेसलेल्या स्वरूपात दाखविले आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्थायी अध्यक्षांनी महापौर बंगल्यात गायलं 'उद्धवा, अजब तुझे सरकार!' आणि सर्वांना हसू अनावर
मुंबई महापौर बंगल्यात “दिवाळी संध्या” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यावरील ही शेवटची “दिवाळी संध्या” असल्याचे म्हटले जात आहे. या कार्यक्रमाला महापालिकेतील अधिकारी, नगरसेवक आणि अनेक पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले होते.
7 वर्षांपूर्वी -
त्या जमिनीसाठी अवनीची हत्या? अनिल अंबानींसाठी देश विकायला काढला आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय योग्य नव्हता असं म्हटलं आहे. केवळ पुतळे उभारुन देशभरात वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
यांच्या फेकलेल्या हजारो-लाखो कोटींच्या आकड्यांनी लक्ष्मी सुद्धा थक्क: व्यंगचित्र प्रसिद्ध
भारतीय जनता पक्षाला मनसे अध्यक्षांनी व्यंगचित्रांची मालिका प्रसिद्ध करून हैराण करून सोडले आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा चार साडेचार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी ‘फेकलेले’ हजारो, लाखो कोटींचे आकडे आकडे पाहून लक्ष्मी सुद्धा थक्क झाल्याचे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
भर दिवाळीत भाजपवर 'राज'कीय फटाके, भाजप IT सेल चवताळण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष केलं असून त्यांना नरकासुर असं म्हटलं आहे. व्यंगचित्रात अमित शहा हे भाजपाला पडलेलं दिवाळी स्वप्न असून, अमित शहा हे नरकासूर असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अभ्यंगस्नान, साहेब! अख्खा महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला आहे पाठवू का?
आज नरकचतुर्दशी म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ. आज प्रथेनुसार या दिवशी केलं घरोघरी अभ्यंगस्नान केलं जातं. नेमका याच अभ्यंगस्नानाचा संदर्भ घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. सध्या राज्यात महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या अशा एक ना अनेक विषयांवरून राज्य सरकारवर सामान्य जनता प्रचंड नाराज आहे आणि त्याचा सुद्धा अप्रत्यक्ष संदर्भ यात आहे.
7 वर्षांपूर्वी -
....मग या सरकारवर पण गोळ्या झाडा: संजय राऊत
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याने टीकेची झोड उठवली आहे. तसेच मागील ४ वर्षांत कित्येक शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या, तर राज्यातील सरकारवर (राज्यात भाजप-सेनेचं युती सरकार आहे) सुद्धा गोळ्या झाडायच्या का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
अवनीला भेकडासारखे मारले, शिवसेनेचं टीकास्त्र
दोन दिवसांपूर्वी अवनी या टी-१ वाघिणीला महाराष्ट्र वन खात्याने विशेष मोहीम राबवून ठार केल्यानंतर संपूर्ण देशात टीकेचा सूर उमटला आहे. अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने संपूर्ण देशभर पडसाद उमटत आहेत. आता शिवसेनेने सुद्धा अवनीवरून भाजप आणि वनखात्याविरोधात विरोधात आवाज उठवला आहे. ‘ज्या महाराष्ट्रात माणसं सुद्धा नीट जगू शकत नाहीत, त्याच राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? पण अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारण्यात आले आहे. रात्रीच्या अंधारात उंदरांना सुद्धा वाघाचे बळ येते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामनामधून भाजपवर आणि वन खात्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
देश ‘आयसीयू’त, पण निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल: राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा मोदी सरकारच्या मागील चार साडेचार वर्षाच्या कार्यकालावर व्यंगचित्रातून टीका केली आहे. केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यापासूनच्या त्यांनी भारतात काय परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्यामुळे भारत देशच सध्या आयसीयूमध्ये गेला आहे असं म्हटलं आहे. परंतु, आगामी लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी टीका व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त करण्यात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
जितेंद्र आव्हाड पुन्हा उद्धव ठाकरेंच्या भेटीला, तासभर चर्चा झाली
एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा ‘मातोश्री’वारी केली असून त्यांनी पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जवळपास तासभर चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे म्हटले जात असले तरी तासभर चर्चा झाल्याने इतर राजकीय अंदाज सुद्धा बांधले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी