महत्वाच्या बातम्या
-
मतदाराला आमिष? मतदार यादीत नाव नोंदवून आम्हाला कळवा आणि मिळवा.....
मतदाराला आमिष? मतदार यादीत नाव नोंदवून आम्हाला कळवा आणि मिळवा…..
7 वर्षांपूर्वी -
वीज कर्मचा-यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य शासनात ३ वर्षे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या कर्मचार्यांची ३ वर्षांची कंत्राटी सेवा, सेवानिवृत्ती वेतनासाठी, सेवानिवृती इतर लाभांसाठी तसेच पदोन्नतीसाठी ग्राह्य धरली जाते. पण महावितरण कंपनीने नियुक्त केलेल्या कंत्राटी कामरचार्यांना हा लाभ मिळत नाही. कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळावा, असे साकडे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांना घातले.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंवर जीवघेणा हल्ला, थोडक्यात बचावले
शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून आमदार काते थोडक्यात बचावले आहेत, परंतु त्यांच्या सुरक्षारक्षका सहित अन्य २ जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मुंबई मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर येथील मेट्रो-३च्या कारशेड परिसरात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
आम्हाला मोदी भक्त म्हटलं जातं अंध भक्त नाही: भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ
भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नवा जावई शोध लावला आहे. त्यांच्या महान अध्यात्म ज्ञानानुसार नरेंद्र मोदी म्हणजे भगवान विष्णूचा ११ वा अवतार असल्याचं वादग्रस्त ट्विट त्यांनी केलं आहे. भारताच्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, तसेच भारतमातेला आपण देव मानतो. पंतप्रधान हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्याप्रमाणे करत आहेत त्याचा विचार करता आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असे वाघ यांनी म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई : मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये मनोजकुमार मौर्या यांची गोळ्या झाडून हत्या
मुंबई : मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये मनोजकुमार मौर्या यांची गोळ्या झाडून हत्या
7 वर्षांपूर्वी -
भाजपचा गोपनीय सर्वेक्षण अहवाल, जवळपास ५० आमदारांचा निवडणुकीत सुपडा साफ होणार?
भाजपने केलेल्या पक्षाच्या अंतर्गत अहवालात जवळपास ६ खासदारांचा आणि तब्बल ५० च्या आसपास आमदारांचा आगामी निवडणुकीत सुपडा साफ होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त अंतर्गत गोटातून समजले आहे. त्यामुळे ते बंद लिफाफ्यात भाजपच्या आमदारांना तसेच खासदारांना देण्यात आले आहेत. भाजप सरकारने दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण करुन घेतले होते. त्यात हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शासनाच्या चुकीमुळं एका रात्रीत उपनिरीक्षकांवर पुन्हा पोलीस कॉन्स्टेबल बनण्याची वेळ
ज्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्तीचं पत्र मिळालं त्याच दिवशी न्याधिकरणाचा आदेश देत सर्व नियुक्ती रद्दीचं पत्र प्रशिक्षणार्थींच्या हाती आलं आणि होत्याचं नव्हतं झालं असच म्हणावं लागेल. महाराष्ट्र सरकारी यंत्रणेतला सावळा गोंधळ असच काहीस चित्र आहे. विशेष म्हणजे नऊ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती पत्राऐवजी नियुक्ती रद्दीचं पत्र प्रशिक्षणार्थींच्या हाती आलं आणि अनेकांना धक्का बसला.
7 वर्षांपूर्वी -
शारदीय नवरात्रौत्सवात आज पहिली माळ, 'आजचा रंग निळा'
यंदाच्या नवरात्रौत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रींच्या ९ दिवस नऊ रंग आणि ९ रुप घेऊन दुर्गा माता अवतरणार आहे. आज घटस्थापनेचा दिवस असल्याने आजच पहिली माळ घालण्यात येते. त्यामुळे आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी आणि कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भक्तांची तुफान गर्दी दिसून येत आहे. या दोन्ही मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
दादर - धावती लोकल पकडताना नागपूरच्या तरुणाचा मृत्यू
दादर – धावती लोकल पकडताना नागपूरच्या तरुणाचा मृत्यू
7 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे संजय निरुपम यांच्याच पक्षाचा हात?
स्वतःला महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांचे कैवारी समजणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम सध्या गुजरातमधील उत्तर भारतीयांच्या हल्ल्यामागील प्रकरणावरून बॅकफूटवर गेले आहेत. कारण निरुपम यांच्या पक्षाचाच हात गुजरातमधील उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे असण्याची प्राथमिक माहिती गुजरात मधील प्रकरणावरून समोर येत आहे. त्यामुळे संजय निरुपम या विषयावर पडद्याआड गेले असून त्यांना राज्य काँग्रेसकडून सुद्धा तंबी देण्यात आल्याचे वृत्त आहे. कारण, आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील हल्ल्यामागे काँग्रेसचे स्थानिक आमदार अल्पेश ठाकोर असल्याचे एका व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्याचा वैचारिक दुष्काळ; राज ठाकरेंनी प्रसिद्ध केलं व्यंगचित्र
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर दौऱ्यावर होते. दरम्यान, विकासकामांसाठी लातूरकरांनी निधीची अजिबात चिंता करु नये, कारण पुढच्यावेळी सुद्धा मीच राज्याचा मुख्यमंत्री असेन, असे म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या त्याच विधानाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर अचूक निशाणा साधला आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाहीतर भाजपचे 'रामनाम सत्य' होईल: उद्धव ठाकरे
भारतीय जनता पक्षाने लवकरात लवकर अयोध्येतील राम मंदिर उभारावे नाहीतर हिंदू समाज त्यांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा थेट गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने हिंदू जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही शिवसेनेने मुखपत्रातून केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
तनुश्री दत्ता प्रकरणावर नाना पाटेकरांची २००८ मधील पत्रकार परिषद
तनुश्री दत्ता प्रकरणावर नाना पाटेकरांची २००८ मधील पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
भारत-बंद वेळी स्वतःचा मतदारसंघ ठप्प करू न शकणाऱ्या निरुपमांची महाराष्ट्र-ठप्प करण्याची भाषा
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात रान पेटलेल असताना, त्याला संधी म्हणून निरुपम पाहत असावेत म्हणून नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलण्याची संधी मिळताच संजय निरुपम यांनी महाराष्ट्रात प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या मतदार संघात उत्तर भारतीयांनी साडेतीन लाखापेक्षा अधिक मतांनी नाकारलेले संजय निरुपम सध्या स्वतःची मतपेटी वाढविण्यासाठी आणि उत्तर भारतीयांचा मसीहा असल्याचे सिद्ध करण्यासाठी संधी मिळताच केविलवाणे प्रयत्नं करत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या आढाव्याबाबत खासदारांनी मौन बाळगलं?
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला अनेक खासदारांनी हजेरी लावली खरी, परंतु त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्ष प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाचा आढावा घेतल्या शिवाय स्वबळ की एकत्रित निवडणुका याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आढावा बैठकीला येणारे खासदार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई - अनु कपूर यांची तनुश्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया
मुंबई – अनु कपूर यांची तनुश्रीच्या आरोपांवर प्रतिक्रिया
7 वर्षांपूर्वी -
स्वच्छ भारत - रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहात महिलांची आर्थिक लूट, पण आत पुरुष कसे?
स्वच्छ भारत – रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहात महिलांची आर्थिक लूट, पण आत पुरुष कसे?
7 वर्षांपूर्वी -
कायदेशीर नोटीसवर सुद्धा तनुश्रीला आक्षेप, एकूण भारतीय न्याय पद्धतीवरच तिचा आक्षेप सुरु?
भारतात तुम्ही छळ, अपमान तसेच अन्यायाविरोधात आवाज उठवल्यास तुम्हालाच नोटीस पाठवली जाते, असे तिने म्हटले आहे. तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपानंतर तिला नाना पाटेकर आणि ‘ हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. परंतु तनुश्रीने आता या नोटीसला कायदेशीर मार्गाने आणि सर्व आरोपांचे पुरावे सादर करण्याऐवजी भारतीय लोकतंत्र आणि कायदेशीर प्रक्रियेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
तनुश्रीच्या आडून दिल्लीश्वरांचा नाना पाटेकर आणि मनसे विरुद्ध सापळा? सविस्तर
झूम वहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर तनुश्रीने पुन्हा प्रसार माध्यमांसमोर नाना पाटेकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ज्या भाषेत प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून तरी तिचे बोलविते धनी दुसरेच कोणी असून सर्व काही सिनेमाप्रमाणे स्किप्टेड (ठरवून) असल्याची कुजबुज प्रसार माध्यमांमध्ये रंगली आहे. अगदी ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाचा वाद, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे असा कशाचा कशाला संदर्भहीन विषय तिच्या पत्रकार परिषदेत आला कसा अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपच्या हातून निसटलेल्या पाणी फाऊंडेशन तसेच ‘अक्षय कुमार’ राजकारणाशी त्याचा थेट संबंध जोडला जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन निवडणूकीत भाजप विजयी तर सेनेचा सुपडा साफ, मनसेचे यशवंत किल्लेदार सुद्धा विजयी
काल पार पडलेल्या डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने विजय मिळवला तर शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा सुपडा साफ झाला असताना मनसेचे यशवंत किल्लेदार सुद्धा विजयी होऊन पॅनेलवर गेले आहेत.
7 वर्षांपूर्वी