महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही आमच्यावर कितीही आरोप लावा | आम्हाला काही चिंता नाही - फडणवीस
पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महापारेषण मध्ये 94 पदांची भरती
महाट्रान्सको भरती २०२१, महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रांसमिशन कंपनी लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली असून इलेक्ट्रीशियन पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक व पात्र उमेदवार १० एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी महारट्रान्सको भरतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदवू शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि महाट्रान्सको भरती २०२१ साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सरकारमध्ये मंत्री अहवाल तयार करायचे आणि सचिव स्वाक्षरी करायचे का असा प्रश्न पडलाय
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलिस आयुक्तालयातील DVR गायब | परमवीरसिंह यांनी ATS ला चकविले | चौकशी व्हावी
सचिन वाझे आणि मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यातील भेटींवर शंका उपस्थित करत काँग्रेसने काही सवाल केले आहेत. सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे स्कॉर्पिओत धमकीचे पत्र ठेवायला विसरले आणि पुन्हा पत्र ठेवण्यासाठी आले तिथेच फसले
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर आढळलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. सीसीटीव्हीमधून समोर आलेल्या माहितीनुसार, सचिन वाझेने 25 फेब्रुवारी रोजी अँटिलियासमोर स्कॉर्पिओ उभी करताना त्यामध्ये धमकीचे पत्र ठेवायला विसरले होते. परंतु, काही वेळानंतर त्याच्या लक्षात आल्यावर त्याने इनोव्हा गाडीने परत येऊन त्यामध्ये पत्र ठेवले. हा सगळा प्रकार सीसीटीमध्ये कैद झाला. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे हाती मोठे पुरावे लागले असून यामुळे सचिन वाझेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
परेलमध्ये इमारतीला आग | नाना पटोलेंनी ताफा थांबवत संवेदनशीलता दाखवली
महाराष्ट्रात मागील दोन दिवसात जवळपास ६ ते ७ ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. काल, मुंबईतील भांडूप मॉलला भीषण आग लागली. तब्बल 11 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आली. त्यातच काल रात्रीच्या सुमारास परेलमध्येही आगीची घटना पुढे आली. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट् प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची संवेदनशीलता पुढे आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजून किती फेकणार मोदीजी, हद्द केली राव - नाना पटोले
बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर आहेत. राजधानी ढाकामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपणही बांगलादेश स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यात असल्याची आठवण सांगितली. बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
शुक्लांवर एवढा विश्वास का ठेवला? | महाविकास आघाडीला संजय राऊत यांचा सवाल
एकदा धडा घेऊनही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर इतका विश्वास कसा ठेवला, याचे आश्चर्य वाटते. राजकारणात अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरून दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या अनुभवानंतर शिकावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महविकास आघाडीच्या सरकारला शुक्रवारी नवी दिल्लीत सुनावले.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी शुक्ला या बिल्डरांकडून खंडणी घेत | त्यांना फडणवीसांचे पाठबळ होते - हरिभाऊ राठोड
सध्या राज्यात फोन टँपिंग प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यात राज्य सरकारला मुख्य सचिवांनी अहवाल सादर केल्यानंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने गृह विभागाकडून मान्यता घेतली होती आणि तीच त्यांनी सरकार विरोधात वापरल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र आता रश्मी शुक्ला यांचावर अजून आरोप होण्यास सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
...तर १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार
१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनामुळे १०वी आणि १२वीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी तसेच बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
डान्सबार बंदी | आर आर आबांनी ते संघर्षातून शक्य केलं | ते फडणवीस सरकारच्या त्रुटींमुळे वाया गेलं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिना १०० कोटीच्या टार्गेटचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र त्यानंतर पुन्हा डान्स बार सारखे मुद्दे समोर आले आहेत, ज्यामुळे पुन्हा त्याच गोष्टी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ज्या पक्षाच्या नेत्यावर हे आरोप करण्यात आहेत त्याच पक्षातील एका नेत्याची तळमळ काही वर्षांपूर्वी पाहायला मिळाली होती. जसे आज मराठा आरक्षणावरून भाजप सत्ताधाऱ्यांवर न्यायालयात कमकुवत बाजू मांडत असल्याचा आरोप होतं आहे तसाच आरोप त्यावेळी डान्सबार वरील बंदीवरून भाजपने केला होता. मात्र प्रत्यक्षात भाजप सत्तेत आल्यावर देखील तेच घडलं ज्यावरून ते तत्कालीन सत्ताधाऱ्यांवर आरोप करत होते. त्यावेळी सर्वाधिक तळमळ पाहायला मिळाली होती ती दिवंगत माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची असं म्हणता येईल.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंहांच्या पत्नी 5 कंपन्यांमध्ये डायरेक्टर | TRP प्रकरणानंतर LIC हाउसिंगच्या बोर्डवरुन हटवलं
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात संपत्ती कमवायची आणि शेवटी जाताना महाराष्ट्रालाच बदनाम करून जायचं
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असताना राष्ट्रवादी मात्र अनिल देशमुखांच्या मागे खंबीरपणे उभी होती. आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई | भाडूपच्या सनराईज हॉस्पिटला आग | त्या दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं वृत्त
मुंबईच्या भांडुप परिसरात एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर बनवलेल्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री 12 वाजता आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि मात्र त्याबद्दल इस्पितळाने वेगळंच कारण दिलं आहे . हॉस्पिटलमध्ये दाखल 76 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले आहे. फायर ब्रिगेडच्या 22 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी पोहोचल्या. रुग्णालयात बचावकार्य अजूनही सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
अहवालात वस्तुस्थिती पूर्ण भिन्न | म्हणजे फडणवीसांनी त्याचा उपयोग देशभर संभ्रम निर्माण करण्यासाठी केला?
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारची दिशाभूल करून गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी - अहवाल सादर
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सार्वजनिक सुरक्षेला धोका असल्याचे कारण देऊन गृहविभागाकडून फोन टॅपिंगची परवानगी घेतली. मात्र प्रत्यक्षात खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले. ही बाब उघड होताच शुक्ला यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माफी मागितली. तसेच फोन टॅपिंगचा अहवाल परत घेण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. मात्र हा अत्यंत गोपनीय अहवाल शुक्ला यांनीच फोडला, असा संशय असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अहवालात केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शुक्ला यांच्यामागेच चौकशीचे ‘शुक्लकाष्ठ’ लागण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत रहिवाशी इमारतीत लसीकरण मोहिम राबवण्याचा महापालिकेचा विचार
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | सचिन वाझे आणि मनसुख 17 फेब्रुवारीला CST स्टेशनच्या बाहेर भेटले
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कड्या जोडणारे एक CCTV फुटेज समोर आले आहे. यामध्ये दिसतेय की, 17 फेब्रुवारीला वाझे आणि मनसुख यांची भेट झाली होती. CCTV फुटेज CST रेल्वे स्टेशनच्या बाहेरचे आहे. आता तपास यंत्रणांनुसार, या भेटीदरम्यानच मनसुखने स्कॉर्पियोची चावी वाझेला सोपवली होती.
4 वर्षांपूर्वी -
अपक्ष आमदार येड्रावकर यांनी भाजपासोबत राहण्यासाठी रश्मी शुक्लांनी त्यांची भेट घेतली होती
पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगमध्ये पोलिसांच्या बदल्या आणि बढत्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे सरकार अडचणीत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, हा डाव आता भाजपवरच उलटणार असल्याची शक्यता डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमुळे निर्माण झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस म्हणजे तपास यंत्रणा आहेत का? | त्यांनी आरोप केल्यावर कोणालाही दोषी ठरवायचे का?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवारांनी युपीएचं नेतृत्व करावं असं विधान केलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी