महत्वाच्या बातम्या
-
फोटो व्हायरल: मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशन निवडणुक, शिवसेना उमेदवारांकडून चांदीची नाणी वाटप?
मुंबई डिस्ट्रिक्ट हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांकडून मतदारांना चांदीची नाणी वाटप झाल्याचे आरोप केले जात आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलचे उमेदवार चांदीची नाणी वाटतानाचे फोटो व्हायरल झाले आहे. त्यानंतर स्व. रघुवीर सामंत सहकार पॅनेलने घडला प्रकार स्थानिक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला त्यानंतर रात्री उशिरा शिवप्रेरणा उमेदवारांविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
एल्फिन्स्टन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसमोर स्थानिक शिवसैनिकांचे सेल्फी-शो
एल्फिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी दुर्घटनेत अनेक मुंबईकरांनी त्यांचे प्राण गमावले होते. आज त्याच दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मुंबईकरांच्या आयुष्यातील ती एक न विसरता येणारी अत्यंत दुःखद घटना होती. आजही ती घटना आठवली तरी मृतांच्या नातेवाईकांचे डोळे पाणावतात. त्या घटनेला एक वर्ष झाल्याच्या कारणाने मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रभादेवी स्थानकाजवळ सकाळी शेकडो मुंबईकर तसेच मृतांचे नातेवाईक आले होते. त्यावेळी एकाबाजूला संबंधित ठिकाणी पोहोचताच मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले होते, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सेल्फी-शो जोरात सुरु असल्याचे पाहून मृतांचे नातेवाईक तो संताप डोळ्यात साठवत होते.
7 वर्षांपूर्वी -
जल प्रकल्पांसाठी निधी द्यायला तयार, पण गिरीष महाजन कामच करीत नाहीत: नितीन गडकरी
महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री रामेश्वर (म्हणजे महाजनांचे पीए) आहेत, तर त्याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून जाधव मॅडम (म्हणजे महाजनांच्या ओएसडी) काम पाहतात. तर जलसंपदा खाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळतात असं घणाघाती टीका आणि शेलक्या भाषेत केंद्रीय रस्ते विकास व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भाजपच्या नेते मंडळींसमोर फिरकी घेतली.
7 वर्षांपूर्वी -
ऑक्टोबर हिट’चा सप्टेंबर मध्येच तडाखा, मुंबईकर उष्णतेने हैराण
राज्यात सध्या पावसाने परतीचा रस्ता घेतल्यानंतर ऑक्टोबर हिट’चा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमानचा पारा ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. घराबाहेर पडताच मुंबईकर घामाघूम होतोय. सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवू लागला आहे.
7 वर्षांपूर्वी -
कामालाही सुरुवात नाही आणि समाज माध्यमांवर 'करून दाखवलं' प्रोमोशन सुसाट
कालच मुंबई महानगरपालिका बांधत असलेल्या कोस्टल रोडच्या तब्बल १२,००० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंगळवारी स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली. मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सीलिंकच्या टोकापर्यंतच्या कामाला सुरवात होणं अजून प्रलंबित आहे. या कोस्टल रोडचे नियोजित बांधकाम पूर्ण होण्यास ४ वर्षाचा कालावधी लागणार असला तरी मुंबईत कधी सुसाट व्हायची ती होईल, परंतु, समाज माध्यमांवर प्रोमोशन मात्र सुसाट सुरु झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
महापालिकेच्या आरोग्य खात्याचे गुजरातीमधून प्रशिक्षण
7 वर्षांपूर्वी -
महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य: राम कदमांची उमेदवारी भाजपच्या मुंबईतील सर्व उमेदवारांना भोवणार?
भाजपचे घाटकोपरचे वादग्रस्त आमदार राम कदम यांची विधानसभेची उमेदवारी भाजपच्या मुंबईतील सर्वच उमेदवारांना भोवण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. महिला मतदार हा मतदान प्रक्रियेत महत्वाचा घटक समजला जातो. अर्थकारणाच्या जोरावर त्यांनी मतदारसंघात निवडणूक प्रेरित रक्षाबंधांचे भावनिक कार्यक्रम जरी आयोजित केले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातील वास्तव वेगळं असल्याचं सिद्ध झालं आहे. मतदार संघातील ज्या मोफत आरोग्य आणि उपचाराच्या मदतीच ते मार्केटिंग करतात, त्या वास्तविक सरकारी योजनांतर्गत मिळणाऱ्या मोफत सेवा आहेत. परंतु, मतदारांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्या स्वतःच्या व्यक्तिगत नावावर खपवून मतपेटी मजबूत करण्याचे त्यांचे जुने प्रयत्न आहेत.
7 वर्षांपूर्वी -
लालबागच्या राजाचे विसर्जन २०१८
लालबागच्या राजाचे विसर्जन २०१८
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत पेट्रोलची नव्वदी पार, महागाईचा भडका अजून वाढणार
पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर आणि त्यामुळे वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सुद्धा वाढ झाली आहे. पेट्रोल ११ पैशांनी तर डिझेल ५ पैशांनी महागले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलनं नव्वदी पूर्ण केली आहे. आता मुंबईकरांना प्रति लिटर पेट्रोलसाठी तब्बल ९०.०८ रुपये मोजावे लागणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
आगामी निवडणुकीची व्युहरचना निश्चित करण्यासाठी भाजपची महत्वपूर्ण बैठक
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीची तयारी तसेच भाजप पक्ष संघटन बळकट करण्यासाठी भाजप तयारीला लागली आहे. त्या अनुषंगाने येत्या २६ आणि २७ सप्टेंबर रोजी मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबरला दादर येथील वसंत शारदा येथे होणा-या बैठकीला भाजपाचे सर्व नेते, प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असं मुंबई भाजपने स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज लाडक्या गणपती बाप्पाच वाजत गाजत विसर्जन, सर्व सरकारी यंत्रणा सज्ज
मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली डीजे तसेच डॉल्बीवर बंदी आणि पुण्यासारख्या शहरात त्यामुळे मिरवणुकीवर अनेक गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकला आहे. त्यापाठोपाठ नगर मध्ये सुद्धा तेच अस्त्र अनेक मंडळांनी उपसलं आहे. पोलीस प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी ते पाऊल गणेश मंडळांनी उचललं आहे. वास्तविक बंदीचा निर्णय न्यायालयाने घेतल्याने, त्यात पोलिसांना दोष कितपत द्यावा हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई : रस्त्यावरील खाद्यपदार्थ - मुंबई वाल्यांच आरोग्य गटारात ?
मुंबई : रस्त्यावरील खाद्यपदार्थ – मुंबई वाल्यांचा आरोग्य गटारात ?
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या कामगार युनियन सदस्यांना नोकरीवरून कमी करताच राज ठाकरेंकडे मदतीसाठी
इंटरनॅशनल ट्रॅव्हल हाऊस ह्या कंत्राटदाराने आय.टी. सी. मराठा पंचतारांकित हॉटेल अंधेरी आणि आय.टी. सी. ग्रँड सेन्ट्रल परेल मधील त्यांच्या एकूण २०० कामगारांना कमी करण्याच्या घाट घातला होता. भाजप संबंधित कामगार युनियनचे सदस्य असलेले हे सर्व २०० कामगार १ सप्टेंबर २०१८ पासून नोकरीवरून कमी केल्यामुळे घरी बसून होते.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ व्हायरल : धर्म, देश आणि तिरंगा
व्हिडिओ व्हायरल : धर्म, देश आणि तिरंगा
7 वर्षांपूर्वी -
मुंबई : जेट एअरवेज - प्रवाशांच्या नाकातून रक्त
जेट एअरवेजच्या मुंबई-जयपुर विमानातील हवेचा दाब नियंत्रित करणारी यंत्रणा सुरु न केल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता
7 वर्षांपूर्वी -
पुन्हा मार्मिक 'राजअस्त्र' : संघ, संस्कार, लोकशाही आणि वर्गाबाहेरील २ विद्यार्थी : सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकामागून एक मार्मिक अस्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा दाखल देत, मोदी आणि अमित शहांच्या एकाधिकारशाहीवर मार्मिक टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डीजेचा आवाज बंदच राहणार, राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात ठाम
डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयात ठाम राहिल्याने तसेच पर्यावरणाला हानिकारक अशा आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे आणि डॉल्बीला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे अशक्यच असल्याचे ठाम मत न्यायालयात मांडल्याने गणेशोत्सवात देखील डीजेचा आवाज बंदच राहणार हे नक्की झालं आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना कर्जमाफीमुळे राज्यात वित्तीय तूट वाढली : भाजप आमदार भातखळकर
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वित्त आयोगाला दोषी ठरवत, राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळेच वित्तीय तूट वाढल्याचा दावा केला आहे. तसेच राज्य सरकारची पाठराखण करताना भाजपच्या काळातच राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
7 वर्षांपूर्वी -
मुंबई - काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
मुंबई – काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण
7 वर्षांपूर्वी