महत्वाच्या बातम्या
-
मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चेला जाणाऱ्या प्रतिनिधींचा लातूरमध्ये मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत निषेध
आज मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजाचे काही समन्वयक आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा झाली. परंतु त्या विरुद्ध आज लातूर मध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबईमधील बैठकीचा तीव्र निषेध करण्यात आला आणि मुंबईतील ती चर्चा आम्हाला मान्य नाही अस सांगण्यात आलं.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही: नारायण राणे
मराठा समाजाच्या आरक्षनांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमत्री आणि मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्याची बैठक होणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या मध्यस्थीमुळे ही चर्चा होणार आहे. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही. असे ते म्हणाले. घटना दुरुस्ती प्रक्रियेला वेळ लागेल. यामुळे मागास अनुकल नसेल तर या प्रस्तावाला मंत्रीमंडळात मंजुरी घ्यावी, असेही राणे म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचं राज ठाकरेंच्या अजान'च्या वक्तव्यावर परखड मत, वक्तव्याचा विपर्यास!
काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुण्यात पदाधिकारी मेळाव्या आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना जैन, राम मंदिर तसेच मुस्लिम समजासंबंधित रोखठोक मत व्यक्त केलं आहे. परंतु त्यात त्यांनी अजान’च्या संबंधित वक्तव्य केलं, तेच केवळ प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध केलं गेलं आणि मूळ विषयाला बगल देऊन राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं परखड मत मनसेचे इरफान शेख यांनी व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंकजांना एका तासासाठी मुख्यमंत्री करावं: शिवसेना
जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर आली असती तर क्षणाचा सुद्धा विलंब न लावता मी मराठा आरक्षणाच्या फाईलवर सही केली असती या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या विधानाचा सर्वच थरातून समाचार घेतला आहे. त्यात आता शिवसेनेसुद्धा संधी न घालवता सामना वृत्तपत्रातून पंकजा मुंडे आणि अप्रत्यक्ष रित्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
आज मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेच्या सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावर तोडगा याच मूळ चर्चेचा विषय असणार आहे असं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
१४ ऑगस्टला मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पण राज्य मागास आयोगाचा अहवाल?
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आक्रमक आंदोलनाने जोर धरला आहे. त्यामुळे सरकार सुद्धा खडबडून जाग झालं आहे आणि सर्व संबंधित विषयांना वेग आल्याचे चित्र आहे. सरकारी पातळीवर या हालचाली सुरु असल्या तरी १४ ऑगस्टला मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु तत्पूर्वी राज्य मागास आयोगाचा अहवाल येण्यास आणखी ४ महिन्यांच्या कालावधी लागणार समोर येत आहे.
7 वर्षांपूर्वी -
मूळ आरक्षणाचा विषय सरकारच्या हातात राहिलेला नाही, शिवसेना आमदार व जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे
सध्या राज्यभर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधींकडून निरनिराळी वक्तव्य समोर येत आहेत. त्यात आता शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सुद्धा राज्यातील स्थितीवर आणि मराठा आरक्षणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंची मराठी तरुणांना हात जोडून विनंती, आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी जीव गमावू नका, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आक्रमक आंदोलनाला अनुसरून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या आंदोलनादरम्यान तरुणानांचे नाहक बळी जात असल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे आणि मराठी तरुणांना भावनिक आवाहन सुद्धा केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
महाभारतात 'संजय'चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा असतो: भाजपचा राऊतांना टोला
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या मुख्यमंत्री बदलाच्या वक्तव्यावर भाजपने संजय राऊत यांच्यावर ही झोंबणारी टीका केली आहे. भाजपच्या राज्य आयटी सेल ने ट्विट करून संजय राऊतांना टोला लगावला आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचं भाकीत खरं ठरतंय? विकास फसल्याने सेना-भाजपला 'राम मंदिरा'चा आधार? आपलं मत नोंदवा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उत्तर प्रदेशातील अयोध्या भेटी मागे हिंदुत्वाचा मुद्दा आणि भाजपला शह अशी कारणं पुढे केली जात असली तरी वास्तव हे दुसरंच असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे. राज्य सरकारमध्ये तसेच केंद्रात १२-१३ मंत्रिपद उपभोगणाऱ्या शिवसेनेची नेहमीच एक बोंब राहिली आहे की, आमच्या मंत्र्यांची तसेच आमदारांची कामं मार्गी लावली जात नाहीत. परंतु नुकतंच सामना’ला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे नेते सत्तेचा अनुभव घेण्यासाठी सत्तेत सामील असल्याचं उत्तर दिल आहे. वास्तविक गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या मंत्र्यांचा कार्यकाळ हा विकासशुन्य असाच म्हणावा लागेल.
7 वर्षांपूर्वी -
हिंसा नको, सरकार चर्चेला तयार: मुख्यमंत्री फडणवीस
मराठा समाजाने हिंसा वा आंदोलनाचा मार्ग न अवलंबता समाजाच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र सरकारशी चर्चा करावी. मराठा समाजाशी चर्चा करण्यास आम्ही सदैव तयार आहोत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंची मुलाखत एक फुसका बार, भाजप विरोध म्हणजे ‘मंगळसूत्र वापरणार नाही, पण कुंकू ठेवणार’
उद्धव ठाकरे यांच्या सामना मधील टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मॅरेथॉन मुलाखतीत सर्वच प्रश्नांना त्यांच्या पक्षीय दृष्टीकोनातून उत्तर दिली आहेत, त्याला सर्वच थरातून उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
‘ओरिजिनल’ व ‘रिजनल’शी लोकांना काहीही देणेघेणे नाही, जो लोकांच्या समस्या सोडवतो तो लोकांचा पक्ष
उद्धव ठाकरे यांच्या सामना मधील टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या मॅरेथॉन मुलाखतीत सर्वच प्रश्नांना त्यांच्या पक्षीय दृष्टीकोनातून उत्तर दिली आहेत, त्याला सर्वच थरातून उत्तर येण्यास सुरुवात झाली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या
औरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट, घाईत निर्णय घेता येणार नाही: उद्योग मंत्री सुभाष देसाई
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठा आरक्षणाचा निर्णय कोर्टातही टिकणे गरजेचे आहे असं सांगत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण; उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक
मुंबई दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्च्याच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली असता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्य कारभाराची अप्रेंटिसशिप? राज्यातील १२ कोटी लोकं सुद्धा सेनेच्या सत्ता कारभाराचा अनुभव घेत आहेत?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना सत्तेत का सहभागी झाली यावर प्रतिक्रया दिली आहे. त्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की,’महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून भाजपने आपलं राज्य स्थापन केलं असतं तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला” असं उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
‘माझा पक्ष रिजनल असला, तरी ओरिजनल आहे’; उद्धव ठाकरेंची मनसे अध्यक्षांवर अप्रत्यक्ष टीका
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेली उद्धव ठाकरेंची आज दुसरी मॅरेथॉन मुलाखत प्रसीद्ध झाली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक फोडण्याच्या आरोपावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल. मागील वर्षी मुंबई महानगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले.
7 वर्षांपूर्वी -
सत्तेबाहेर राहण्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला: उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना सत्तेत का सहभागी झाली यावर प्रतिक्रया दिली आहे. तसेच त्यांनी भाजपवर सुद्धा निशाणा साधला आहे. भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेना मागील ४ वर्षांपासून सोडलेली नाही तरी शिवसेना सत्तेत सामील का झाली आहे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाचा ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद, तर केस व नोटीस पाठवायचीच असेल तर पहिली केस माझ्यावर टाका: नितेश राणे
समस्त मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी म्हणजे क्रांतिदिनी महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. त्यासंबंधित मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी लातूर येथे पार पडली असता हा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी