महत्वाच्या बातम्या
-
मुंबई महानगरपालिकेतील विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच | भाजपाची निराशा
मुंबई महापालिकेचे विरोधीपक्ष नेतेपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्यावर सर्वोच्य न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. बीएमसीतील विरोधीपक्ष नेतेपद भारतीय जनता पक्षाला मिळावे, या मागणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. राजकारणात रोज हेच होते. आज आपण कोणाचे मित्र असू, तर उद्या त्याचे मित्र नसू, असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड यांनी राजीनामा पाठविल्याचं वृत्त मातोश्रीवरून फेटाळले
आज मातोश्रीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवून घरोघरी शिवसेना पोहोचविण्याबाबत बैठक पार पडली. तसेच पदाधिकाऱ्यांची गाव पातळीवरील रखडलेली पक्षीय स्तरावरील कामं याबाबत देखील माहिती घेण्यात आली. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नसल्याचं वृत्त आहे. हाती आलेल्या वृत्तानूसार, संजय राठोड यांच्या राजीनामा देण्याबाबतचे सर्व वृत्त मातोश्रीवरील वरिष्ठांनी फेटाळून लावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रेनच्या शौचालयात मुलीवर बलात्कार | 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
प्रवासी ट्रेनच्या शौचालयात एका मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. गोरखपूर एक्सप्रेस ट्रेन प्रवासादरम्यान ही घटना घडली. घटनेची गंभीर नोंद घेत ठाणे पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या तरुणावर पीडितेवर बलात्कार केल्याचा आरोप आरोप आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी रविवारी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्या राम मंदिर निर्माण | निधी संकलन करण्यासाठी RSS पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं.
4 वर्षांपूर्वी -
रोहित पवारांचा आरे जंगल दौरा | पर्यावरणप्रेमी आणि आदिवासींशी संवाद | क्रिकेट ते रिक्षातून सफारी
राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनी आज आरेच्या जंगलात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची संवाद साधत विषय सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. रिक्षा चालवत आमदार रोहित पवारांनी आरे कॉलनी भागात सफारी केली. त्यानंतर वृक्ष रोपण करून रोहित पवारांनी क्रिकेटचा आनंद देखील अनुभवला.
4 वर्षांपूर्वी -
गोल्ड फिंच हॉटेलमध्ये मुंबई भाजप नेते | महाविकास आघाडीसंदर्भातील राजकीय पुड्यांवर चर्चा
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशा राजकीय पुड्या सोडण्याचे प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहेत. मात्र वास्तव वेगळं असल्याने भाजपातील पदाधिकाऱ्यांना पक्षातच थोपवायचं कसं असा प्रश्न महाराष्ट्र भाजपातील नेत्यांसमोर उभा आहे.
4 वर्षांपूर्वी -
MHADA Lottery 20-21 | म्हाडाच्या घरांची लॉटरी | विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार
म्हाडाची मुंबईची लॉटरी उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील 300 घरांची लॉटरी निघणार आहे. दुपारी 12.30 वाजता ही लॉटरी निघेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
विधानपरिषदेच्या १२ जागा | राज्यपाल कोर्टात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विधानपरिषेदच्या 12 जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हटलंय. ते नाशिक येथे बोलत होते. बहुमत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष पाळत योग्य त्या नावांची शिफारस केली आहे. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी यावेळी कोरोना महामारीमुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, शेतकरी आंदोलन, नाशिक नियो मेट्रोयाविषयांवर भाष्य केलं. त्याशिवाय महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असंही ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत जाहीर प्रवेश | राम कदमांचे शेकडो कार्यकर्तेही मनसेत
कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या गळतीनंतर आता पुन्हा चित्र पालटू लागलं आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार राम कदम यांना सर्वात मोठा धक्का देण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक नेते सुनील यादव यांच्यासोबत आमदार राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेतजाहीर प्रवेश केला. तसेच मुंबईतील चांदिवली विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मनसेचा झेंडा हाती घेतला.
4 वर्षांपूर्वी -
समुद्राचं पाणी गोड करायचं आहे की स्वतःचं उखळ पांढर करायचं आहे? | मनसेचा सवाल
मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईकरांना मिळणार समुद्राचे गोड पाणी | एक लिटरसाठी होणार ४ युनिट वीज खर्च
मुंबईकरांना आता गोड पाण्याचा आनंद लुटता येणार आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. समुद्रातील २०० दशलक्ष लिटर पाणी गोड करण्याच्या प्रकल्पासाठी तब्बल १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पासाठी आग्रही असून, एक लीटर पाणी गोड करण्यासाठी चार युनिट वीज खर्च होणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
जुमलाजीवी, दंगलजीवी, रक्तजीवी, अदानीजीवी, अंबानीजीवी, फेकुजीवी, थापाजीवी आणि...
मागील काही काळापासून ह्या देशात नवी बिरादारी समोर आलीय, ती आहे आंदोलनजीवी, कुठलेही आंदोलन असेल हे तिथं पोहोचतात, वकिलांचं असो, स्टुडंटसचं कुठेही आंदोलन असेल तिथं पोहोचतात, देशानं ह्या आंदोलनजीवीपासून सावध रहायला हवं, आंदोलनजीवी हे सगळे परजीवी असतात, ज्यांचं ज्यांचं सरकार आहे त्या सगळ्यांना ह्या आंदोलनजीवी, परजीवींचा अनुभव येतो असं मोदी म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब यांचे व्हॉट्सअॅप चॅट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका | शिवसेना राज्यसभेत मुद्दा उचलणार
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचे आभार मानण्याचा प्रस्तावावर राज्यसभेत आज चर्चा होत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार म्हणाले वीज कंपन्यांच्या नावानं मला पत्र लिहा | नंतर कळलं की अदानी पवारांच्या घरी येऊन गेले
त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अदानी यांच्यात झालेल्या बैठकीचा संदर्भ देत गौप्यस्फोट केला आहे. “वीज बिलाबद्दल पहिलं आंदोलन आमच्या पक्षानं केलं. भाजपा काय पुढे येतंय. या सगळ्या ठिकाणी आमच्या पोरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खास करून नागरिकांनी याचा विचार केला पाहिजे की, त्यांच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं. वीज कंपन्यांकडून जी बिलं येताहेत, ती प्रत्येकाला येत आहे. लॉकडाउनमध्ये तुम्हाला त्रास झाला. तुमच्या वीज कंपन्यांना नफा झाला नाही म्हणून नागरिकांना पिळणार असाल, तर कसं होईल. सरकारमधील मंत्री म्हणाले होते, कपात करून. नंतर एकदम घुमजाव झालं,” असं राज ठाकरे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
KDMC'नंतर मनसेच्या अजून एका विधानसभेतील उमेदवारांचा पक्षाला रामराम
कल्याण डोंबवली महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मनसेला काल मोठा धक्का दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राजेश कदम हे पदाधिकारी असताना देखील त्यांना थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश देऊन राजेश कदम यांचं कल्याण डोंबिवलीत राजकीय वजन वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
नरेंद्र + देवेंद्र = वसुली केंद्र | इंधन दरवाढीच्या निषेधात शिवसेनेची निदर्शनं
एकीकडे वीजबिलाच्या मुद्यावरुन भाजप महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून राज्यभर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. राज्यभर मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. शिवसेनेकडून जागोजागी निदर्शनं करण्यात आली. कुठे दुचाकीची अंत्ययात्रा तर कुठे बैलगाडी मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
सरकारने संवादाने प्रश्न सोडवावा | पण तुम्ही रस्त्यावर बॅरिकेड्स-खिळे लावल्यावर जग बोलणारच
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना उपयोगी वस्तू आणि लहान मुलांना खाऊ वाटप केलं. विलेपार्ले इथे उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: उपस्थिती लावून, चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
दु:ख हेच की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी वसूल करतेय
वीरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल” असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही | ही तर टाइमपास टोळी - आदित्य ठाकरे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खिल्ली उडवली आहे. आदित्य ठाकरेंनी मनसेचा टाईमपास टोळी म्हणून उल्लेख केला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. आता शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा टाईमपास टोळी असा उल्लेख केल्याने सेना-मनसे वाद रंगला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपला निराशेने ग्रासले आहे | त्यांना शिवसेनेशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही - जयंत पाटील
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनपेक्षितपणे शिवसेनेच्या नैत्रुत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्र सारखं मोठं राज्य भाजपने गमावलं. पण शिवसेना जर भाजपसोबत नसेल तर भाजपची सत्ता येणं शक्य नसल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे शिवसेनेवर तुटून पडणारे भाजपचे मध्येच शिवसेनेबाबत सौम्य भूमिका देखील घेताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी