महत्वाच्या बातम्या
-
मुंबई मनसेत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस | महत्वाची बैठक
कल्याण डोंबिवलीतील दोघा नेत्यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबतं सुरु झाली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुंबईत लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी मनसेने तयार केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा | विश्वहिंदू परिषद स्वागत आणि नियोजनासाठी सहकार्य करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नुकतीच घोषणा झाली. या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या ठिकाणी ही भेट झाली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यसंदर्भात विश्वहिंदू परिषद कोकण प्रांततर्फे वेगवेगळ्या स्तरावर नामांकित सन्माननीय व्यक्तींच्या भेट घेणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
देशाचं बजेट आहे की OLX ची जाहिरात | शक्य असेल तर ते संसदही विकतील
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 सरकारी बँकेचे शेअर्स विकण्याची घोषणा केली. देशात सध्या 12 पब्लिक सेक्टरच्या बँका आहेत. सरकार हळूहळू छोट्या बँकांना मोठ्या बँकेत मर्ज (विलीनिकरण) किंवा सामावून घेणार आहे. याचा फायदा म्हणजे बँकाच्या मालमत्तेत भर पडेल. याशिवाय जे नुकसान झाले आहे त्याची झळ सोसण्यासाठी बळ येईल आणि त्याविरोधात सामना करता येतो. याशिवाय एक इन्शुरन्स कंपनी विकली जाणार आहे. निधी गोळा करण्यासाठी सरकारी कंपन्यांची अतिरिक्त जमीन विकली जाईल.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे अयोध्येला जात असतील तर आम्ही त्यांना मार्गदर्शन करू - संजय राऊत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Mumbai Local Train | सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरु
कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पक्ष बैठकीला मिताली ठाकरेंची उपस्थिती | वरुण सरदेसाई म्हणाले शॅडोचे पण माझे कुटुंब, माझी जबाबदारी
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत आणि त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच मनसे आणि भाजपने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
'मनसे खंडणी' असे Google search करा | पहिल्याच पेजवर ह्या बातम्या सापडतील
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत आणि त्यानुषंगाने सत्ताधारी शिवसेनेला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोविड सेंटरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यापूर्वीच मनसे आणि भाजपने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी विरप्पन बद्दल बोललो होतो वरुण'ला का झोंबल माहीत नाही - संदीप देशपांडे
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याच मुद्याला अनुसरून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्ष ट्विट करताना म्हटलं आहे कि, “विरप्पनने जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल.
4 वर्षांपूर्वी -
फक्त शेतकरी विरोधातल्या बातम्या दाखवून गोदी मीडिया सत्य का लपवत आहे..? - भाई जगताप
मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी बॅरिकेड्स पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. लाल किल्ल्यात घुसलेल्या आंदोलकांनी शीखांचा धर्मध्वज फडकावल्यानं वादंग माजला आहे. लाल किल्ल्यात शिरलेल्या आंदोलकांची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
४० शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा कंपनीवर आरोप | त्याच उद्योजकाला पद्मभूषण
दरम्यान, पद्म पुरस्कारावरून आरोप-प्रत्यारोप होणे नवे नाही. यंदाचं वर्षही यास अपवाद नसून काँग्रेसनं केंद्रातील सत्ताधारी भाजपवर पहिला वार केला आहे. प्रसिद्ध उद्योजक रजनीकांत श्रॉफ यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कार देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे | पण शेतकऱ्यांसाठी नाही - शरद पवार
आखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आझाद मैदानात दाखल झाले.
4 वर्षांपूर्वी -
र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी-कामगार कायद्यांच्या विरोधात राजभवनवर मोर्चा | मोठ्या संख्येने शेतकरी मुंबईत
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 58 वा दिवस आहे. केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. मात्र, अद्यापही हवा तसा तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शिरुन ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्धार केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींनी मुंबई पोलिसांपासून वाचण्यासाठी दिल्लीमध्ये बस्तान हलविले - आ. भाई जगताप
अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यकर्ते, नेते मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार आहेत. तसेच अर्णब यांच्या अटकेची मागणी करणार आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात गोस्वामींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार
भारतीय लष्कराच्या कारवाईबाबतची संवेदनशील माहिती अर्णब गोस्वामी यांच्याकडे तीन दिवस आधीच कशी पोहचली? अर्णब आणि पार्थोदास गुप्तासोबत केलेल्या संवादातून बालाकोटच्या लष्करी कारवाई तसेच पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्याबाबतचादेखील संवाद झाल्याचे समोर आले आहे. याविरोधात केंद्र सरकारने काहीच पाऊले न उचलल्याने कांग्रेसने आता मोठा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश | त्या सुंदर अभिनेत्रीचं नाव आल्यानं खळबळ...
मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी छापा टाकून हायप्रोफाइल ‘कास्टिंग काऊच’ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सेक्स रॅकेट प्रेम उर्फ संदीप इंगळे असं या निर्मात्याचं नाव असून, अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार यांच्या मदतीने सुरू असल्याचं समजलं. त्यामुळं सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशद्रोही अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करा | राष्ट्रवादीचं मुंबईत आंदोलन
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे. हे संभाषण प्रसारमाध्यमे व समाज माध्यमावरही चर्चेत असून ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली.
4 वर्षांपूर्वी -
स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं अनावरण | राज ठाकरेंना देखील आमंत्रण
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी दक्षिण मुंबईत पोलीस मुख्यालयसमोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. याच सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या अहंकारासाठी 'उखाड दिया'ची भाषा | आणि राज्याच्या अस्मितेचा विषय येताच...
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखटोक या सदरामध्ये औरंगाबद शहराच्या नामकरणाविषयी आपली भूमिका मांडली. यावेळी औरंगजेब कधीच सेक्यूलर नव्हता असे म्हणत आधी इतिहास वाचण्याचा अप्रत्यक्ष सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला. त्यानंतर शेलार यांनी राऊत आणि शिवसेनेवर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
त्या धक्कादायक चॅट मध्ये | न्यायाधीशांसोबत सेटिंग | न्यायाधीशांना विकत घ्या...असा संवाद
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटने खळबळ माजली आहे आणि त्यामुळे अर्णब गीस्वामी यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण TRP घोटाळ्यासंदर्भातील व्हाट्सअँप चॅट समाज माध्यमांवर सार्वजनिक झालं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चॅट रेटिंग एजन्सी बार्कचे सीईओ आणि अर्णब गोस्वामी यांच्यादरम्यानच असून, त्यातील विषय हा TRP घोटाळ्यासंबंधित असल्याने अर्णब गोस्वामी पूर्णपणे फसल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी