'राजमुद्रे'वरून संभाजी ब्रिगेडकडून मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल

पुणे: मुंबईत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आज पहिलं राज्यव्यापी महाअधिवेशन सुरू आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये मनसेनं आपल्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत भगव्या रंगाचा झेंडा आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची ‘राजमुद्रा’ असं याचं स्वरूप आहे.
मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावर राजमुद्रा छापण्याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला आहे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेविरोधात तक्रार केली आहे.
या झेंड्याच्या विराेधात संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून पक्ष आणि राज ठाकरेंच्या विराेधात गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज पुण्याच्या सहाय्यक पाेलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांना देण्यात आला आहे. राजमुद्रेचा वापर काेणत्याही राजकीय पक्षाने करणे चुकीचा असून राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राज ठाकरे यांना नाही असे या तक्रार अर्जात म्हंटले आहे.
Web Title: Sambhaji Brigade logged complaint against MNS Party and Raj Thackeray at Pune.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं