महत्वाच्या बातम्या
-
भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय? | येत्या काही दिवसात राज ठाकरेंची भेट घेईन - सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयांसंदर्भातील राज ठाकरेंच्या त्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांकडे पोहोचल्या | भाजप काय भूमिका घेणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | अशोक चव्हाणांचं सर्वपक्षीय खासदारांना पत्र | 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्यासाठी मोहीम
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाड आपत्ती | पवारांच्या सूचनेनंतर आव्हाडांची घोषणा | पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली
महाड तालुक्यातील अख्खं तळीये गाव उद्ध्वस्त झालं. गावातील 32 घरं दरडीखाली गाडली गेली. मातीच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून अनेक मृतदेह असल्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावची परिस्थिती पाहिली. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शाळांचं 15% शुल्क कमी करा | कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करा | सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
आर्थिक गणित बिघडलेल्या महाराष्ट्रातील पालकांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय. महाराष्ट्र सरकारने राजस्थानप्रमाणे 15 टक्के शुल्क कमी करावी. तसेच कोरोना कालावधीत केलेली फी वाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्याबाबत राज्य सरकारला निर्देश दिलेत. यावर 3 आठवड्यात आदेश देण्याचंही न्यायालयाने सांगितलंय. त्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण करणाऱ्या शाळा व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना देखील दणका बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता मोबाइल आचारसंहिता | काय आहेत कार्यालयीन वेळेतील नियम
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी केलेल्या मार्गदर्शक सूचना वादग्रस्त ठरल्या होत्या. आता त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह राज्य सरकार पाडण्याच्या प्लानचा भाग होते? | वाझेही संपर्कात होता | धक्कादायक जबाब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गुरुवारी मुंबईत खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी ठाण्यातही त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. धमकवल्याच्या प्रकरणासह अनेक कलमांन्वये त्यांच्या विरोधात परमबीर आणि अन्य वरिष्ठ पोलिसांवर ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र परमबीर सिंग यांच्यामार्फत मार्च मध्ये म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी योजना आखली गेली होती अशी माहिती एक जवाबाबत समोर आली आहे. त्याच अधिवेशनात १० मार्च २०२१ ला विरोधी पक्ष नेत्यांनी तशीच भूमिका घेत पावलं उचलली होती का अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. विशेष म्हणजे ज्याची माहिती राज्यातील आणि देशातील तपासयंत्रांना देखील नव्हती ती विरोधी पक्षनेत्याकडे कोणी पोहोचवली याची सूचक माहिती समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रसार माध्यमांची गळचेपी | आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? - शिवसेना
दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आले दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. कोरोना मृत्यूच्या आकडयात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’ चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असेल तर ते भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले आहे. तसंच आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया देत, केंद्र सरकारवर घणाघात केला.
4 वर्षांपूर्वी -
Raigad landslide | ४४ मृतदेह काढले बाहेर | अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखालीच? | बचावकार्य सुरूच
आधी महाराष्ट्रावर आभाळ कोसळले अन् आता दरडी. आठवडाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात हाहाकार उडाला. रायगड, रत्नागिरी व साताऱ्यासह अनेक जिल्ह्यांत दरडी कोसळल्या, भूस्खलन झाले तसेच इतर दुर्घटना घडल्या. गेल्या ४८ तासांत सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. दुर्गम भाग व पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तरुणांनो... स्वतःच्या CSC सेंटरसाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | या आहेत स्टेप्स
भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर च्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून दिल्या जातात.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन शिल्पा शेट्टीच्या घरी | पुराव्यांचा शोध घरापर्यंत
पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांची एक टीम राज कुंद्रा यांना घेऊन दाखल झाली आहे. पोलिसांची टीम चौकशी व राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी शिल्पाच्या घरी दाखल झाली आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अश्लील फिल्म प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर सध्याचा काळ आव्हानांचा सामना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. शिल्पा म्हणाली की, जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असून या प्रकरणाचाही ती धैर्याने सामना करेल.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात - शिक्षणमंत्री
मागील दोन वर्ष कोरोनाचा फटका देश तसेच राज्यातील शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊन आणि सरकारच्या कडक निर्बंधांमुळे बहुतांश भागात शाळा वर्षभरापासून बंद आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला असला तरी त्याला देखील अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात यंदाही २५ टक्के कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली | पुढचे 2, 3 दिवस कोकणात व मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा अंदाज
एकाबाजूला राज्यात मान्सूनच्या मुसळधार पावसानं हाहाकार मजला आहे. मुंबई वेधशाळेनं आज दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात पुढचे 2, 3 दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, सोमवार पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही पूरग्रस्त भागात अनेक वेळा पाण्यात बसून निर्णय करायचो | तुम्हीही डायरेक्ट फिल्डवर उतरा- चंद्रकांत पाटील
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो. बोटीत बसूनच निर्णय घेऊन प्रशासनाला कामाला लावायचो. आताही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फिल्डवर उतरलं पाहिजे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात पावसाचं थैमान | लोकांच्या मदतीसाठी राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना पत्र
राज्यात पावसाने थैमान घातलंय. आज महाराष्ट्राला हादरविणाऱ्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून 32 लोकांचा लोकांचा मृत्यू झालाय. साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 लोकांचा मृत्यू झालाय. तर तिकडे चिपळूणमध्येही 17 घरांवर दरड कोसळून जवळपास 20 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. याच विषयाला अनुसरून आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांना पुढे यावं, तातडीने जशी जमेल तशी मदत तरावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुसळधार पाऊस त्यात ढगफुटी | अतिवृष्टी हा शब्दही कमी पडेल इतका पाऊस होतोय | नागरिकांनी यंत्रणेला सहकार्य करावे
महाराष्ट्रात सध्या ज्याप्रकारे पाऊस पडत आहे ती परिस्थिती पाहता आपल्याला अनेक गोष्टींची व्याख्याच बदलावी लागेल. अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत, नद्या फुटून वाहत आहेत. अतिवृष्टी (Rain) हा शब्दही थिटा पडेल इतका पाऊस होत आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
4 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त भागात लसीकरण वाढवणार | फडणवीसांना सोबत घेऊन केंद्राकडे अधिक लसीची मागणी करणार
महाराष्ट्र ४-५ दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत,आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांना घेऊन भेटायला जाणार आहोत”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत इमारत कोसळून 3 ठार | तर रायगडमध्ये दरड कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नागपूरच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी मुंबईला लागून असलेल्या गोवंडीमध्ये इमारत कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबईतील राजवाडी व शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रायगडच्या काळई गावात भूस्खलनामुळे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून इतर लोक अजूनही अडकलेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्निल लोणकर कुटुंबीयांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची भाजपकडून परतफेड | धनादेश सुपूर्द
एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांवर असलेल्या 19 लाख 96 हजार 965 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
पालकांनो | तुमच्या मुलाला मिळणारं शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट तुमच्या खात्यात
शेतकरी बंधुंनो शालेय पोषण आहार अनुदान रक्कम थेट पालकांच्या खात्यात जमा होणार आहे. तुमचा मुलगा शाळेत जात असेल आणि तो इयत्ता पहिली ते आठवीमध्ये असेल तर हा खास लेख तुमच्यासाठी आहे कारण आता इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पोषण आहार न देता आल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पोषण आहाराच्या बदल्यात पैसे जमा करण्यात येणार असून राष्ट्रीयकृत बँकेत खते उघडण्याची अट शिथिल करण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी