महत्वाच्या बातम्या
-
नारायण राणे म्हणाले तिथे राडाबिडा काही झाला नाही | नितेश राणे म्हणाले, नाईकांना शिवप्रसाद दिला?
सिंधुदुर्गातल्या कुडाळ पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पेट्रोल पंपावर वैभव नाईक थांबला कुठे, तो पळाला. तिथे राडाबिडा काही झाला नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं
4 वर्षांपूर्वी -
भाजपला रामराम, सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतले | गोंदियाचे माजी आमदार दिलीप बंन्सोड सुद्धा काँग्रेसमध्ये
भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार सुनील देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये असताना पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे आमची तिकीटं कापली जायची, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकांना अजून ३ वर्ष शिल्लक | त्याआधीच युती, आघाडी, स्वबळाची भाषा करणं शहाणपणा नाही
मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळ आणि आघाडीची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फटकारले आहे. निवडणुकांना अजून अवकाश आहे. त्या आगोदरच काहीही भाष्य करण्यात शहाणपणा नाही, असा टोला लगावतानाच 2024’मध्ये मुख्यमंत्री कुणाचा असेल याचा फॉर्म्युलाही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्नाटकात भाजपचं सरकार असल्याने फडणवीसांनी ते प्रयत्नच केले नाहीत | पण जयंतरावांनी केले
पावसाळ्यात पुराच्या पाण्याने पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरला नेहमीच अलमट्टी आणि हिप्परगा धरणातील पाण्याचा त्रास सहन करावा लागतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना याच भागात महापुरामुळे अनेक कुटुंब बेघर झाली होती, तर अनेकांनी प्राण गमावले होते. मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार असल्याने फडणवीसांनी नेहमीच गुळगुळीत भूमिका घेतली होती. तसेच कडक भूमिका किंवा संवाद साधून प्रश्न निकाली काढण्यासाठी कधीच प्रयत्न केले नव्हेते. कायदेशीर बाब पुढे करून केवळ बचावात्मक भुमीका मांडल्याचे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. मात्र सध्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र थेट कर्नाटकात जाऊन संवाद सुरु केल्याने प्रश्न निकाली लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
हिंदुत्वासाठी आजही शिवसेनाच समोर येते | हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही विषय शिवसेनेसाठी महत्त्वाचे - संजय राऊत
शिवसेनेचा आज ५५वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने पक्षाच्या नेतेमंडळींकडून आणि इतर राजकीय पक्षांकडून देखील शिवसेनेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या गेल्या ५५ वर्षांच्या प्रवासाविषयी भूमिका मांडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा नंतर OBC'वरही भाजपचं अजब राजकारण | केंद्राकडे इम्पिरिकल डेटा उपलब्ध असताना राज्याकडे मागणी
मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन राजकारण तापलेले असल्याचे पहायला मिळत होते. आता यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आरक्षणासंदर्भात राज्यातील ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात भाजपची बैठक झाली. या बैठकीनंतर येत्या 26 जून रोजी ओबीसी आरक्षणासाठी राज्यात एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार
केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. कारण, केंद्राकडे असलेला हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल”, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट म्हटले आहे. तसेच हा मिळावा म्हणून आम्ही केंद्राला दोन पत्रे लिहिली पण डेटा मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो मुलांची काळजी घ्या | ब्लॅक फंगसमुळे ३ मुलांवर शस्त्रक्रिया | डोळे काढावे लागले
आपल्यासाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी आहे. गुरुवारी देशभरात 62,375 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर 1590 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा मागील 61 दिवसातील सर्वात कमी आहे. दरम्यान, 88,421 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर | आता शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येणार
एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक असतो. मात्र आता विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या दाखला म्हणजे TC (transfer certificate ) /LC (leaving certificate) शिवाय प्रवेश दिला जाणार आहे. नुकतंच राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा निर्णय जारी केला आहे. यानुसार, विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मतारखेचा दाखल्यानुसार प्रवेश दिला जाणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
२-४ आठवड्यातही तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही | डॉ. संजय ओक यांचा इशारा
महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Updates | मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस | पुणे, सातारा, रत्नागिरीत रेड ॲलर्ट
राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर केली आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | दलित, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तत्काळ घरगुती वीज जोडणी योजना
महावितरणकडून १४ एप्रिल ते ६ डिसेंबर या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थींना या योजनेमधून घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीज बिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये, मैदानात यावं ते दोन पायांवर जाणार नाहीत - आ. नितेश राणे
भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | तुम्ही नर्सिंग कोर्स केलाय? | मुंबई महानगरपालिकेत १ हजार जागांसाठी भरती
मुंबई महागरपालिका रिक्रूटमेंट २०२१. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि १००० स्टाफ नर्स पदासाठी अर्ज मागविला आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एमसीजीएम भरती 2021 वर 26 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे अर्ज पाठवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे येत्या २ महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका | मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सतर्कतेचे निर्देश
महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास येत्या एक-दोन महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार. ही शंका राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोरोना टास्क फोर्सने व्यक्त केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक झाली. यात कोरोनाचा “डेल्टा प्लस” म्हणजेच AY.1 व्हेरिएंटमुळे राज्यात तिसरी लाट येण्याचा धोका मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला धक्का | माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख भाजपाला रामराम ठोकण्याच्या तयारीत
राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाला धक्के बसत आहेत. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभव, सांगली व जळगाव महापालिकेची सत्ता हातातून निसटल्यामुळं भारतीय जनता पक्षामध्ये अस्वस्थता आहे. पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हं नसल्यानं निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये आलेले अनेक नेते व आमदार अस्वस्थ आहेत. त्यातूनच आता घरवापसी सुरू झाली आहे. सुनील देशमुख यांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल - संजय राऊत
एकाबाजूला शिवसेनेच्या मुखपत्रातून राष्ट्रवादीबरोबर युती करणार असल्याचं उघड उघड जाहीर केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या युतीचा पुनरुच्चार केला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास महाराष्ट्रात चमत्कार होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू, शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? म्हणून शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला
भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणप्रश्नी आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी काल मोर्चा काढल्यानंतर खासदार संभाजी छत्रपती आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत पाच मागण्या आणि मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. मात्र, भेट सकारात्मक न झाल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही, असा सूचक इशाराच संभाजी छत्रपती यांनी बैठकीपूर्वी दिला आहे. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची NIA कडून चौकशी | अटकेची शक्यता
अँटीलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मर्डर केसमध्ये बुधवारी नॅशनल इंवेस्टिगेशन एजंसी (NIA) ने माजी ACP एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना ताब्यात घेतले आहे. शर्माच्या घरी बुधवारी सकाळी छापेमारी करत NIA ने चौकशी सुरू केली आहे. एनआयए प्रदीप शर्मा आणि निलंबित API सचिन वझे आणि माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांच्यातील संबंधांचा तपास करत आहे.
4 वर्षांपूर्वी