महत्वाच्या बातम्या
-
कुणालाही भेटलो नाही, अफवा पसरवण्याचे कारखाने दिवाळखोरीत निघतील - संजय राऊत
भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांना भेटल्याच्या वृत्ताचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी इन्कार केला आहे. मी काल कुणालाही भेटलो नाही. या सर्व अफवा आहेत. अशा अफवांनी राजकारण हलत नाही. अफवा पसरवण्याचे कारखाने सुरू आहेत. ते दिवाळखोरीत निघतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | पीक विमा योजना 2021 ऑनलाईन अर्ज | शेवटची तारीख जवळ - संपूर्ण प्रक्रिया
महाराष्ट्रात यंदा वेळे अगोदर मान्सून दाखल झाला. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांच्या दृष्टीनं तयारी सुरु केली. सन 2021 च्या खरिप हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागनं शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Yojana | शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अनुदान योजना अर्ज - संपूर्ण प्रक्रिया
गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे, जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.
4 वर्षांपूर्वी -
नोकरीच्या शोधात आहात? मग आधी सरकारच्या 'महाजॉब्स' पोर्टलवर करा नोंदणी - वाचा सविस्तर
डिग्री, कौशल्य शिक्षण असून देखील नोकरी नसलेल्या तरुणांची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. सरकारी नोकरीच्या अनेक संधी कधी येऊन जातात हे अनेकदा तरुणांना कळत नाही. सध्या करोनाच्या पार्श्वभुमीवर तरुणांच्या नोकऱ्या गेल्या असून हजारो तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने बेरोजगारांसाठी ‘महाजॉब्स’ पोर्टल (Mahajobs Portal) चालविण्यात येते. यामध्ये नोकऱ्यांसदर्भात अपडेट येत असतात. यातील तुमच्या शिक्षण आणि अनुभवानुसार असलेली नोकरी तुम्ही निवडू शकता.
4 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र स्वतःकडे घेण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल? - सविस्तर वृत्त
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीच्या कारवाईचे फास आवळले जात असताना, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील ईडीची ‘फाइल’ तयार होत आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवार यांना क्लीन चिट देणारे तत्कालीन पोलिस महासंचालक परमबीरसिंग हे वाझे-देशमुख प्रकरणानंतर भाजपसोबत गेल्याने, महाविकास आघाडी सरकारविरोधातील घडामोडींना आणखी वेग आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधान परिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश राज्यपालांना देणार नाही – सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्रात अनेक मुद्द्यांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा. गेले अनेक महिने नावांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे देऊनही त्यावर शिक्कामोर्तब झाला नाही. यावरुन आता सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप केला आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेवरील नियुक्त्यांचे आदेश आम्ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देणार नाही, असे सांगत सुप्रीम कोर्टाने यासंदर्भातील याचिका शुक्रवारी फेटाळून लावली. राज्यपालांना सल्ला देणे हे आमचे काम नाही, असे कोर्टाने याचिकादाराला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख दिल्लीला रवाना | ईडीच्या नोटिशीविषयी कायदेशीर सल्ला घेण्याची शक्यता
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
शेती | वारस नोंद कशी करायची? | वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? - वाचा ऑनलाईन स्टेप्स
शेतजमीन ज्याच्या नावावर आहे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळू शकतात. पण त्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद करणं आवश्यक असतं. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 3 महिन्यांच्या आत वारस नोंदीसाठी अर्ज करावा लागतो. पण यासाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीचा वापर करून घरबसल्या वारस नोंदीसाठी अर्ज करू शकता. हा अर्ज कसा करायचा, सरकारची ई-हक्क प्रणाली काय आहे, याचीच माहिती आपण पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र HSC निकाल | फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतरही मेटें'कडून फडणवीसांचा जयजयकार | म्हणाले फडणवीसांना विनंती करा आणि दिल्लीला...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 102व्या घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. राज्य सरकारने विधीमंडळात एक ठराव करावा. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना घटनादुरुस्ती करण्याची विनंती करावी, असं सांगतानाच केंद्र सरकार जर ऐकत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सोबत न्यावं, असं आवाहन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज केलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना दिलासा | पिक कर्ज वसुलीस दिली 31 जुलैपर्यंत मुदत वाढ
शेतकऱ्यांनी मागील वर्षी राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, व्यापारी बँक यांच्याकडून घेतलेल्या पीककर्ज परतफेडीसाठी शासनाने शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात दिलेल्या मुदतवाढीच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै पर्यंत दर शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड वेळेत केली तर शेतकऱ्यांना व्याजात सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. राज्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच व्यापारी बँकांमार्फत पीक कर्जाचा पुरवठा केला जातो.
4 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ नेत्यावर पातळी सोडून टीका आणि वक्तव्यात महिलांचाही अनादर | कृपया लक्ष घाला - रोहित पवारांची तक्रार
भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. याचे पडसाद संपूण महाराष्ट्रात आगी सरखे पसरत आहेत. त्यांच्या टीकेनंतर बुधवारी संध्याकाळी त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आली होती. या हल्ल्यावरून पडळकर यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री - अजित पवार
साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या अनुषंगाने ईडीने अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात असलेल्या ‘जरंडेश्वर शुगर्स’ कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली असून जरंडेश्वर कारखाना संचालक मंडळाने विकलेला नसून उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विक्री करण्यात आल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | कुक्कुटपालन पालन योजना सुरु झाली | असा करा अर्ज | शासनाच्या वतीने आवाहन
कुक्कुटपालन पालन योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करत असतांना शेतकरी बांधवाना शेतीमध्ये नैसर्गिक संकटाचे अनेक धोके पत्करावे लागतात. शेती व्यवसायामध्ये केवळ शेतीवर अवलंबून राहिल्यास अधिक तोटा होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतीला काहीतरी जोड धंदा असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधुंनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि शेती पूरक व्यवसाय करू इच्छित असाल तर शासकीय अनुदानावर आधारित कुक्कुटपालन पालन योजनेचा लाभ घ्या.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस शिपाई आता निवृत्तीच्या वेळी PSI होणार | गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील पोलिस शिपाई आणि कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने सुखद घोषणा करण्यात आली आहे. आता राज्यभरातील पोलिस शिपाई आपल्या निवृत्तीपर्यंत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदापर्यंत मजल मारतील. पोलिस दलात शिपाई या पदावर रुजू होणाऱ्या प्रत्येकाची आता पोलिस उप-निरीक्षक पदावर निवृत्ती होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात यासंदर्भातील घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, महागाईविरोधात राष्ट्रवादीचं राज्यव्यापी आंदोलन | ममतांनीही तेच केलं होतं
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशातील सामान्य जनता महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रस्त आहे. विशेष म्हणजे मोदी सरकार यावर कोणत्याही उपाययोजना देखील करताना दिसत नसल्याने सामान्यांचं जगणं कठीण होऊ बसलं आहे. कारण आता सरकारी इंधन कंपन्यांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरच्या दरात २५.५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी ८३४.५० रुपयांना मिळेल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-शहा, फडणवीस भेटीचा राज्य सरकार पाडण्याशी संबंध नाही | आम्ही 2024'च्या तयारीला लागलोय - रावसाहेब दानवे
देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अजित पवारांविरोधात ठराव मांडण्यापूर्वी मोदी-शहा आणि फडणवीसांची भेट
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची 20 मिनिटे चर्चा झाली.
4 वर्षांपूर्वी -
महा बुलेट ट्रेन | नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी सर्वेक्षण सुरू | शेतात जाऊन पाहणी | समृद्धी महामार्गालगतचा मार्ग
बहुचर्चित मुंबई- नाशिक- औरंगाबाद- नागपूर या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी प्राथमिक सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षणाचे काम देण्यात आलेल्या ‘तुला’ या एजन्सीचे प्रतिनिधी संभाव्य भूसंपादन हाेणाऱ्या शेतावर जाऊन तिथे सध्या नेमके काय आहे याची पाहणी करत आहेत. याआधी या मार्गासाठी विमानातून लिडार सर्वेक्षण झालेले आहे. समृद्धी महामार्गालगतच बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे.
4 वर्षांपूर्वी -
सीबीआय कारवाईच्या पुड्या सोडून ED'मार्गे अजित पवार यांचं कुटुंब चौकशीच्या रडारवर? | राजकीय ब्लॅकमेलिंगची शंका
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात मनी लाँडरिंगविरोधी कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जप्त केला. हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र घाडगे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची चौकशी केली जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी