महत्वाच्या बातम्या
-
संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घेतला तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे - प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणं हा एक मार्ग आहे. ही याचिका फेटाळल्यानंतर दुसरी याचिका करता येते. हा एक मार्ग आहे. पण सत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं सांगतानाच राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाच्याविरोधात 'वन मेरिट वन नेशन' या संस्थेला भाजपने रसद पुरवली - अरविंद सावंत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास एक वर्ष प्रयत्न करुनही संभाजीराजे छत्रपती यांना भेट दिली नाही. संभाजीराजेंची ही अवहेलना भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी येणार आहे, असा थेट इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिला. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र झोपेत असताना सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांतदादांनी जागे असताना केलं की झोपेत - अजित पवार
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | भाजप नेते अजूनही केंद्राची भूमिका नाकारत आहेत? | काय म्हणाले दरेकर?
आजपर्यंत शिवसेना आणि महाविकासआघाडी सरकारने नेहमीच आपल्याकडची कुठलीही गोष्ट केंद्रावर ढकलायचेच काम केले. आताही मराठा आरक्षणासंदर्भात हुकूमाची पानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणत आहेत. हुकूमाची पानं त्यांच्या हातातच असतील तर मग तुमची गरजच काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | घटना दुरुस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल - दिलीप वळसे पाटील
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एखाद्या समाजाला मागासवर्गीय ठरवायचे असल्यास केंद्रीय मागसवर्गीय आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे. मात्र, त्याची घटना दुरुस्ती दिल्लीतच करावी लागेल. वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करून मराठा समाजाच्या मागणीला संरक्षण द्यावे लागेल, असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाला दिलेल्या भेटी दरम्यान व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
आम्ही संभाजीराजेंच्या भूमिकेशी सहमत | राज्यातील सर्व नेते भेटले आता मोदींनी भेट द्यायला हवी - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | मुंबई उच्च न्यायालयात 49 पदांची भरती
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२१. मुंबई उच्च न्यायालयाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून वरिष्ठ सिस्टम अधिकारी आणि सिस्टम ऑफिस पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार 03 जून 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहिती जसे की वय मर्यादा, पात्रता आणि मुंबई उच्च न्यायालय भरती 2021 साठी अर्ज कसा करावा हे खाली नमूद करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोठा दिलासा | महाराष्ट्रात रिकव्हरी रेट वाढून ९३.२४ टक्क्यांवर | रुग्णसंख्या पुन्हा घटली
राज्यात सध्या फक्त २ लाख ८९ हजार ०८८ अॅक्टिव्ह रुग्ण सध्या राज्यात करोनाचे उपचार घेत आहेत. तर ५३ लाख ०७ हजार ८७४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट कालपेक्षा किंचित वाढून ९३.२४ टक्के इतका झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सरकारनं त्या ५ गोष्टींवर निर्णय घ्यावा | अन्यथा ७ जूनला रायगडावरून आंदोलनाला सुरुवात
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | संभाजीराजेंनी सुचवलेले ते ३ पर्याय सत्ताधारी-विरोधकांना मान्य | काय आहेत पर्याय?
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आली आहे, असे म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार - संभाजीराजेंची गर्जना
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आलीये, असे म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला | बैठकीला अशोक चव्हाणही उपस्थित
मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा धक्कादायक निर्णय दिला. त्यानंतर मराठा समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली. दरम्यान, मराठा आरक्षणाचा हा तोडगा सोडवण्यासाठी खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. आज (२८ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संभाजीराजे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे देखिल उपस्थितीत होते. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे पत्रकार परिषद घेणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही? - जयंत पाटील
महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?,अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. “महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं,” असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
FYJC Class Maharashtra | अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार | कशी असेल संपूर्ण प्रक्रिया
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन | अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकारने दिली माहिती
मागील अनेक दिवस १०वी आणि १२वीच्या परीक्षेवरुन त्यानंतर त्याच्या निकालावरुन सावाळा गोंधळ उडाला होता. पालक, विद्यार्थी यांच्यातही संभ्रम निर्माण झाला होता. या सगळ्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज (२८ मे) पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट | मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचा संस्थापक अनुप मरार भाजपचा सदस्य
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापवण्यासाठी भाजपचे नेते पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे कोरोना आपत्तीत राज्य सरकारच्या अडचणी वाढविण्यासाठी मराठा समाजाला भडकावून भाजप नेते मोर्चे काढण्याच्या तयारीत आहेत. केंद्रा सर्व विषय शक्य असताना देखील राज्यातील भाजप नेते मूळ मुद्द्याला बगल देत केवळ समाज कसा पेटेल याची काळजी घेताना दिसत आहेत. यात समाजाच्या संविधानिक आणि न्यायिक मार्गाने आरक्षण देण्याच्या विषयाला पूर्णपणे दुर्लक्षित करून राज्यातील वातावरण बिघडविण्याचा हेतू असल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार? - शिवसेना
देशातील कोरोना मृतांचे खरे आकडे लपवले जात असल्याची बोंब जागतिक पातळीवर मारली जात आहे. ही बोंब मारण्यासाठी कुणीतरी ‘ट्विटर’चे माध्यम वापरले म्हणून मध्यरात्री दिल्लीच्या ‘ट्विटर’ मुख्यालयावरच पोलिसांनी धाडी घातल्या. आता या समाज माध्यमांवरही बंदी घालण्याचे विचार सुरू आहेत. आम्हाला वाटते, थोडे थांबायला हवे. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍपवर अशी घाईघाईने बंदी घातली तर मेहुल चोक्सीला पकडल्याचा व हिंदुस्थानात आणल्याचा आनंदसोहळा भक्तमंडळ कसे साजरा करणार? असा टोला शिवसेनेने आजच्या (२८ मे) सामना संपादकीयमधून लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय | तर चंद्रपुरातील दारुबंदी उठवली
मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या हाणीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच नुकसान भरपाई, मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची भरपाई वाढीव दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली | उद्या मुख्यमंत्री, फडणवीस आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट झाली. यावेळी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे मित्र होते. राज ठाकरे आणि माझाही कॉमन पॉईंट असल्याचं संभाजीराजे म्हणाले. तसंच उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन संस्थेचे भाजप व नागपूर कनेक्शन उघड
मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
4 वर्षांपूर्वी