महत्वाच्या बातम्या
-
इंटरनेटसोबत रेशन आणि जीवनावश्यक वस्तू सुद्धा मोफत द्या: उद्धव ठाकरे
जिओ कंपनीच्या केबल क्षेत्रातील प्रवेशाने केबल मालक धास्तावले असून त्यांनी मदतीसाठी राजकारण्यांकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लवकरच स्थानिक केबल मालकांना बाजूला सारून थेट ग्राहकांना स्वस्तात सेवा देण्याची ‘जिओ’ने योजना आखली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंपुढे Jio नरमली, आम्ही केबल चालकांना एकत्र घेऊन काम करायला तयार असल्याची हमी
काही दिवसांपूर्वी अनेक केबल संघटनांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन जिओ केबलमुळे होणाऱ्या नुकसानाची तसेच अडचणींचा पाढा राज ठाकरे यांच्यासमोर वाचला होता. जिओमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुराड येणार असल्याचे राज ठाकरेंच्या निदर्शनास आणले होते. त्यानंतर मनसेने थेट जिओ कंपनी सोबत पत्रव्यवहार करून त्यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटीलसाहेब, खड्ड्यांबद्दल आदित्य ठाकरेंना १००० रुपयांचं बक्षीस पाठवा: धनंजय मुंडे
राज्याचे महसूल तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी ‘खड्डे दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा’ अशी घोषणा केली होती. त्याचाच संदर्भ घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून एक खोचक ट्विट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान गाडीचे टायर फुटले
सध्या युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या आलिशान गाडीला मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ खड्ड्यांमुळे फटका बसला असून त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. गुरुवारी मध्य रात्री ही घटना घडल्याचे समजत.
7 वर्षांपूर्वी -
काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या पेंग्विनच्या यकृतात बिघाड झाल्याने दुर्दैवी मृत्य
मुंबईतील राणीच्या बागेत दक्षिण कोरियावरून आणलेल्या पेंग्वीनपैकी एका जोड्याला ९ दिवसांपूर्वी बाळ झाले होते. भायखळ्याच्या वीरमाता जीजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात म्हणजे राणीच्या बागेत बऱ्याच प्रतीक्षेनंतर पाळणा हलला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तसेच मुंबईकरांसाठी सुद्धा आनंदाचं बातमी आली होती.
7 वर्षांपूर्वी -
सेनेच्या १२ मंत्र्यांनी काहीच कामं केली नाही, त्यांचा राज्याला काहीच फायदा नाही: सेना आमदार बाळू धानोरकर
शिवसेनेचे वरोरा भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी काल नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची अक्षरशः धिंडवडे काढले आहेत आणि पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत: खासदार कीर्तीकर
पंतप्रधान मोदींना सभागृहात सेनेच्या खासदारांनी नमस्कार केल्यास ते पाहतसुद्धा नाहीत असा थेट आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोदींच नाव घेऊन केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते हे शिवसेनेचे नेते सुद्धा उघड बोलू लागले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
दाभोलकरांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येपूर्वीच आघाडी सरकारने ‘सनातन’वर बंदीचा प्रस्ताव केंद्राला दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन
ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होत. मागील अनेक दिवसांपासून ते आजाराने त्रस्त होते.
7 वर्षांपूर्वी -
कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन'साठी महाराष्ट्राचा 'ज्युनिअर मिल्खा सिंग' साईश्वर गुंटूक'ची निवड
तब्बल २१ किलोमीटरच्या कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’साठी महाराष्ट्रातील सोलापूरचा सात वर्षीय ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ म्हणजे साईश्वर गुंटूक’ची निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा उणे ६ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानात आणि अतिशय दुर्गम भागात पार पडणार आहे.
7 वर्षांपूर्वी -
पप्पू पुन्हा नापास झाला, मनसेकडून आमदार राम कदमां'च्या अभिनंदनाच पोश्टर
काही दिवसांपूर्वी प्रजा फाउंडेशन’कडून लोकप्रनिधींच्या कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आलं होत, तसेच लोकप्रनिधींच ते रिपोर्ट कार्ड सामान्य जनतेसाठी खुलं करण्यात आलं होतं. त्यात भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा सुद्धा क्रमांक आला होता. परंतु तो क्रमांक खालून पहिला होता. त्याचाच धागा पकडून मनसेने घाटकोपर पश्चिमेला आमदार राम कदम यांच अभिनंदन करणारा पोश्टर लावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
केरळच्या पूरग्रस्तांसाठी मनसेच्या अनेक शाखांमधून लोकसहभागातून मदत रवाना
रळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
माझा १९५० मधील 'सेल्फ क्लीक्ड' फोटो, ज्याला आज 'सेल्फी' म्हणून ओळखतात: लता दीदी
नमस्कार! मी माझा १९५० मधील ‘सेल्फ क्लीक्ड’ फोटो, ज्याला आज ‘सेल्फी’ म्हणून ओळखतात असं ट्विट करत लता दीदींनी त्यांचा ७० वर्ष जुना फोटो शेअर करत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुजरातमध्ये ‘गोध्रा कांड’ घडले तेसुद्धा रामभक्तांचे बळी गेल्यामुळेच: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या विषयाचा संदर्भ धरून नरेंद्र मोदी तसेच भाजपवर सामना मुखपत्रातून निशाणा साधला आहे. आजच्या सामना संपादकीयमधून मोदी तसेच भाजपचा खरपूस समाचार घेताना विविध दाखले दिले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन
काल दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल आहे. त्यांना थोडा त्रास होऊ लागल्याने दिल्लीतील चाणक्यपूरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात ओंकारेश्वर पूलापासून ‘अंनिस’ची ‘जवाब दो’ रॅली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज तब्बल ५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु इतका काळ उलटून सुद्धा हत्येमागील सूत्रधार मोकाटच असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘अंनिस’ तर्फे ‘जवाब दो’ रॅली काढण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मनसे महिला आघाडीच्या विधानसभा निहाय जोरदार बैठका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष विस्तार आणि विधानसभा निहाय बैठका मोठयाप्रमाणावर सुरु असून, त्याला महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ती मनसेसाठी आगामी निवडणुकीच्या निमित्ताने जमेची बाजू असल्याचे लक्षात येते. सध्या मनसे सामान्य जनतेच्या संबंधित प्रश्नांना हात घालून लोकांपर्यंत पोहोचत आहेत, तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणावर पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित केले जात आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई गणेश मंडळांसाठी अमित ठाकरें व महाराष्ट्र सैनिक मैदानात; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबईतील आणि गिरगावातील गणेश मंडळांसाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आखाड्यात उतरले असून, त्यांनी गणेश मंडळांच्या व्यथा आणि प्रश्न घेऊन थेट मुख्यमंत्री निवास गाठलं आहे. अमित ठाकरे यांच्या बरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवास्थानी भेट घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळया झाडणारा सचिन अंधुरेला सीबीआयकडून अटक
तब्बल पाच वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळया झाडणारा सचिन अंधुरेला केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभाग सीबीआयने शनिवारी पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात हे पहिलं यश मानलं जात आहे.
7 वर्षांपूर्वी -
जे संकट केरळात आलं तेच संकट उद्या महाराष्ट्रावरही येऊ शकत? डॉ. माधव गाडगीळ
मागील काही दिवसांपासून केरळ मध्ये तुफान बरसणाऱ्या पावसाने संपूर्ण राज्यभर हाहाकार माजवला आहे. अगदी लष्कराची मदत सुद्धा अपुरी पडताना दिसत आहे. संपूर्ण देशातून मदतीचा ओघ सुरु असली तरी देखील मदत कार्यात अनेक अडथळे येत आहेत. परंतु केरळमध्ये झालेला जोरदार पाऊस नैसर्गिक असला, तरी यामुळे आलेला पूर मानव निर्मित आहे असं ठाम मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी