महत्वाच्या बातम्या
-
पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा | कोणत्या मुद्यावर चर्चा?
राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोडी घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन | शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
२४ तासात चौकशीसाठी हजर राहा | नाहीतर घरी येऊन चौकशी - ईडीचं उत्तर
ईडीच्या कचाट्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावून आज (२९जून) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र देखील लिहिलं होत दरम्यान, या पत्राला ईडीने उत्तर देत २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ED'चं ठरलंय? देशमुखांना चौकशीनंतर..? | गृहमंत्री वळसे पाटील, आव्हाड आणि मुंबई पोलीस आयुक्त वर्षावर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर | सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट तर घरगुती बाप्पा 2 फुटांचा - वाचा सविस्तर
संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणाऱ्या गणपतीच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी 4 फूट तर घरगुती गणेशमूर्तीसाठी 2 फुटांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मात्र, गणेश मूर्तीकार आणि मंडळांनी यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे? | जाणून घ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य’ योजनेचे लाभ कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना खरंतर २ जुलै २०१२ रोजीच महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केली होती. आता (२०१७ मध्ये) त्याच योजनेचं नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना हे ठेवण्यात आलं आहे. (इथे आपल्याला राज-कारणात पडायचं नसून, उपयोगी अशा योजनेची माहिती घ्यायची आहे).
4 वर्षांपूर्वी -
तिसऱ्या लाटेपूर्वी मुंबई महापालिका सज्ज | 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. येत्या काही दिवसात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसात 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीस गैरहजर राहण्यासाठी अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | ईसीआयआरची प्रत देण्याची विनंती
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात आपले वाढते वय आणि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट मिळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान 'जेम्स'चं निधन | घरातील सदस्यप्रमाणेच अखेरचा निरोप दिला
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. राज ठाकरेंकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत समुद्राचं पाणी गोड होणार | इस्त्रायलसोबत सामंजस्य करार | इस्त्रायलकडून मराठीत ट्विट
इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला आता वेग मिळाला आहे. मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. हा प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल असून अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
जि.प., पं.स. पोटनिवडणुका पुढे ढकलण्यासाठी याचिका | राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात
राज्यातील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त जागांसाठी १९ जुलै रोजी होणाऱ्या पोटनिवडणुका ६ महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी रिट याचिका राज्य सरकारकडून सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोविडची दुसरी लाट तसेच साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकांना ६ महिने स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत केल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांना सांगितले. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ४४ पंचायत समित्यांच्या निवडणुका जानेवारी २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. यातील मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधीन राहून घेतल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीचा विकास जोमात | कलानगर जंक्शन उड्डाणपुलाचे उद्घाटन | प्रवाशांचा प्रवास वेळ वाचणार
कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सी लिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स | आज चौकशीसाठी राहणार हजर
ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार आहे. 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
नाबार्ड दक्षता पथकाच्या चौकशीत मुंबै बँकतील बोगस कर्ज प्रकरणं समोर | दरेकरांच्या अडचणीत वाढ
मुंबै बँकमध्ये बोगस कर्ज प्रकरण समोर आल्याची चर्चा आहे. नाबार्डच्या आदेशावरून बॅंकेच्या दक्षता पथकाच्या चौकशीत समोर बोगस कर्जाचं प्रकरण समोर आल्याचं बोललं जातं आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व राजकारण असून सत्ताधाऱ्यांकडून द्वेषापोटी हे सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पंप योजना महाराष्ट्र 2021 साठी ऑनलाईन अर्ज सुरु | करा अर्ज
सोलर पंप योजना अर्थात सौर चलित पंप योजना संबधी अधिक माहिती जाणून घेवूयात. सोलर पंप योजनेसाठी अर्थात सौर उर्जा चलीत पंपासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या वेबसाईटवर हा अर्ज करावा लागणार आहे त्यासंबधी अगदी तपशीलवारपणे माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सोलर पंप योजना संदर्भात या लेखामधील माहिती अतिशय महत्वाची आहे. या ठिकाणी सांगितलेल्या अर्ज पद्धतीनुसार तुम्ही तुमचा अर्ज करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांच्या राजकीय गाठीभेठी | मुख्यमंत्र्यांशी तासभर चर्चा केल्यानंतर पवारांच्या भेटीला
महाविकास आघाडी सरकारमधील तिनही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याचं बोललं जात आहे. कारण, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट होत आहे. शनिवारीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्यांदा राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सत्ता दिली तर ओबीसींना आरक्षण मिळवून देऊ म्हणतात | नाही दिली तर फडणवीस मदत करणार नाहीत असे वाटते
ओबीसी आरक्षण पूर्ववत करुन न दिल्या राजकीय संन्यास घेईन अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाविकास आघाडीचे नेते हल्लाबोल करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातून संन्यास घेऊ नये, ते विरोधी पक्षनेते म्हणून उत्तम काम करत आहेत, त्यांनी 5 वर्षे सरकारला सूचना कराव्यात, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | डिजिटल 7/12 तुमच्या मोबाईलवर असा डाउनलोड करा - नक्की वाचा
आजच्या या लेखामध्ये डिजिटल सात बारा कसा डाउनलोड करावा या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वात अगोदर डिजिटल सात बारा म्हणजे काय हे समजावून घेवूयात. मित्रांनो तुम्ही जर महाभूमी अभिलेख या वेबसाईटवर गेलात तर या ठिकाणी तुम्ही दोन प्रकारचे सात बारा व ८ अ उतारे बघू शकतात. पहिला आहे विना स्वाक्षरीत 7/12 व 8 अ . दुसरा आहे digitally signed 7/12 या दोन्ही मधला फरक या ठिकाणी बघुयात.
4 वर्षांपूर्वी -
अटकेच्या शक्यतेने परमबीर सिंह २ महिन्यांच्या सुट्टीवर? | ५ मे पासून पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांचा आरोप करून खळबळ माजवणारे माजी मुंबई पोलीस आयुक्त व राज्य गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग हे तब्बल 2 महिन्यांच्या सुट्टीवर गेले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला परमबीर सिंह हे चंदिगड येथे असल्याची सूत्रांची माहिती मिळत आहे. तेथील एका स्थानिक रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या प्रमाणपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार परमबीर यांची तब्येत ठीक नसल्याचे समजते. त्यामुळे परमबीर हे 5 मे पासून सुट्टीवर गेले असल्याचे समोर येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नव्हते | लोकांना फसवून सत्ता मिळवणं हाच भाजपचा उद्देश - बाळासाहेब थोरात
विदर्भ स्वंतत्र राज्य होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा २००४ साली देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री नसताना केली होती. आता त्यांचे लग्न होऊन कित्येक वर्षे उलटली, ते पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र स्वतंत्र विदर्भाबाबत त्यांनी चक्कार शब्दसुद्धा काढला नाही.
4 वर्षांपूर्वी