महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार | जयंत पाटलांचं मोठं विधान
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही लोकं काही काळ आमच्यासोबतही होती, त्यामुळे त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला ठाऊक आहे - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना भाजपाची फूस - हसन मुश्रीफ यांचा आरोप
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या आणखी एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसानं दिला याचंच आश्चर्य - विनायक राऊत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण का दिले नाही? - अजित पवारांचा सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (४ जून) मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी
केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर महाराष्ट्र ‘अनलॉक’ आदेश निघाले | पाच टप्प्यात असे हटणार निर्बंध
राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉ .रेड्डीज लॅबोरेटरीज मुंबई महानगरपालिकेला स्पुटनिक लसीचा पुरवठा करणार
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांना स्पुटनीक लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. लसींच्या तुटवड्याअभावी मुंबई मनपाने ग्लोबल टेंडर काढत लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याच दरम्यान आता डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत बोलणी यशस्वी झाली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
तो निर्णय चुकीचा होता, पाठीत खंजीर खुपसला गेला | सकाळच्या शपथविधीवर फडणवीसांची प्रतिक्रिया
लोकसत्ता’तर्फे आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली झालेल्या निवडणुकांनंतर अजित पवार यांच्यासोबत भल्या सकाळी घेतलेला शपथविधी अजूनही चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ८० दिवसांच्या चाललेल्या सरकारची चर्चा अजून देखील होत असते. त्यावर फक्त शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर खुद्द भाजपामधून देखील चर्चा किंवा नाराजी किंवा पाठिंबा अशा संमिश्र भूमिका व्यक्त होत असतात.
4 वर्षांपूर्वी -
BMC निवडणूक | श्रेत्रीय अस्मितेसंदर्भातील मनसेसोबत मतं जुळत नसल्याने युती करण्याचा प्रश्नच नाही - फडणवीस
लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत आज देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी महाराष्ट्रामधील आगामी काळामध्ये येणारी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असून या निवडणुकीसाठी भारतीय जनात पार्टी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करणार का या प्रश्नावर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर | आता पुनर्विचार याचिकेकडे लक्ष
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अलाहाबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची समिती स्थापन केली होती. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी या समितीने काम केलं. त्यानुसार या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन गोंधळ | वडेट्टीवार यांचीही बाजू सावरत अजितदादा म्हणाले, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भाष्य केलं. अनलॉकविषयी राज्य सरकारमध्ये पूर्णपणे सुसंवाद आहे. सरकार कितीही पक्षाचं असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री जे काही सांगतील, तेच अंतिम असतं,’ असं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, त्यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचीही बाजू सावरून घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई | आदर्श भाडेकरु कायद्याविरोधात शिवसेनेचं आंदोलन
केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन भाडेकरार कायद्याविरोधात शिवसेनेनं आंदोलन पुकारलं आहे. या कायद्यानुसार घरमालक आणि भाडेकरूंच्या संमतीने भाडेकरार संपुष्टात आणण्याची मुदत ठरवण्यात येणार आहे. शिवसेनेनं या कायद्याविरोधात मुंबईयेथे आंदोलन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश | विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती
प्रसिद्ध गायिका वैशाली माडेनं नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
समाजालाही वाटलं पाहिजे ना तुम्ही राजे आहात ! राणेंचा संभाजीराजेंवर प्रहार | पण कोणाच्या सांगण्यावर?
संभाजीराजे छत्रपती हे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाची आक्रमकता देखील वाढत चालली आहे. अशातच आता भाजप खासदार नारायण राणे यांनी संभाजीराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलो म्हणजे आरक्षणही मिळत नाही आणि कोणी पुढरीही होत नाही. समाजाला वाटलं पाहिजे ते राजे आहेत. लोकांमध्ये आस्था, आपुलकी, प्रेम निर्माण होण्यासाठी तसं कार्य करावं लागतं.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | कोंकण रेल्वेमध्ये भरती | ईमेलद्वारे अर्ज करा
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड भर्ती 2021. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने 12 विभाग व्यवस्थापक, अधिकारी आणि लेखा सहाय्यक पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार केआरसीएल भरतीसाठी 01 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ईमेलद्वारे अर्ज सबमिट करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील HSC परीक्षा रद्द | आपत्ती व्यवस्थापन खात्याच्या बैठकीत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर
राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी जास्त होताना दिसत आहे. अशात विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असल्याकारणाने राज्य सरकारने १० वीची परीक्षा रद्द केली होती. मात्र, १२ वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, १२ वीची परीक्षाही रद्द करण्यात यावी अशी मागणी होत होती.
4 वर्षांपूर्वी -
आलं अंगावर ढकल कार्यकर्त्यांवर | यापुढे माझा मोबाईल माझी जबाबदारी - संदीप देशपांडे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल - नाना पटोले
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी घोषणाची नाना पटोले यांनी केली केली आहे. राज्यात काँग्रेस सध्या चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे; परंतु २०२४ मध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. प्रसार माध्यमांशी बोलताना नानांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले, तो शिवसैनिकाचा राग होता | महापौरांचं स्पष्टीकरण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्वीटवर स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या मोबाईलवरुन कार्यकर्त्याने ट्वीट केले. तो शिवसैनिकाचा राग होता, परंतु ते चुकीचंच होतं. कार्यकर्त्याला समज दिली आहे” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. टीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओवर एका ट्विटराईटने लसीचे कंत्राट कोणाला दिले, असा प्रश्न विचारला होता. त्यावर महापौरांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी