महत्वाच्या बातम्या
-
शरद पवार बोलत आहेत पण मुख्यमंत्री बोलत नाहीत - फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या सर्व प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
4 वर्षांपूर्वी -
ए भाई जगताप! मला डिवचू नको, माझ्यावर बोट उचलायचं न्हाय - अमृता फडणवीस
राज्यात सध्या परमवीर सिंग यांच्या लेटरने गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालाय,परंतु राजीनामा होणार नाही असा निकाल पवारांनी कालचं दिला.दुसरीकडे महाविकासआघाडीचे पक्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना केलेल्या घोटाळ्यावरून फडणवीसांना टार्गेट करत आहेत.ॲक्सिस बॅंकेत पोलीसांचे अकाऊंट ट्रान्सफर करण्यावरून भाई जगताप आणि फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात वॅार पाहायला मिळालं.
4 वर्षांपूर्वी -
एखादा मंत्री भ्रष्ट म्हणून राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी पत्र परिषदेत दिली. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची हायकोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत, सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
तर ते भाजपमध्ये प्रवेश करणारे मुंबईचे दुसरे माजी पोलीस आयुक्त ठरतील?
सध्याचं महाराष्ट्रातील राजकारण आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदावर राहून सुरु असलेल्या हालचाली पाहता ते अचानक राजीनामा देऊन राजकरणात न उतरल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात सचिन वाझे प्रकरणातील मूळ चौकशी सोडून संपूर्ण विषय अनिल देशमुख केंद्रित करण्याचा त्यांचा शिस्तबद्ध प्रयत्न सध्या बरंच काही सांगून जातोय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांनो उद्या मुंबईतील 'या' विविध ठिकाणी पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुंबईच्या काही भागांमध्ये उद्या (23 मार्च) दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवला जाणार असल्याची माहिती बृह्न्मुंबई महानगरपालिकेने अर्थात बीएमसीने दिली आहे. बीएमसी कडून 12 तासांसाठी हा पाणीपुरवठा प्रभावित असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच उद्यासाठी देखील पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी | परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव
परमबीर सिंग यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आपण जे आरोप केले आहेत. त्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी या याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेत आपण केल्या सर्व आरोपांची चौकशी करावी. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि वसुली प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप IT सेल प्रमुख आणि फडणवीसांकडून अशी धूळफेक | हा होता घटनाक्रम | फक्त संभ्रम
अॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून सोमवारी (१५ फेब्रुवारी २०२१) ला डिस्चार्ज घेतल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रथम पत्रकार परिषद जाहीर केली त्यानंतर रद्द केली आणि त्यानंतर पुन्हा ‘अनौपचारिकपणे’ ती आयोजित केल्याने वाद निर्माण झाला होता. कोविड मधून बरे होत रिपोर्ट नॉर्मल आल्याने अनिल देशमुख यांना घरी विलगीकरणात होते. मात्र त्यावेळी शेतकरी आंदोलनावरून देशातील मोठ्या प्रतिष्ठित रिहाना ट्विट वादावरून उत्तर दिल्या नंतर मोठं वादळ निर्माण झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
आरोपातील तारीख चुकली | देशमुख त्या तारखेला मुंबईत नव्हे तर नागपूरला होते
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यातील वातावरण तापले आहे. परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा खळबळजनक दावा केला. यानंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली होती. आता यावर शरद पवारांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘आरोपांमध्ये तथ्य नाही, यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही’ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्या गाणार होत्या | म्हणून पोलिसांच्या कल्याणार्थ कार्यक्रमात पोलिसांनाच तिकीट विक्रीच काम दिलेलं
२०१७ मध्ये औरंगाबाद पोलिसांनी सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे आणि महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. वादाचं कारण होतं पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांचं कर्त्यव्य सोडून या कार्यक्रमाचे तिकिट विकायला भाग पाडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे या तिकिटांची किंमत किंमत ५१ हजार रुपये इतकी होती. सत्तेचा गैरवापर करत पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
ATS ला संशय | वाझेंनी स्फोटकांच्या कटात मनसुख यांचाही समावेश केला होता | रहस्य उघड होण्याच्या भीतीने?
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण सोडवल्याचा दावा करत दहशतवादविरोधी पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यातील एक मुंबई पोलिसांचा निलंबित कॉन्स्टेबल आहे तर दुसरा क्रिकेट बुकी आहे. कोर्टाने या दोघांना 30 मार्चपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीच्या तपासात एटीएस सचिन वाझे यांना या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार मानत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पैसे उकळण्यासाठी खंडणीचा अवलंब म्हणजे लैंगिक संबंधासाठी बलात्कार करण्यासारखे आहे - अमृता फडणवीस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे सध्या राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र जोपर्यंत तपास पूर्ण होऊन सत्य समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग राज्यपालांना भेटणार | स्वतःला वाचवण्यासाठी भाजपच्या इशाऱ्यावर हालचालींचा आरोप?
मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. सिंग यांनी थेट गृहमंत्र्यांवरच आरोप केलेले असल्याने विरोधीपक्ष भाजपाकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सिंग यांच्या पत्रावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग या दिग्गज भाजप नेत्याचे व्याही | हे त्या पत्रा मागील आरोपांचं कारण नाही ना?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि नुकतीच सचिन वाझे प्रकरणावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांचे भाजपच्या नेत्यांशी असलेले नाते संबंध देखील समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा अनिल देशमुखांना लक्ष करणाऱ्या भाजपवर अजून टीका सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
२००२ मध्ये गुजरातच्या पोलीस प्रमुखांनी अमित शहांवर पोलीस दलाचा गैरवापर केल्याचा आरोप केलेला - काँग्रेस
परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्बनंतर काँग्रेसने देखील महाविकास आघडीचा बचाव करताना भाजपवर प्रहार केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं की, ‘२००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शाह पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का?, असे प्रश्न सावंत यांनी विचारले.
4 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व रमेश कंपाउंड महाकाली गुंफा रोडवरील जागा गुंडांमार्फत बळकावण्याचा प्रयत्न
रमेश कंपाउंड महाकाली गुंफा रोड येथील रमेश सिंग या जागेचे ताबा असलेल्या मालकाची जागा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुढे करून हडपण्याचा प्रकार खुलेआम सुरु असल्याचं वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये राजकीय लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असल्याने अंधेरी पूर्वेकडील स्थानिक MIDC पोलीस स्टेशन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका राजकीय लोकप्रनिधीचा या जागेवर डोळा असल्याने जागेचे ताबा मालक रमेश सिंग यांना गुंडांच्या मार्फत घाबरविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांच्याच जागेत गुंडांना घुसवून जागा खाली करण्याच्या धमक्या दिल्या जातं आहेत आणि त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस दिल्लीत आल्यानंतर हे पत्र समोर आलं | पवारांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ काय?
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांची कसून चौकशी करा | आणखी कुणाला किती द्यायला सांगितले?- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा ‘तो’ नेता कोण | राज ठाकरेंकडून प्रश्न चिन्ह उपस्थित
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पोलीस असं धाडस करणारच नाहीत | पोलिसांना आदेश देणाऱ्यांचा शोध होणं गरजेचं - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांनी विषय इतरत्र विचलित न करता या प्रकरणातील मूळ सूत्रधार ज्यांनी ती स्पोटकांची स्कॉर्पिओ मुकेश अंबानींच्या घराबाहेर ठेवायला सांगितली, त्यांच्या मागे केंद्रित राहायला हवं. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करत सर्व धागे दोरे शोधून काढणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंहांनी ADG च्या तपासात साक्षीदारांना धमकावले | DGP ने पुण्यात गुन्हा दाखल करण्यापासून अडवले
महाराष्ट्राचे सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये त्यांनी आरोप केला की, मुंबई पोलिसचे कमिश्नर पदावर उचलबांगडी केलेल्या परमबीर सिंहांनी ADG देवेन भारतींच्या विरोधात तपासामध्ये साक्षीदारांना धमकावले. अतिरिक्त सचिवांनी याच ADG च्या प्रकरणात तपास रोखण्याचा आदेश दिला. पत्रात त्यांनी मुंबई पोलिस कसे काम करत आहेत याची पद्धतशीरपणे माहिती दिली आहे. सचिव त्यात अडथळे कसे आणत आहेत. हे देखील त्यांनी सांगितले आहे.
4 वर्षांपूर्वी