महत्वाच्या बातम्या
-
'सेनेला मत म्हणजे भाजपला मत', समाज माध्यमांवर जोर धरला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालघरमध्ये घेतलेली प्रचंड जाहीर सभा आणि त्याला स्थानिकांचा मिळालेला प्रतिसाद हा पालघरमध्ये मनसेची ताकद दाखविण्यासाठी पुरेसा होता. मनसेने जर त्यांचा उमेदवार पालघर पोटनिवडणुकीत दिला असता तर शिवसेनेला पराभवाचं खापर फोडण्यासाठी आयतच कारण मिळालं असत. तेच पालघर पोटनिवडणुकीत न मिळाल्याने सर्व खापर निवडणूक आयोगावर फोडण्यात आलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन
भाजपचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. के जे सोमय्या रुग्णालयात पहाटे 4.32 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र HSC २०१८: बारावीच्या निकालात मुलींची बाजी
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी २०१८ चा निकाल एकूण ८८.४१ टक्के लागला आहे. एकूण १४ लाख १६ हजार ९८६ विद्यार्थ्यांपैकी १२ लाख ५२ हजार ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त, मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस असून त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पेट्रोलवर ४ रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. मुंबईतल्या एकूण ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पालघर निवडणूक, एका रात्रीत ६.७२% मतं वाढली? शिवसेना
पालघर पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर १२ तासात तब्बल ८२,००० मतं वाढली कशी असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांकडे व्यक्त केला आहे. एकुण मतांमध्ये पालघर पोटनिवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत ६.७२ टक्के इतकी मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप आज शिवसेनेच्या सामना मुखपत्रातुन करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा १ जूनला पुन्हा एल्गार, आंदोलनाची हाक
शेतकऱ्यांचा ज्वलंत मागण्यांसाठी राज्याभर पुन्हां एल्गार, येत्या १ जूनपासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक संपाला १ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी पुन्हा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना
भाजपची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेसोबत युती असून ही युती राहिली पाहिजे असं केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मत व्यक्त केलं. आमच्यातील युतीच म्हणजे “तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना” अशी परिस्थिती येते असं सुद्धा नितीन गडकरी म्हणाले.
7 वर्षांपूर्वी -
आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही
शिवसेनेतील संजय राऊतांसारख्या व्यक्तीला भाजपने कधीही महत्त्व दिलेले नाही. त्यांना केवळ प्रसार माध्यमांनी मोठे केलं. पण आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याकडे ढुंकूनही पाहत नाही अशी टीका मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळाला ४ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी भाजपासंदर्भात केलेल्या टीकेविषयी विचारण्यात आले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिल.
7 वर्षांपूर्वी -
राज व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, म्हणून शिवसैनिकाचं आंदोलन
शाम मारोती गायकवाड या शिवसैनिक कार्यकर्त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं म्हणून चक्क दादर टीटीच्या पुलावर चढून घोषणा दिल्या. या दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि निवडणूक लढवावी, अशी भावनिक मागणी या तरुणाकडून करण्यात आली आहे. तासा भराने जेंव्हा त्याला अग्निक्षमण दलाच्या जवानांनी खाली उतरवले तेंव्हा त्याने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीची मागणी करणारी पत्रकेही त्या ठिकाणी वाटली आहेत.
7 वर्षांपूर्वी -
देशपातळीवर भाजपविरोधी आघाडीत शिवसेना नाही: सिंघवी
देशातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण होत असताना मोदीसरकार म्हणजे लोकांना केवळ आश्वासनांची खैरात करत ‘मेरा भाषण ही मेरा शासन’ असा थेट संदेश नरेंद्र मोदींनी देशाला दिला आहे. मोदीसरकारची ४ वर्ष म्हणजे केवळ जुमलेबाजी करतच स्वतःचे कौतुक करण्यावर भर असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. त्यांनी आज मुंबई कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
7 वर्षांपूर्वी -
सेना 'एनडीए'त राहायचं की नाही हा निर्णय घेण्यास स्वतंत्र: अमित शहा
शिवसेना ‘एनडीए’त राहायचं की नाही तो निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीला सामोर जाण्यास तयार आहे असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी लखनऊ मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
7 वर्षांपूर्वी -
रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं
राज्यभरात रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं असून सामान्य माणसाचं महागाईने कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. कारण दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे तब्बल १५० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वच दैनंदिन वस्तूंचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. या दरवाढीमुळे रोजचा भाजीपाला-फळे सगळंच महागलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये भुजबळांची मदत एनसीपीला की सेनेला ?
आज विधानपरिषदेचे निकाल जाहीर झाले असून, त्यात नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीने सर्व शक्ती पणाला लावली असताना आणि भाजपने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला असताना सुद्धा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे हे तब्बल २०० मतांनी विजयी ठरले आहेत. परंतु आता स्वतः नरेंद्र दराडे यांनी विजयामागे एनसीपीचे जेष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मदत लाभली असा दावा केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
एनसीपीचे आमदार नरेंद्र पाटील सुद्धा भाजपच्या गळाला ?
आज निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. परंतु लवकरच राष्ट्रवादीचे अजून एक विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. आज निरंजन डावखरे यांना भाजप कार्यालयापर्यंत सोडण्यासाठी चक्क एनसीपीचे आमदार तसेच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आले होते.
7 वर्षांपूर्वी -
घशात हात घालून सत्ता बाहेर काढली: राज ठाकरे
कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या तोंडाशी आलेला घास काँग्रेसने हिरावून घेतल्याने त्यावर राज ठाकरे यांनी एक मार्मिक व्यंगचित्र प्रसिध्द केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे व्यंगचित्र रेखाटून भाजपवर फटकारे लगावले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नीरव मोदी, भूपेश जैनच्या घोटाळ्यावेळी सोमैय्या कुठे होते ?
देशभरात आणि विशेष करून महाराष्ट्रात एखादा आर्थिक गैरव्यवहारासंबंधित एखादा विषय रंगला की भाजप खासदार किरीट सोमैया हे कागदी पुरावे घेऊन सर्व प्रसार माध्यमांवर झळकताना दिसायचे. आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांना मी धडा शिकवणार अशी गर्जनाच ते प्रसार माध्यमांवर कारणात दिसायचे. परंतु देशभरात नीरव मोदी, भूपेश जैन, मेहुल चोक्सी ते विजय माल्या यांनी घोटाळ्यांचे विक्रम मोडीत काढले त्यानंतर हेच किरीट सोमैय्या कुठे ही दिसले नाही.
7 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या सरकारमुळे गिरगांवकर रस्त्यावर: मेट्रो-रेल्वे प्रकल्प
मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून त्याला सुरवातीला गिरगावकरांचे सहकार्य लाभले होते. कारण या मार्गातील केवळ २ इमारती पाडाव्या लागतील असं आधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं होत. परंतु भाजप-सेनेच्या सरकारने अक्षरशः त्या विषयावर यू-टर्न घेतल्याचे चित्र समोर आले आहे.
7 वर्षांपूर्वी -
मराठी फेरीवाल्याच्या नोटा फाडणारे सोमय्या 'नॉट रिचेबल'
मुलुंडचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जनसंपर्क अभियानादरम्यान एका मराठी फेरीवाल्याशी झालेल्या वादात चिडून त्यांनी त्या मराठी फेरीवाल्याला धक्काबुक्की केली तसेच त्याच्या हातातील ५० रुपयांच्या नोटा फाडून टाकल्याला आणि त्याच्याच तोंडावर फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
गुजरातमधील शेतकऱ्यांचा सुद्धा बुलेट-ट्रेनला विरोध
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारकडून जमिन अधिग्रहण सुरु होताच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबरच गुजरात राज्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा जमिन अधिग्रहणाला तीव्र विरोध दर्शविल्याने नरेन्द्र मोदींचा हा महत्वकांक्षी प्रकल्प वादात अडकण्याची चिन्हं आहेत.
7 वर्षांपूर्वी -
राज्यात नोकर भरती, पण सरकारची 'अट' लागू ?
राज्य सरकारच्या सरकारी नोकर भरतीचा आकडा बघून तरुण भारावले खरे, पण त्यासाठी फडणवीस सरकारची ‘अट’ समजल्यास तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कारण तुमची निवड झाली तरी तुम्हाला तब्बल ५ वर्ष शिक्षण सेवकाच्या धर्तीवर केवळ मानधनावर काम करावं लागेल. त्यानंतर सुद्धा कायम स्वरूपाची खात्री नसेल, कारण त्यानंतर सुद्धा तुमची पात्रता व कामगिरी बघूनच ती नोकरी नियमित केली जाईल.
7 वर्षांपूर्वी