महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | मनपा को-ऑप बँक लि. मुंबई 05 जागांसाठी भरती
म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेड मुंबई भरती 2021. म्युनिसिपल को-ऑप बँक लिमिटेड, मुंबई ने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 05 व्यवस्थापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार MCOB मुंबई भरती 2021 साठी 30 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करत मारहाण
काही दिवसांपूर्वी पुण्यात महिला सरपंचाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पुण्यातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात ही घटना घडली होती. घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला होता . त्यानंतर भाजपा उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरुन संताप व्यक्त करताना म्हटलं होतं की, हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाचा संबंध काय? | राणेंना उंचीवरून काय बोलणार? - मनिषा कायंदे
गणेश मूर्तीच्या उंचीचा आणि कोरोनाच संबंध काय? असा सवाल करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खोचक शब्दात उत्तर दिलं आहे. राणेंना उंचीवरून काय बोलणार?, असा टोला मनिषा कायंदे यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग प्रकरणी दिल्ली हायकोर्टाची सीबीआयला नोटीस | 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश
सीबीआयची कागदपत्रे लीक केल्याप्रकरणी लाच दिल्याचा आरोप असलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती योगेश खन्ना यांच्या खंडपीठाने 27 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळ उद्घाटन | मुख्यमंत्री आले तर स्वागत करू - नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री आले तर स्वागत करू असा पवित्र घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान केल्यानंतर केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी नरमाईचा सूर आळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर स्वागत करू, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी अवघ्या तीनच दिवसात पलटी खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली | त्यांनीच चोरली-डाका मारला - पटोलेंचा पवारांना टोला
आजच्या काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील एखाद्या जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार सगळे हिरवेगार शिवार माझे होते, असे सांगतो, तसे आजच्या काँग्रेस झाले आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्याच वेळी काँग्रेसच्या नेतृत्वाने वस्तुस्थिती स्वीकारली तर विरोधकांना एकत्र येण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी सूचनाही त्यांनी करून घेतली आहे. शरद पवार एका ‘वेबपोर्टल’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
राणेंच्या विविध रिसॉर्टमधील कर्जाच्या आरोपांवर सोमैय्या अधिक माहिती देऊ शकतात | राऊतांच्या टोला
कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी निलम राणे आणि चिरंजीव नितेश राणे यांना लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणेंवर खोचक टीका केली आहे. केंद्राच्या गृहखात्याच्या सूचनेवरूनच राज्याच्या गृहखात्याने ही कारवाई केली आहे. हवं तर नितेश राणेंनी दिल्लीत जाऊन माहिती घ्यावी, असा खोचक टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.
4 वर्षांपूर्वी -
लालबागचा राजा | कोणत्याही प्रकारचं मुखदर्शन घेता येणार नाही | पण ऑनलाईन दर्शन सुरू - मुंबई पोलीस
भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुंबईच्या ‘लालबागचा राजा’च्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेला विलंब झाल्याची माहिती आता मिळत आहे. मंडळाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटीलही या ठिकाणी दाखल झाले आहेत. मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत साधारण तासभर चाललेल्या या बैठकीनंतर अखेर विश्वास नांगरे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आरक्षित जागांवर ओबीसी उमेदवार देऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका शक्य | ठाकरे-पवार यांच्यात चर्चा
ओबीसींची जातनिहाय आकडेवारी केंद्राकडून मिळणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाकडून इतक्यात जमा करणे शक्य नाही, त्यामुळे ओबीसी उमेदवारांसाठी राखीव जागांवर ओबीसीच उमेदवार देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका वेळेत घेणे हिताचे राहील, अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गुरुवारी झाल्याचे समजते आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची गुरुवारी भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
DHFL ६५ कोटींचं कर्ज प्रकरण | नीलम राणे व नितेश राणेंविरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लूक आउट नोटीस जारी करण्यात आली. कंपन्यांकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | SAMEER मुंबईत 42 पदांची भरती | शिक्षण १० वी पास
समीर मुंबई भर्ती 2021. सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी आणि संशोधन, आयआयटी मुंबईने 42 आयटीआय अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार समीर भरती 2021 साठी 15 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात एकाच दिवसात दिल्या 14 लाखांपेक्षा जास्त लसी | 1 कोटी 79 लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा
संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी किंवा त्या लाटेची दाहकता कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लसीकरण मोहिमेला गती दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत बुधवारी (दि.८सप्टेंबर) रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १४ लाख ३९ हजार ८०९ नागरिकांना लस देण्यात आली आहे. राज्यात या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ६ कोटी ५५ लाखांवर गेली आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक १ कोटी ७९ लाख नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देऊन महाराष्ट्राने देशात विक्रम केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील कीर्तनकारांना बाप्पा पावला | कोरोना काळात राज्य सरकार महिन्याला 5 हजार रुपये मानधन देणार
उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील कीर्तनकारांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, यांना 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतील दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी तूफान गर्दी
मुंबईत मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव एका दिवसावर आला आहे. त्यामुळे भाविकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली आहे. मार्केटमधील गर्दी पाहिल्यास कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | मोरेश्वर महाविद्यालय जालनात 59 पदांची भरती
मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भारती. मोरेश्वर आर्स्ट, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, भोकरदन जि. जालना यांनी 59 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी मोरेश्वर महाविद्यालय भरतीकडे अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Job Alert | संगमनेर नगरपालिका महाविद्यालयात 48 जागा | थेट मुलाखत
संगमनेर नगरपालिका विज्ञान महाविद्यालय भरती 2021. संगमनेर नगरपालिका कला, डी.जे. मालपाणी कॉमर्स आणि बी.एन. सारडा सायन्स कॉलेजने लहान भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 48 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत 13 सप्टेंबर 2021 रोजी एसएनएससी भरती 2021 रोजी घेतली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेना आ. प्रताप सरनाईकांशी संबंधित NSEL प्रकरणी ईडीला हायकोर्टाचा दणका
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांशी संबंधित एनएसईएल प्रकरणी ईडीला मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. या प्रकरणातील आरोपी योगेश देशमुख यांचा जामीन रद्द करण्यासाठी तपासयंत्रणेनं दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे. विकासक योगेश देशमुख हे शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे निकटवर्तीय समजले जातात. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | पेंग्विनच्या देखभालीसाठी काढले जाणारे टेंडर आयुक्तांनी केले रद्द
राणीबागेतील पेंग्विनसाठी काढले जाणारे १५ कोटींचे टेंडर पालिका प्रशासनाकडून मागे घेण्यात आले आहे. पेंग्विनची जास्तीत जास्त देखभाल महापालिका प्रशासनाच्या अखत्यारितच करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांवर आरोप केल्याने भाजपकडून परमबीरसिंग यांना जीवदान | म्हणून NIA च्या चार्जशीटमध्ये ते आरोपी नाहीत - राष्ट्रवादी
अँटिलिया प्रकरणात एनआयएने सादर केलेल्या चार्जशीटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत परामबीर सिंहला वाचवलं जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावर असताना सिंह हे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारची दिशाभूल करत होते. सिंह यांना वाचवण्यासाठी भाजपने गृहमंत्र्यांवर आरोप केले. मुख्य आरोपीला वाचवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे परमबीर सिंह हा या सर्व घटनेचा मास्टरमाईंड आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचंच - देवेंद्र फडणवीस
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हा मराठी माणसाचा पराभव असल्याचे वक्तव्य केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. बेळगावचा निकाल म्हणजे मराठी माणसाचा विजय असून हा शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव असल्याचे म्हटल आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पत्रकरांसोबत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी