महत्वाच्या बातम्या
-
त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज राष्ट्रवादीची परिस्थिती आणखी चांगली असती - जयंत पाटील
आज (१० जून) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खंत व्यक्त केली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाचा प्रवास उलगडताना महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीत आपल्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचा आज स्थापना दिन | पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना का आणि कशी केली होती ?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४’च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय आशीर्वाद? | फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोना लस घेतली | RTI मध्ये सत्य उघड
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे समाज माध्यमांवर प्रश्नांचा जोरदार मारा करण्यात आला होता. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचं नातं असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगत कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी, वेळेवर निर्णय न घेतल्याने अनेकांचे मृत्यू - मुंबई हायकोर्ट
कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं आहे अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारलं आहे. सर्जिकल स्ट्राइक कऱण्याची गरज असताना तुम्ही सीमारेषेवर जवानांना एकत्र आणत आहात, परंतु, शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करत नाही. सर्जिकल स्ट्राइक करण्याची तुमची भूमिका असली पाहिजे असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. लवकर निर्णय घेतले असते तर अनेक जीव वाचवता आले असते असं देखील कोर्टाने नमूद केलं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिकेत 5 वर्षात 1 हजार कोटींचा घोटाळा – आशिष शेलार
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी BMC निवडणुक | उत्तर भारतीय मतदारांचा फटका त्यात शिवसेनासोबत नाही | भाजपची महत्वाची बैठक
संपूर्ण देशात अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर महत्वाची जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांची दिल्ली भेट राजकारणासाठी नव्हती, ज्यांना राजकारण दिसते ते धन्य होत - शिवसेना
सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सांगितले. राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यांत फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. ही नाती शिवसेनेने नेहमीच सांभाळली आहेत. नरेंद्र मोदी – उद्धव ठाकरे भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती तशीच व्यक्तिगत नात्याचीही होती. त्यामुळे दिल्लीतील या भेटीवर यापुढे बराच काळ चर्चेचा धुरळा उडत राहील.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमधील भेट राजकीय नव्हती | फडणवीसांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं - अशोक चव्हाण
पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाला आणि काही संघटनांना दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | RCFL मुंबईत 50 पदांची भरती | ऑनलाईन अर्ज करा
आरसीएफएल भरती २०२१. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई यांनी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून ऑपरेटर पदांसाठी अर्ज ऑनलाईन मागविले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आरसीएफएल भारती 2021 साठी 07 ते 21 जून 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
ठाकरे-मोदी भेट | कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकणारच - आ. अमोल मिटकरी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा मोदींना भेटणार आहेत. या भेटीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Lockdown झटका | मुंबईतलं पंचतारांकित 'हयात रिजन्सी' हॉटेल बंद | कर्मचाऱ्यांच्या पगारसाठी पैसाच नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. ७ जून पासून राज्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. ज्यात मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईतील दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे हयात रिजन्सी या फाईव्ह स्टार हॉटेलने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो काळजी घ्या | हवामान विभागाकडून शहरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना जमलं नाही ते आदित्य ठाकरेंनी करून दाखवलं | मुंबई आरे'तील ८१२ एकर जागा वन विभागाकडे | जंगल कायम राहणार
मुंबईसारख्या महानगरात आता मध्यभागी जंगल उभं राहणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरे ची ८१२ एकरची जागा जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार २८६ हेक्टर अधिसुचित जागेचा ताबा आरे दुग्ध वसाहतीने वन विभागाला प्रत्यक्ष सोपवला आहे. त्यामुळे आरे मधली ही जमिन आता अधिकृतरित्या Indian Forest Act च्या सुरक्षेत आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान-मुख्यमंत्री भेट | काय असतील मराठा आरक्षण प्रश्नी मुद्दे? - सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज म्हणजे ८ जूनला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ मुंबईहून विमानाने दिल्लीकडे रवाना होतील. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे शिष्टमंडळ महाराष्ट्र सदन येथे पोहचले. त्यानंतर सकाळी ११ वाजता पंतप्रधानांसोबत लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानी हे शिष्टमंडळ मोदींची भेठ घेईल.
4 वर्षांपूर्वी -
मोदी-उद्धव ठाकरे भेटीपूर्वी काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’वर शरद पवारांसोबत चर्चा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजे ८ जूनला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.मराठा आरक्षण,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण,जीएसटी परतावा,लसीकरण अशा अनेक मुद्यांवर ही भेट आहे.या भेटीआधीचं उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. शरद पवारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.मराठा आरक्षणाबाबत ठाकरे आणि मोदींची भेट होतेय या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट महत्त्वाची आहे. याशिवाय या भेटीमध्ये महाराष्ट्रातील महामंडळावरील नियुक्त्यांबाबतही चर्चा होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा | सर्व यंत्रणा सज्ज
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेने सज्ज आणि सतर्क राहून काम करावे, परस्परांशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अर्थतज्ज्ञ राणे, GDP ते नाना पटोले | कोरोनाने माणसं मेली असतील थोडी फार | Social Viral
राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच ३ जून रोजी मराठा भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र नारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लोकप्रिय मराठी मिम्स पेजने या राणेंच्या पत्रकार परिषदेमधील जीडीपीसंदर्भातील प्रश्नांचा व्हिडीओ एडीट करुन अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झालाय.
4 वर्षांपूर्वी -
अनलॉक सुरु झाला | मुंबईकर सुद्धा सुटले | रस्त्यावर तुफान ट्राफिक, अन गल्लोगल्ली लोकांची गर्दी
कोरोना महामारीच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कडक निर्बंध लागू केले होते. आता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक करायला सुरुवात केली आहे. त्यासोबतच कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. सोमवारी मुंबई अनलॉक होताच मुंबईकर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसले. त्यामुळे मुंबईतील महत्त्वाच्या चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होता.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संपलेला नाही | गर्दी, आरोग्याचे नियम मोडलेले चालणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्रात सोमवारपासून ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद मनपा क्षेत्र, जालना, नांदेड आणि लातूर शहर पहिल्या स्तरात असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मात्र मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अनिवार्य असून औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ ते ४, तर जळगाव जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
केरळ मधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी