नायर रुग्णालयात ३०० कोरोना बाधित मातांची सुखरुप प्रसूती, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं कौतुक

मुंबई, १४ जून : मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात ‘कोरोना कोविड १९’ बाधित मातांच्या सुखरुप प्रसूतिने ३०० चा टप्पा काल रात्री ओलांडून कोविड विरोधातील मानवाच्या लढ्यास एका वेगळ्या शुभवर्तमानाची जोड दिली आहे. आज सकाळपर्यंत प्रसूतींची एकूण संख्या ३०२ झाली आहे. एप्रिल महिन्यात ‘कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित झालेल्या नायर रुग्णालयात दिनांक १४ एप्रिल २०२० रोजी पहिल्या कोविडबाधित मातेची सुखरूप प्रसूती झाली होती. त्यानंतर गेल्या २ महिन्याच्या कालावधीत नायर रुग्णालयात ३०२ कोविडबाधित मातांची सुखरुप प्रसूती झाली आहे. यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे.
एकूण प्रसुतींमध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे. कालच तान्हुल्यांच्या टॅ्याह्यांच्या मंगलस्वरांनीही त्रिशतकी टप्पा ओलांडला असून बाळांचीही संख्या आज सकाळ पर्यंत ३०६ झाली आहे. अशी माहिती नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. सुषमा मलिक, प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीरज महाजन आणि भूलशास्त्र विभागाच्या डॉक्टर चारुलता देशपांडे यांनी दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार एकाच रुग्णालयात ३०० कोरोना बाधित मातांची प्रसूती झाल्याचे हे जगातील आजपर्यंतचे एकमेव उदाहरण आहे.
गेले दोन महिने सातत्याने अविश्रांत मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये प्रसूतिशास्त्र विभागातील डॉक्टर अरुंधती तिलवे, डॉक्टर चैतन्य गायकवाड, डॉक्टर अंकिता पांडे आणि परिचारिका सिस्टर रुबी जेम्स, सिस्टर सुशिला लोके, सिस्टर रेश्मा तांडेल यांच्यासह सुमारे 75 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर नवजात शिशु व बालरोग चिकित्सा विभागातील डॉक्टर पुनम वाडे, डॉक्टर संतोष कोंडेकर आणि परिचारिका सीमा चव्हाण, रोझलीन डिसूजा यांच्यासह सुमारे 75 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
News English Summary: The safe delivery of ‘Corona Covid 19’ affected mothers at Mumbai Municipal Corporation’s Nair Hospital has added a different kind of good news to the human struggle against covid across the 300 stage last night.
News English Title: Safe delivery of 300 Corona affected mothers at Mumbai BMC Nair Hospital News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं