महत्वाच्या बातम्या
-
ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून सहकार्य करावं - ऊर्जा मंत्री
राज्यात गेले अनेक महिने वाढीव वीज बिलाचा मुद्दा गाजत आहे. त्याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसंच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत लस संपत आली तरी पुरवठा नाही | वरवर माया आणि पोटभर जेव ग बया असं केंद्राचं धोरण - महापौर
नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात ब्राझील आणि अमेरिका महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संक्रमणाच्या 55,469 नवीन केस आल्या. 34,256 बरे झाले आणि 297 जणांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांचा हा दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 4 एप्रिलला 57,074 प्रकरणे आली होती.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया स्कॉर्पिओ प्रकरण | परमवीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | परमवीर सिंगांच्या आदेशाने सचिन वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस | अहवालात खुलासे
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे. TV 9 मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे | पवार ED ऑफिसवर धडकले तर राज इडीला घाबरले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लेखक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या ब्लॉग मधून काही आरोप केले आहेत. ’जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षका खाली त्यांनी एक ब्लॉग लिहला. या लिखाणामुळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे परिस्थिती गंभीर | राज्यातील ‘या’ निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय
महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
वांद्रे पूर्व विधानसभा | जनसंपर्क तुटलेल्या तृप्ती सावंत भाजपच्या संपर्कात | आज प्रवेश झाला
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात तृप्ती सावंत मागील काही महिन्यांपासून जनसंपर्काची बाहेर होत्या तसेच त्यांच्याभोवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं वलय उरलं नसल्याने राजकीय प्रवास खडतर झाला होता. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला | देशमुखांची सुप्रीम कोर्टात 290 पानांची विशेष अनुमती याचिका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई हायकोर्टाने CBIने करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण आता मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज (६ एप्रिल) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मिठी नदीतील वस्तू NIA'ने प्लांट केल्याचा वाझेंच्या वकिलाचा दावा | भाजप नेत्याच्या दाव्याने शंका वाढली?
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात शनिवारी सचिन वाझे आणि NIAच्या वकिलांचा तोडीस तोड युक्तिवाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. त्यांनी न्यायालयात केलेली एकूण मांडणी पाहता सचिन वाझे यांनी NIA समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. त्यामुळे सचिन वाझे पूर्णपणे चेकमेट झाल्याच्या NIAच्या हवाल्याने करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, अशी शंका आता उपस्थित झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार - गृहमंत्री
सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख किंवा महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेल्यास मी विरोध करणार - जयश्री पाटील
अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी टाळता यावी यासाठी त्यांनी दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा दरम्यान चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या घडामोडी घडल्या.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना का वाढला? | राज ठाकरे यांनी सांगितली ही कारणं
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता, महत्त्वाचा विषय तर ‘तो’ आहे
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता प्रोमोट करा - राज ठाकरे
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
२०२४ मध्ये दोन कोटी मतांचं लक्ष्य | आता भाजप स्वबळावरच लढणार - चंद्रकांत पाटील
आज भाजपाचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे संकेत दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | MPSC विद्यार्थ्यांचा कोरोनाने मृत्यू | परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती | तेव्हा मुख्यमंत्री हेच सांगत होते?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएसी) पूर्वपरीक्षेची यापूर्वी नवीन तारीख जाहीर केली होती आणि त्यानुसार ती परीक्षा गेल्या महिन्यातील २१ मार्चला होणार असल्याचे जाहीर केले होते. याशिवाय, २७ मार्च आणि ११ एप्रिलला होणाऱ्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर एमपीएससीने हा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
अॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी जाहीर होणार - मराठा क्रांती मोर्चा
मुंबईतील बार, हुक्का पार्लर चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांप्रकरणी अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गृहमंत्र्यांवरील आरोपांची चाैकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यापूर्वीच सीबीआयची धावाधाव | CBI आज मुंबईत
मुंबईतील बार, हुक्का पार्लर चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांप्रकरणी अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गृहमंत्र्यांवरील आरोपांची चाैकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी -
चित्रा ताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण? - रुपाली चाकणकर
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांनी देखिल स्वीकारला आहे. या सगळ्या विषयावर सध्या राजकरण तापलं आहे. राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळत आहे. अनिल देशमुख यांना टोला लगावत नवा वसुली अधिकारी कोण असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. त्याला रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना संकट | संकटावर मात करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे - शरद पवार
कोविड १९ च्या महामारीने गंभीर रुप घेतले असून या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील जनतेने सहकार्य करावे आणि सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्राद्वारे केले.दरम्यान अभूतपूर्व संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर झोकून द्यावे असे आवाहनही शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
4 वर्षांपूर्वी