महत्वाच्या बातम्या
-
अनिल देशमुख यांचा राजीनामा | दिलीप वळसे पाटील होणार राज्याचे नवे गृहमंत्री
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले. सीबीआयला यासंदर्भात 15 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर अडचणीत सापडलेल्या अनिक देशमुख यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात भाजपचा सर्वच निवडणुकांमध्ये पराभव | तरी फडणवीस म्हणाले 'हे जनतेच्या मनातलं सरकार नाही'
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चुप्पीवरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. राजीनामा झाला असला तरी, सरकारवर गंभीर आरोप लागले तरी, राज्याचे मुख्यमंत्री यावर चकार शब्दही का बोलत नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा | कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. दरम्यान, आज (५ एप्रिल) मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSC HSC Exams | परीक्षा संदर्भात शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक
महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 57,074 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले असून या आकड्यांची तुलना इतर देशांशी केल्यास महाराष्ट्राची संख्या भारत आणि फ्रान्स देशाच्या ही पुढे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या आदेशानंतर जयश्री पाटील यांच्या प्रतिक्रियेवर अनेकांच्या भुवया उंचावल्या | तो 'मराठा' शब्दप्रयोग
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निकाल | देशमुखांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे CBI'ला आदेश
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात कडक निर्बंध लागू | पण काय आहेत कडक निर्बंध? - सविस्तर
मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कठोर निर्बंध | तर शुक्रवार रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाउन | अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत. कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल, असे मुंबईच्या पालकमंत्र्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची फोन पे चर्चा
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय.अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातही कोरोनाचा प्रसार झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली.रश्मी ठाकरे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती मिळत आहे.यावेळी त्यांनी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीबद्दल चौकशी केली आहे. तसेच राज्यातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
परिस्थतीमुळे लॉकडाऊन निर्णय झाल्यास सहकार्य करावं | मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना फोन
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण एकट्या महाराष्ट्रात समोर येत असल्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांनी बंधू आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन की कडक निर्बंध? | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक
राज्यात कोरोना रुग्णांनाचा स्फोट झाला आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात समोर येत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा घट्ट होत असणारा विळखा पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामुळे यामध्ये आता कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा, माध्यमांची भूमिका महत्वाची - मुख्यमंत्री
राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर राज्यात ८ ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर होईल | बैठकीनंतरचा अंदाज
राज्यात मागील काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र तरी देखील रूग्णसंख्या अटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात ४७ हजार ८२७ नवीन करोनाबाधित आढळले असून, २०२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९१ टक्के एवढा आहे.
4 वर्षांपूर्वी -
शालिनी ठाकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक | हॅकरने अश्लील व्हिडिओ स्टेटस ठेवलं
मनसेच्या सरचिटणीस शालिनी शालिनी ठाकरे यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे हॅकरने त्यांच्या अकाउंटवर पॉर्न व्हिडिओ स्टेटस ठेवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. स्वतः शालिनी ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःविरुद्धच्या न्यायालयातील दाव्याला देखील किरीट सोमैय्या यांनी 'वसुली' संबोधलं
सध्या सचिन वाझे प्रकरणाचा तपास NIA आणि राज्य ATS करत आहेत. त्यासंबंधित विषय न्यायालयात देखील असून त्याबाबतीत पुरावे गोळा करण्याचं देखील काम चौकशी यंत्रणांकडून सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणात ज्या आर्थिक घडामोडी समोर आल्या आहेत त्याचा देखील तपास अजून सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | इयत्ता पहिली ते आठवी परीक्षा रद्द | विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश - राज्य सरकार
महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येने कहर केला. गेल्या २४ तासांत राज्यांत तब्बल ४७,८२७ नवीन काेरोना रुग्ण वाढले आहेत. ही काेरोना महामारी सुरू झाल्यापासूनची उच्चांकी संख्या आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या २९ लाख ४,०७६ वर पाेहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही ३ लाख ८९,८३२ वर गेली आहे. गुरुवारी २०२ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ५५,३७९ झाली आहे. दुसरीकडे, दिवसभरात २४,१२६ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले.राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता २४ लाख ५७,४९४ झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.६२ टक्क्यांवर आले आहे. राज्याचा मृत्युदर १.९१% इतका आहे.
4 वर्षांपूर्वी -
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स तरीही ते जवाबदारीने...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. ते म्हणाले की, “बंगाल, आसाम अशा आणखी काही राज्यात निवडणूका आहेत तिथे कोरोना वाढत नाही का? तर मी त्यांना सांगू इच्छितो की मला तिथे काय सुरू आहे त्याबद्दल बोलायचं नाही
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही - देवेंद्र फडणवीस
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच, राज्यात लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या आणि लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्यांवर निशाणा साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगातील परिस्थितीची आढावा वाचून दाखवला होता.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या मास्कवरील टीकेला मनसे Facebook LIVE वरून प्रतिउत्तर देणार
राज्यातील कोरोनस्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेंदिवस खळवणाऱ्या या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. “मास्क न वापरण्यात काय शौर्य आहे?”, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील फरक कळतो? पॅकेज निमित्ताने भलतेच सल्ले
सध्या देशभरात कोरोनामुळे चिंता वाढताना दिसत आहे. मात्र परदेशात भारतापेक्षाही परिस्थिती अधिक गंभीर असल्याचं दिसत आहे. परिणामी मागील अनुभव पाहता तिथल्या देशातील सरकारने लॉकडाउन करण्यापूर्वी सामान्यांच्या दृष्टीने आर्थिक पॅकेज जाहीर केले आहेत. एका बाजूला अशी स्थिती असताना स्वतःला अभ्यासू नेते म्हणवून घेणारे महाराष्ट्रातील नेते देखील सल्ले देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. फडणवीसांनी देखील तसाच सल्ला महाराष्ट्र सरकारला दिला आहे. मात्र फडणवीसांना सल्ला आठवला तेव्हा त्यांना देशातील सरकार आणि राज्य सरकार यातील फरक समजला नसल्याची टीका सुरु झाली आहे. कारण जो सल्ला त्यांनी मोदी सरकारला द्यायला हवा होता तो ते राज्य सरकारला देताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी