भाजपमधील दोन गटांमध्ये वाद, प्रकाश मेहता समर्थकांनी पराग शाहांची गाडी फोडली

मुंबई : प्रकाश मेहता यांच्या जागी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पराग शाह यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. प्रकाश मेहतांना तिकीट नाकारल्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांना पराग शाहांची गाडी फोडली. मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश मेहतांचा पत्ता कट करत पराग शाहांना उमेदवारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळाला.
भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पराग शाह हे मेहतांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मेहतांच्या घरा बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली होती. शाह यांची गाडी पाहताच कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी घोषणाबाजी करत गाडीवर हल्ला करण्यात आला. वातावरण चिघळत असल्याने प्रकाश मेहता आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, घाटकोपर पूर्व हा भारतीय जनता पक्षाचा गड समजला जातो. प्रकाश मेहता भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील एकमेव उमेदवार आहे, ज्यांनी सलग पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. मागील २५ वर्षांपासून ते घाटकोरचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. परंतु यंदा त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत. समर्थक मेहतांना अपक्ष निवडणूक लढवण्याची विनंती करत आहेत. त्यामुळे आता प्रकाश मेहता काय निर्णय घेणार हे पाहंण औत्सुक्याचं असेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं