राहुल नार्वेकरांच्या फिल्डिंगमुळे भाजप राज पुरोहित यांचा पत्ता कट करणार?

मुंबई: साताऱ्याचे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई राहूल नार्वेकर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग सुरु असून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीच पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे.
त्यासाठी भाजपचे पुणे नेते आणि तब्बल वीस वर्ष कुलाब्याचे आमदार प्रतिनिधित्व करणारे राज पुरोहित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून येणाऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाने अर्थकारणाच्या बदल्यात अक्षरशः पायघड्या घातल्याचं पाहायला मिळत आहे. पहिल्या यादीतील उमेदवारांमध्ये एकनाथ खडसे, राज पुरोहित आणि विनोद तावडे या जुन्या भाजपच्या नेत्यांना देखील वेटिंगवर ठेवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं.
कालच्या यादीत मुंबईमधील कुलाबा मतदारसंघातील उमेदवार घोषित करण्यात आलं होता. दरम्यान सध्या हाती आलेल्या वृत्तानुसार भाजपने राज पुरोहितांचा यांचा पत्ता कट करण्याची योजना आखली होती. त्यामुळे भाजपात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील आयात लोकांचं महत्व अधोरेखित होतं आहे. दुसऱ्याबाजूला असे निर्णय घेताना निष्ठावंतांना जराही विचारात घेतलं जात नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर केवळ सतरंज्या उचलायचे काम शिल्लक राहिले असल्याची खंत भारतीय जनता पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बोलून दाखवली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये मेगाभरती अजूनही सुरूच आहे. सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणुकीत तिकिट देता यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे तब्बल चार वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या आमदाराला डच्चू देणार असल्याची चर्चा भारतीय जनता पक्षाच्या गोटात रंगली आहे.
प्रसार माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुलाबा विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटी आणि महाराष्ट्र प्रभारी यांच्यात बैठक पार पडली. सदर बैठकीला कुलाब्याचे विद्यमान आमदार देखील स्वतः उपस्थित होते. परंतु कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर म्हणजे रामराजे निंबाळकर यांचे जावई यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी स्वतः मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावर विद्यमान आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आणि गोंधळ घातल्याचे समजते. भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी केशव प्रसाद मोर्या यांना आपल्या बाजुनं वळवण्याचा राज पुरोहित यांचा जोरदार प्रयत्न असून, त्यामुळे मुख्यमंत्री विरुद्ध राज पुरोहित अशी चर्चा रंगली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं