मंदी व बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात; उद्धव यांची मोदींच्या आर्थिक धोरणांवर टीका

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असतानाही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कुठलीही उपाययोजना करत नसल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. ऑटो क्षेत्रातील मंदी, हजारो नोकरदारांवर कोसळलेली बेरोजगारीची कुऱ्हाड, शेअर बाजारातील घसरण, डॉलरचा वधारलेला भाव या घडामोडींमुळे अर्थतज्ज्ञही चिंता व्यक्त करत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास भारताची अर्थव्यवस्था खूपच भक्कम आहे, इतर देशांच्या तुलनेत आपला विकासदरही आश्वासक आहे, असा दावा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नोटबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
सामनाच्या अग्रेलेखातून शिवसेनेने केंद्र सरकारवरच्या अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहे. नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसाने सत्य सांगितले आहे. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’आहे. या संस्थेने नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्र्यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. २१ तोफांची सलामी देण्याचा रिवाज त्यात आहे.
पण सलामीस वर केलेल्या पोलिसांच्या बंदुकांतून एकही गोळी सुटली नाही. २१ बंदुकांचा ‘चाप’ दाबून पोलिसांची बोटे सुजली. आमची अर्थव्यवस्था त्या फसलेल्या तोफांच्या सलामीसारखीच झाली आहे. सीतारमण यांनी तेच सांगितले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल, असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवच टीका केली आहे.
हे आहेत अग्रलेखातील मुद्दे;
- मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे
- नोटाबंदीत अनेकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात पांढरा झाला हे मान्य केले पाहिजे, पण कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या गमावल्या हेसुद्धा कटू सत्य आहेच
- सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा, म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते
- मोदी पुन्हा जिंकले असले तरी देशाची आर्थिक स्थिती स्फोटक झाली आहे. पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराची ‘पै-पै’ वसूल करण्याची भाषा करतात तेव्हा गर्वाने छाती फुलून येते. पण चिदंबरम यांचे पाप मागच्या सरकारातले आहे व सीतारमण म्हणतात तो नोटाबंदीनंतरचा भ्रष्टाचार सध्याच्या राजवटीतला आहे
- नव्या राजवटीत परदेशातला काळा पैसा स्वदेशात आला नाही. उलट बँका बुडवणारे शंभरावर उद्योगपती देशातून पळून गेले. त्यांना सीबीआयने रोखले नाही व ईडीनेही आडकाठी केली नाही
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं