महत्वाच्या बातम्या
-
खा. मोहन डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या माजी आमदाराचं नाव | राज्य सरकार चौकशी करणार
दोन दिवसांपूर्वी दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. यासोबतच पोलिसांना एक सुसाइड नोटही सापडली होती. आता या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे
4 वर्षांपूर्वी -
सरदार पटेलांचा एव्हढा घोर अपमान फक्त भाजपा आणि संघीच करू शकतात - आ. भाई जगताप
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना वाढतोय | BMC'चा दावा
राज्यासह मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता धडक मोहिम सुरु केली असून यात कोरोनाचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जात आहे. यात आतापर्यंत केलेल्ये सर्वेनुसार, मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. दरम्यान हॉटेल्स, बार, पब्ज, हॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेचे छापे टाकण्याचे काम सुरु आहे. यात कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
दरेकरांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, फडणवीसांना तरी समजला का? - शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना करोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ‘सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये,’ अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली होती. दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक जबाबदारी समजणार नाही - राष्ट्रवादी
राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली | सर्वपक्षीय नेत्यांकडून आभार व्यक्त
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.
4 वर्षांपूर्वी -
हेच का ते अच्छे दिन | इंधन दरवाढीवरून मुंबईतील पेट्रोल पंपांवर शिवसेनेची पोस्टरबाजी
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत मनसेला शंका | हा सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम - मनसे
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
वांद्र्यातील 5 पबमध्ये बीएमसीची छापेमारी | ग्राहकांना मास्क घालण्याच्या सूचना देऊन सोडले
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बृहनमुंबई महापालिकेची धडक कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्री मुंबईतील वांद्रे परिसरातील 5 पबवर BMC च्या आधिकाऱ्यांनी छापेमारी केली, यावेळी अनेकांनी मास्क आणि सोशल डिस्टिसिंग सारख्या नियमांचे पालन केलेले दिसले नाही. यानंतर आधिकाऱ्यांनी सर्वांना मास्क घालण्यासह इतर नियमांचे पालन करण्याचा इशारा देऊन सोडून दिले.
4 वर्षांपूर्वी -
मुलीने लग्नाला दिला नकार | म्हणून मुलाने धावत्या रेल्वेतून ढकलण्याचा केला प्रयत्न
प्रेमात अपयशी ठरलेल्या सुमेध जाधव या मुलाने 21 वर्षाच्या मैत्रिणीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. पण अयशस्वी झाल्याने तो पळून गेला. परंतु, थोड्या वेळाने रेल्वे पोलिसांनी आरोपीला पकडले. ही घटना मुंबईतील खार रेल्वे स्टेशनची आहे. स्टेशन प्लॅटफॉर्मवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना टिपण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव | BMC ने 1,305 इमारती सील केल्या
मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. यामुळे मुंबई पालिका अधिक सतर्क झाली असून काही नियमही लागू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येणार आहे. काल मुंबईत 823 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नव्या नियमानुसार बीएमसीने शहरातील तब्बल 1305 इमारती सील केल्या आहेत. दरम्यान, 5 हून अधिक कोरोनाग्रस्त आढळलेल्या इमारती सील करण्याचा नवा नियम पालिकेने लागू केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई भाजपचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक | भाजपचा हा संघजिहाद आहे का? - काँग्रेस
भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले आहेत, तर काही जण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे एजंटही निघाले आहेत. आता भारतीय जनता पक्षाचा मुंबईचा अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. भारतीय जनता पक्षाचा हा संघजिहाद आहे का?,’ असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बागेत १३ तोळे सोनं व रोकड | रिक्षात विसरलेली बॅग मुंबई पोलिसांनी काही वेळात मिळवून दिली
मुंबई पोलीस हे नेहमीच सक्रीय असतात. मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव आपण अनेकदा ऐकला असेल आता पुन्हा एकदा त्याचाच प्रत्यय आला आहे. एक महिला आपली बॅग ऑटो रिक्षात विसरली आणि या बॅगमध्ये तब्बल १३ तोळे सोने आणि काही रोकडही होती. ही बॅग मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने शोधून काढली आणि पुन्हा त्या महिलेला परत केली आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कार्यानंतर सर्वत्र कौतुक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहती घर खाली करण्यासाठी पोलिस कुटुंबियांवर वरिष्ठांचा दबाव | राज ठाकरेंकडे मांडली कैफियत
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी काल कृष्णकुंज येथे गेले होते. त्यानंतर आज मुंबई पोलीस कुटुंबीयांनी देखील राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या | फडणवीसांचं टीकास्त्र
शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या ४० दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत. पण, महाविकासआघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलनं झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज तर कुणीही भेटायला येत नाही.” असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासघाडी सरकारवर आज टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
SRA घरं | घरं विकण्याची कालमर्यादा 10 वरून ५ वर्ष | निम्म्याने घट
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणा अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांना विकण्याच्या कालमर्यादेसंबंधीचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. या नव्या निर्णयांतर्गत राज्य सरकारने SRA अंतर्गत मिळालेली घरे 5 वर्षाच्या नंतर विकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यापूर्वी ही घरं विकण्याची कालमर्यादा 10 वर्षांची होती. ही माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
पुणे पोलिसांची मोठी कारवाई | अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला अरुण राठोडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत अरुण राठोडला ताब्यात घेतलं. आता याप्रकरणात त्याची चौकशी केली जाईल. अरुण राठोडची चौकशी थेट पोलीस आयुक्तालयात होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
तृतीयपंथीयांचा रस्त्यावर धुडगूस | वाहतूक पोलिसाला मारहाण | पोलिसांकडून अटक
मुंबईत रहदारीच्या ठिकाणी धुडगूस घालण्याचे प्रकार काही जुने राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी एका महिलेने ट्राफिक पोलिसांच्या कॉलरला धरून त्याला मारहाण केली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या महिलेला चांगलीच अद्दल घडवली होती.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रासाठी लज्जास्पद | मराठी माध्यमातून शिक्षण म्हणून BMC'ने नोकरी नाकारली
मराठी माणसाच्या मुद्द्यांवर स्थापन करण्यात आलेल्या शिवसेनेची ज्या राज्यात आणि महापालिकेत सत्ता आहे तिथे मराठी भाषेत शालेय शिक्षण झालं म्हणून नोकरी नाकारण्यात आलीये.मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये एकूण २५२ शिक्षकांची निवड करण्यात आली होती, मात्र आता मराठीत शिक्षण झाल्याचं कारण देत १०२ शिक्षकांना नियुक्ती नाकारण्यात आल्याचा आरोप केला जातोय. केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं नसल्याने तुम्हाला ही नोकरी देऊ शकत नाही, असं बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोप त्यांनी केलाय. विशेष म्हणजे या डावलण्यात आलेल्या 102 शिक्षकांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी माध्यमातूनच झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अटक झालेला भाजपचा उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवक अध्यक्ष बांगलादेशी | राष्ट्रवादीचं भाजपवर टीकास्त्र
मालवणी पोलीस ठाण्याच्या दहतवाद विरोधी पथकाने मालाड मालवणीच्या आंबोजवाडी, आंबेडक चौक, गेट नं. 8 येथे धाड टाकून रुबेल जोनू शेख या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं. तो बांग्लादेशच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावचा रहिवासी असल्याचं उघड झालं. कोणत्याही कागदपत्राशिवाय त्याने 2011मध्ये भारतात प्रवेश करून मालाडमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे तो भारतीय जनता पक्षाच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवकचा अध्यक्ष आहे.
4 वर्षांपूर्वी