महत्वाच्या बातम्या
-
झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणूक | निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार?
OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तडीस जात नाही तोवर राज्यात एकही निवडणूक होऊ देणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनीही घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने नमती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
सातारा | अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी आणि मिल्किंग मशीनच वाटप | करा अर्ज
जिल्हा परिषद योजना 2021 अंतर्गत जिल्हा परिषद सातारा पशुसंवर्धन विभागाकडून ७५ टक्के अनुदानावर १० शेळ्या व एक बोकड वाटप. ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप ( दोन गाई म्हशी) व मिल्किंग मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी शेवट दिनांकाच्या आत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा.
4 वर्षांपूर्वी -
जिल्हा परिषद निवडणुकांवरून भाजपमध्ये गोंधळ? | फडणवीस OBC उमेदवार देणार तर पंकजा न्यायालयात जाणार
पावसाळी अधिवेशनाचा कालावधी, विधानसभा अध्यक्ष निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचाच सरकारचा डाव असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजप फक्त ओबीसी उमेदवारच देईल, मग विजय किंवा पराजय जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री टाटा कॅन्सर सेंटरला दुसरीकडे 100 रुम देणार | आव्हाडांना आनंद
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आशा सेविकांना मानधनवाढ आणि कोविड भत्ता मिळणार | आरोग्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे
महाराष्ट्रातील आशा वर्कर्सचा संप अखेर मिटला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुन्हा आशा संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आशांना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याने संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.
4 वर्षांपूर्वी -
स्वप्ना पाटकर यांना बनावट PHD डिग्री प्रकरणी अटक झालेली | त्यांच्यावर फसवणूक, 420, 467, 468 या गंभीर गुन्ह्यांची नोंद
फिल्म निर्मात्या आणि डॉक्टर स्वप्ना पाटकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर विविध आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी पाटकर यांनी न्यायालयात याचिका दाखल करताच, बोगस डिग्रीच्या खोट्या प्रकरणात पाटकर यांना अटक केल्याचा दावा विरोधी पक्षकारांकडून करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्त यांना याप्रकरणी तातडीने लक्ष घालत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील गुरुवार(24 जून) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली | महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत - एकनाथ शिंदे
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत असल्याचा आरोप केला होता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. दरम्यान खासदार संभाजीराजे, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि सर्व मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. संभाजीराजेंनी कोल्हापुरात विविध मागण्यांसह मुक मोर्चा काढला होता. यानंतर राज्य सरकारने लवकरच आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करु असे आश्वासन दिले होते. आज राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकारमुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात | ठाण्यात शुक्रवारी ओबीसींचा आक्रोश मोर्चा
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यापूर्वी केंद्राकडे ओबीसींची आकडेवारी मागितली होती. पण सरकारने ती दिली नाही. त्यामुळेच ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे ठाणे-पालघर प्रमुख सुभाष देवरे यांनी केला आहे. केंद्र सरकारने ओबीसींची आकडेवारी द्यावी आणि आरक्षणाचा मार्ग सुकर व्हावा या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या वतीने शुक्रवार 25 जून रोजी ठाण्यात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं देखील देवरे यांनी जाहीर केलं.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, पण पडेल त्या दिवशी पर्याय देऊ - फडणवीस
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | MAHATRANSCO मध्ये तब्बल 8500 जागांसाठी होणार भरती
कोरोनामुळे सरकारी नोकरीच्या जागाही निघत नसल्यानं तरुणाईमध्ये नाराजीचं वातावरण आहे. मात्र आता MSEB च्या महापारेषण विभागात लवकरच तब्बल 8500 जागांसाठी पदभरती होणार आहे. यामध्ये येणारे सर्व अडथळे दूर झाले आहेत आणि पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात राज्य सरकारचं सहकार्य नाही | CBI चा हायकोर्टात दावा
भ्रष्टाचार प्रकरणी करण्यात येणारा तपास केवळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही. त्यात सचिन वाझे, परमवीर सिंह व सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकार आवश्यक ती कागदपत्रे देण्यास नकार देत आहे, असे सीबीआयने काल (२१ जून) उच्च न्यायालयाला सांगितले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नोंदवलेल्या एफआयआरमधील काही परिच्छेद वगळण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
विरोधकांची नव्हे, ती बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची | काँग्रेस-शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही - संजय राऊत
पवारांचे दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
दोन दिवसांपूर्वी बावनकुळेंचं शिवसेनेला संपवण्यावर भाष्य | आज सेना-भाजप एकत्र येण्यावर पुड्या
मागील काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय. सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय.
4 वर्षांपूर्वी -
मराठा मूक आंदोलन महिनाभरासाठी स्थगित | सरकारलाही १ महिन्याची डेडलाईन - संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. परंतु, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असं जाहीर करतानाच या महिन्याभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना | कसं मिळवाल व्यावसायिक कर्ज ? - वाचा सविस्तर
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात निरनिराळ्या क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारांनी CMEGP या योजनेची सुरवात गेली.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं - राज ठाकरे
नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दी बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर तसंच इतरांनी भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार दिल्लीकडे रवाना | भाजप विरोधातील आघाडीच्या राजकारणाला वेग येण्याची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचेसर्वेसेवा शरद पवार अखेर मोठ्या ब्रेकनंतर राजधानी दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणारे शरद पवार रविवारी दिल्लीसाठी रवाना झाले असून २३ जूनपर्यंत राजधानीमध्येच असणार असं वृत्त आहे. त्यामुळे दिल्लीत भारतीय जनता पक्षविरोधी रणनीतीला जोर येणार असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत | शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेक गट - संजय राऊत
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रातील मुद्द्यावर बोट ठेवत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुटण्याआधीच भाजपशी जुळवून घ्या | आ. सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र
ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपशी जुळवून घेण्यासाठी पत्रातून साकडे घातले आहे. सरनाईक यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात सत्तांतराची चर्चा सुरू झाली आहे, तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरनाईक यांच्या पत्रातील मुद्द्यावर बोट ठेवत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी